कमसाले : कर्नाटक राज्यातील एक लोकनृत्यशैली.कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात महाडेश्वर या देवतेची पूजा केली जाते.त्यासाठी महाडेश्वर महाकाव्याचे कथा गायन केले जाते.महाडेश्वर या भागातील सांस्कृतिक नायक म्हणून ओळखला जातो.महाडेश्वराच्या महाकाव्याच्या कथागायनासाठी कमसाले हा नृत्यकलाप्रकार सादर केला जातो.हा कलाप्रकार युद्धकला म्हणून ओळखला जातो. बिसू कमसाले या नावाने देखील हा प्रकार ओळखला जातो.या कलेत नृत्याबरोबर काशाच्या मोठमोठ्या चकत्या एकमेकांवर आदळून ध्वनी निर्माण केला जातो. ही पूजा हालूकुरुबा समाजातर्फे केली जाते.या कलेतील बहुतेक नर्तक देखील या समाजातील आहेत.
या नृत्यात वापरले जाणारे संगीत खूप तालबद्ध आणि सुमधुर असते. महाडेश्वर महाकाव्यात समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांना एकटे पाडून त्यांचे शोषण करणाऱ्या प्रवृतीविरुद्ध महाडेश्वराने केलेल्या संघर्षाचे वर्णन आहे.

संदर्भ : https://dikshantias.com

मराठी भाषांतर : प्रकाश खांडगे