आर्मेचर गुंडाळी (armature winding), पार्श्वमार्गी (shunt field) आणि क्रमिकमार्गी (series field) गुंडाळी, आंतरध्रुवीय गुंडाळी (interpole winding) तसेच पूरक गुंडाळी (compensating winding) यांचा रोध मोजण्यासाठी ओहम मीटरचा उपयोग करतात. ज्या गुंडाळीचा रोध मोजायचा आहे ती गुंडाळी मंडलामधून अलग करून त्याचा रोध मोजतात, याकरिता सदृश प्रकारचा (analogue type) अथवा अंकीय  (digital) ओहम मीटरचा उपयोग करतात.

सदृश प्रकारचा ओहम मीटर

 

सदृश प्रकारचा ओहम मीटर : यामध्ये मापक्रम (scale) असून त्यावर प्रमाण (quantity) दर्शवणाऱ्या खुणा केलेल्या असतात. असे मीटर मंडलामध्ये जोडताच दर्शक काट्याची (pointer) हालचाल होऊन वेधांक (reading) दर्शविला जातो.

 

 

 

 

 

 

अंकीय ओहम मीटर

अंकीय ओहम मीटर : यामध्ये बेकेलाइट अथवा पीव्हीसी आवरण (case), लहान बॅटरी आणि वेधांक दर्शविण्याकरिता एलसीडी (LCD-Liquid crystal display, द्रवस्फटिकीय दृश्यपट) आवरणामध्ये बसविलेला असतो. असे मीटर मंडलामध्ये जोडताच त्यामधील एलसीडी प्रकाशित होऊन वेधांक दर्शवितात. या मीटरमध्ये दर्शक काटा नसतो.

 

 

 

 

 

 

मेगर

मेगर : गुंडाळीचे निरोधक (insulation) रोध मोजण्यासाठी मेगर किंवा निरोधक परिक्षित्राचा (insulation tester) उपयोग करतात. यामध्ये इंजक्शन मोल्डेड एबीएसचे प्लॅस्टिकी आवरण असते. या आवरणामध्ये हाताने फिरविता येईल असे छोटेसे डीसी-जनित्र आणि प्रदान डीसी-विद्युत दाब (dc voltage)  स्थिर मिळविण्याकरिता घनावस्थेतील (solid state) मंडल असते. हे १०० वोल्टपासून १००० वोल्ट आणि १० मेगा ओहमपासून २००० मेगा ओहमच्या क्षमतेपर्यंत उपलब्ध होतात. सर्वसाधारणपणे ५०० वोल्ट आणि १००० मेगा ओहमचा मेगर सर्वसाधारण निरोधक रोध मोजण्यासाठी वापरतात.

गुंडाळीचा निरोधक रोध मोजण्याकरिता मेगरचे अग्र बॉडीला आणि दुसरे टोक (terminal) तपासणी करावयाच्या  गुंडाळीला जोडून मेगरची मूठ (handle) १६० किंवा त्यापेक्षा जास्त आरपीएम फिरवितात आणि मेगरने दर्शविलेल्या निरोधक रोधाची नोंद घेतात. हा निरोधक रोध नेहमी उच्च असावा.

 

 

 (१) दोष :

कारणे : (१) पिग टेल सैल झाली असेल, (२) ब्रशवर खड्डे पडले असतील, (३) क्रमनिरपेक्ष खंड   (commutative segment) खडबडीत झाले असतील, (४) ब्रशची जागा बदलली असेल, (५) आंतरध्रुवांची जोडणी चुकली असेल.

निवारण : (१) स्प्रिंग जुळवून (adjust) योग्य तो ताण (tension) द्यावा किंवा स्प्रिंग बदलावी, (२) कार्बन ब्रश बदलावेत, (३) दिक्परिवर्तक (commutator) बदलावा, (४) ब्रश योग्य जागी आणावेत, (५) योग्य पद्धतीने जोडणी करून घ्यावी.

(२) दोष : जनित्र विद्युत भार  निर्माण करत नाही.

कारणे :  (१) शेष चुंबकत्व संपले असेल. (२) फिरण्याची दिशा बदलली असेल.(३) ब्रशची जागा बदलली असेल. (४) ब्रश दिक्परिवर्तकाला स्पर्श करत नसतील. (५) आर्मेचर, क्षेत्र (field), नियामक (regulator) यांमध्ये खुले मंडल (open circuit) झाले असेल. (६) आर्मेचर अथवा क्षेत्र गुंडाळीमध्ये (field winding) लघु मंडल (short circuit) झाले असेल.

                                                                                                                                                                                                                                                                    निवारण : (१) क्षेत्रीय ध्रुव (field pole) पुन्हा भारित (charge) करावा. (२) योग्य दिशेने फिरवावा. (३) ब्रश योग्य जागी आणावेत. (४) ब्रश धारक (holder) साफ करून स्प्रिंगेचा ताण जुळवून घ्यावा. (५) आर्मेचर , क्षेत्र अथवा नियामकामधील खुले मंडल तपासून तो दोष दूर करावा. (६) अल्प कक्षेच्या (low range) ओहम मीटरने प्रत्येकाचा रोध मोजून लहान (short) झालेला भाग बदलावा.

 

(३) दोष – जनित्र प्रमाणापेक्षा जास्त गरम होतो.

कारणे : (१) दिक्परिवर्तकावर  प्रमाणापेक्षा जास्त स्पार्किंग होत असेल. (२)  प्रमाणापेक्षा जास्त भार (load) लोड जोडला असेल. (३) बेअरिंग झिजली असेल. (४) आर्मेचर अथवा क्षेत्रीय गुंडाळी (field winding) लहान झाली असेल.

निवारण :  (१) भार कमी करावा. (२) बेअरिंग बदलावी. (३) लघु आर्मेचर अथवा क्षेत्र गुंडाळी बदलावी. (४) जोडणी व्यवस्थित  करावी. (५) री-वाइंडिंग करावी.

 

 (४) दोष :  रेटेड विद्युत भार निर्माण करत नाही.

कारणे : (१) जनित्र कमी गतीने फिरत असेल. (२) क्षेत्राचा रोध जास्त झाला असेल. (३) आर्मेचर अथवा क्षेत्रीय गुंडाळी लहान झाली असेल. (४) अवक्षेपित चुंबकत्व (residual magnetism) कमी झाले असेल.

निवारण : (१) जनित्र योग्य गतीने फिरवावे. (२) क्षेत्राचा रोध कमी करावा. (३) आर्मेचर अथवा क्षेत्रीय गुंडाळी बदलावी. (४) अवक्षेपित चुंबकत्व भारित करावे.

 

मेगरचे प्रकार : मेगर मोटरचलित आणि हस्तचलित या दोन प्रकारचे असतात.

अति उच्च विद्युत दाब असलेल्या रेखयोजनासाठी (Extra-High-Voltage Lines) शक्यतो मोटरचलित मेगर वापरला पाहिजे.

सुरुवातीस दोन्ही अग्रे (terminal) लहान करून शून्याची जुळवणी (zero adjustment) करून घेतली पाहिजे. ज्या ठिकाणचा निरोधक रोध (insulation resistance) मोजावयाचा असेल तेथे दोन्ही अग्र जोडावेत, नंतर हस्तचलित मेगरची मूठ हाताने शक्य तेवढ्या जोरात सारख्या गतीने फिरवावी. त्यामुळे स्थिर असलेल्या जनित्रामध्ये विद्युत दाब (voltage) निर्माण होतो.  तो विद्युत दाब तिथे लावलेल्या गुंडाळीला (coil) दिला जातो व गुंडाळीमधून वीजप्रवाह मंडलामध्ये जोडलेल्या निरोधक रोधामधून जात असतो. त्यामुळे तिथे बिंदूवर निर्माण होणारे परिपीडन (torque) हे निरोधक रोधामधून जाणाऱ्या प्रवाहावर (current) अवलंबून असते आणि दर्शक काटा (pointer) ज्या ठिकाणी स्थिर होईल तेथील हे इच्छित निरोधक रोध होय. तो मेगा ओहममध्ये मोजतात.

मेगरची क्षमता आणि चांगला निरोधक रोध खालीलप्रमाणे असला पाहिजे.

 

उपकरण मेगर क्षमता (किलोव्होल्ट मध्ये) किमान निरोधक रोध

                     (मेगा ओहम मध्ये)

उपस्थानकामधील (substation) उपकरणे ५०००
अति उच्च विद्युत दाब  रेखयोजन (Extra-High-Voltage Lines) १०
अति ताण रेखयोजन (High Tension Lines)
अल्प ताण रेखयोजन आणि सुविधा रेखयोजन(Low Tension & service line) ०.५

 

संदर्भ :

• शहा, प्रकाश संपूर्ण विद्युत शास्त्र.

• महावितरण संकेतस्थळ.

• Shawny, A.K. Electrical measurement.

 

समीक्षक : एस.डी. भिडे