(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
कृषीक्षेत्राचा ज्ञात इतिहास सात हजार वर्षांपासूनचा आहे. कृषीउद्योगाने आधुनिक मानवी संस्कृतीचा पाया घातला. औद्योगिक संस्कृती निर्माण होईपर्यंत कृषीक्षेत्र जागतिक व्यापाराचे पायाभूत क्षेत्र होते. आजही जगातील अनेक देशात कृषी अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सकल देशातंर्गत उत्पादनाचा १७% वाटा असून, अजूनही ५३% लोकसंख्या कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे.

कृषी विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या असून त्यांमध्ये हवामानशास्त्र, भूविज्ञान, वनस्पतिशास्त्र, उद्यानविद्या, कृषीतंत्रज्ञान, कृषीअर्थशास्त्र, कृषीउद्योजक अशा अनेक ज्ञानशाखांचा समावेश आहे. या सर्व शाखांचा परिचयासोबतच, कृषीक्षेत्राची परंपरा प्रदीर्घ असल्यामुळे कृषीविकासाचे जे अनेक ऐतिहासिक टप्पे पडतात, त्यांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे करून देण्यात येईल. भारताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने १९६० नंतर हरितक्रांती झाली व त्या टप्प्यात अनेक सुधारित संकरित वाणांची निर्मिती झाली. सिंचन पद्धतीत बदल झाले. नवनवे तंत्रज्ञान अंमलात आणले गेले, गेल्या काही वर्षात झालेल्या जनुकक्रांतीमुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता, उत्पादनवाढ, त्यांतून मिळणारा आर्थिक लाभ अशा अनेक विषयांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे वाचकांना होईल.

यासोबत कृषीक्षेत्रामध्ये ज्यांनी संशोधन/शिक्षण/विस्ताराचे भरीव काम केले आहे असे शास्त्रज्ञ, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्य क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणारे प्रणेते, कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक काम केले असे प्रवर्तक तसेच विविध प्रयोग करून तंत्रज्ञान विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी यांची चरित्रे यांचाही समावेश असणार आहे.

अँटिऱ्हा‍यनम (Snapdragon / Antirrhinum)

अँटिऱ्हा‍यनम

अँटिऱ्हा‍यनम : (इं. स्‍नॅपड्रॅगॉन; लॅ.अँटिऱ्हा‍यनम मॅजुस, कुल – स्क्रोफ्यूलॅरिएसी). हे हंगामी / बहुवर्षायू फुलझाड आहे. फुले सुंदर, आकर्षक आणि मोहक ...
अबोली (Firecracker flower)

अबोली

अबोली : (हिं. प्रियदर्श; क. अव्‌वोलिगा; सं. अम्‍लान, महासहा; लॅ. क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस, क्रॉ. अंड्युलिफोलिया कुल–ॲकँथेसी).  हे कोरांटीसारखे क्षुप (झुडूप) सु ...
आरारूट (Arrowroot)

आरारूट

आरारूट : (इं. आरारूट). व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव खाद्य पिठाला दिले असून हे ज्या अनेक वनस्पतींपासून काढतात त्यात पुढील ...
इसबगोल (Blonde psyllium)

इसबगोल

इसबगोल : (हिं. इस्पद्युल; गु. उथमुं जिरुं; सं. ईशदगोल;  इं. ब्‍लाँड सिलियम, प्लँटेन; लॅ. प्‍लँटॅगो ओव्हॅटा; कुल – प्लँटॅजिनेसी).  ही ...
ऑलिव्ह (Indian Olive)

ऑलिव्ह

ऑलिव्ह : ( लॅ.ओलिया फेरुजिनिया , कुल-ओलिएसी). सु. १५ मी. उंचीचा हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष भारतात काश्मीर ते कुमाऊँ ...
कडधान्ये (Pulses)

कडधान्ये

डाळीच्या धान्याची बहुतेक सर्व पिके इतिहासपूर्व कालापासून लागवडीखाली आहेत. त्यांचे बी भरडल्यास त्याच्यावरील टरफल निघून जाऊन प्रत्येक दाण्याच्या दोन – ...
कर्दळ (Indian shot)

कर्दळ

कर्दळ :  (हिं. सब्बजय; गु. अकल बेरा; क. कळेहू, कावाळी; सं. देवकेली, सर्वजया;  इं. इंडियन शॉट;  लॅ. कॅना इंडिका; गण-सिटॅमिनी; ...
काकडशिंगी (Crabs claw)

काकडशिंगी

काकडशिंगी : (हिं.काकरसिंगी; सं.शृंगी, कक्कटशृंगी; इं. क्रॅब्स क्लॉ, जॅपॅनीज वॅक्स ट्र; लॅ. ऱ्हस सक्सिडॅनिया ; कुल-ॲनाकार्डिएसी). या नावाने बाजारात वाकड्या ...
कागदी लिंबू (Citrus aurantifolia Swing)

कागदी लिंबू

कागदी लिंबू हे महत्त्वाचे लिंबूवर्गीय फळ असून महाराष्ट्रात या फळपिकाखाली ३०,३२८ हे. क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, योग्य जमीन आणि ...
कांदळ (True mangrove)

कांदळ

कांदळ : (इं. ट्रु मॅनग्रोव्ह; क. कांदले; लॅ. ऱ्हायझोफोरा मक्रोनेटा; कुल – ऱ्हायझोफोरेसी). हा सदापर्णी लहान वृक्ष (४.५—७.५ मी. उंच) ...
कारले ( Bitter Gourd / Karela Fruit )

कारले

कारले : (हिं.कारेला; गु.कारेलो; क.हागलकाई; सं.कंदुरा, करवल्ली, सुषवी; इं.कॅरिलाफ्रुट, बिटर गोर्ड; लॅ. मॉमोर्डिका चॅरॅंशिया, कुल-कुकर्बिटेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ...
कुरका (Country Potato)

कुरका

कुरका : (तमिळ आणि मल्याळी कुरका, किसंगू; इं. कंट्री पोटॅटो; लॅ. कोलियस पार्व्हिफ्लोरस, को. ट्यूबरोझस ; कुल-लॅबिएटी). या वर्षायू (एक ...
कृष्णकमळ (Passion flower)

कृष्णकमळ

कृष्णकमळ : (इं. पॅशन फ्लॉवर; लॅ. पॅसिफ्लोरा;  कुल-पॅसिफ्लोरेसी). या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींच्या पॅसिफ्लोरा  वंशात एकूण सु. २४ जाती ...
केळी (Banana)

केळी

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक असून या पिकाखाली ७३,५०० हे. क्षेत्र आहे. त्यामध्ये जळगाव जिल्हा आघाडीवर असून तेथे ४८,००० हेक्टर ...
केवडा (Screw Pine)

केवडा

केवडा : (केतकी; हिं. केवरा, केटगी; गु. केवडो, क. केदगे, मुंडिगे; सं. केतक, गंध पुष्प; इ. स्क्रू पाइन; लॅ. पँडॅनस ...
केशर (saffron)

केशर

केशर : (हिं. केसर, झाफ्रॉन; गु. केशर; सं. कुंकुम; इं. मेडो क्रॉकस, सॅफ्रन क्रॉकस; लॅ. क्रॉकस सॅटायव्हस;  कुल – इरिडेसी) ...
कॉसमॉस (Cosmos bipinnatus)

कॉसमॉस

कंपॉझिटी कुलातील सहज उगवणारे हंगामी फुलझाड. याच्या २५ जाती असून मूलस्थान मेक्सिको येथे आहे. यास अत्यंत कमी कालावधीत फुले येतात. मध्य भारताच्या ...
कोथिंबीर (Coriander)

कोथिंबीर

कोथिंबीर : (हिं. धनिया; गु. कोनफिर; क. कोथंब्री, कोतुंबरी; सं. धान्यक, कुस्तुंबरी, अल्लका; इं. कोरिअँडर, लॅ. कोरिअँड्रम सॅटायव्हम; कुल-अंबेलिफेरी). ही ...
कोद्रा (codo millet)

कोद्रा

कोद्रा : (हरीक गु. कोद्रा क. हरका सं. कोद्रव इं. कोडो मिलेट लॅ.पॅस्पॅलम स्क्रोबिक्युलेटम कुल-ग्रॅमिनी). उष्णकटिबंधातील अनेक देशांत आढळणारे व ...
कोरांटी (Porcupine Flower)

कोरांटी

कोरांटी : (कळसुंदा; हिं. कटोरिया; गु. कांटा शेलिया; क. मुदरंगी, गोरांटे; सं.बोना, झिंटी, कुरंटक, कुरबक; लॅ. बार्लेरिया प्रिओनिटिस; कुल-ॲकँथेसी). सु ...
Loading...