गायरर, आल्फ्रेड : ( १५ एप्रिल, १९२९ )

सहा महिने त्यांनी कॅल्टेक येथे हिल्डेगार्ड लेम्फ्रोम (Hildegard Lamfrom) यांच्या प्रयोगशाळेत रेटिक्युलेट सिस्टीममधील प्रथिनांच्या निर्मितीवर काम केले. पसादेनाहून परतल्यानंतर टिएमव्हीवर केलेल्या कामामुळे त्यांना मॅक्स प्लांक सोसायटीचे सदस्य आणि अणूजीवशास्त्र विभागात प्रमुख म्हणून नेमले गेले. त्यांनी  रायबोसोम एकत्रित होऊन साखळीमध्ये काम करतात आणि त्या गठ्ठ्यांना पॉलीसोम असे म्हणतात हे त्यांनी सिद्ध केले. तसेच त्यांना साखळीत बांधणारा m-RNA असतो, या साखळीचे वाचन करून प्रथिनांची निर्मिती होते आणि प्रथिनांची साखळी जशी वाढत जाते तसे रायबोसोमचे सक्रिय स्थान एका m-RNA च्या संकेत समूहापासून दुसरीकडे सरकत जाते, असे प्रतिपादन त्यांनी केले. हायड्राची प्रतिकृती मॉडेल म्हणून वापरली आणि अणूंच्या आतील रचनेच्या शोधावर भर दिला. स्टेम पेशींच्या वाढीवर आणि पेशींच्या पृथक्करणावर संशोधन केले. वेगळ्या केल्या गेलेल्या पेशींच्या समूहापासून नवीन अखंड प्राणी तयार होतो हे प्रतिपादन केले. ही प्रणाली पेशींच्या मूळ अंतर्बाह्य देवाण घेवाणीचे तंत्र, कोणते आकृतिबंध (pattern) तयार होतात हे समजण्यासाठी आणि पेशींच्या पृथ:करणाच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरली. त्यांनी त्यांचे सहकारी हेन्स माइन्हारड (Hans Meinhardt) यांच्याबरोबर जीवशास्त्रीय आकृतिबंध निर्मितीचा सिद्धांत मांडला. यामुळे एक गणितीय किल्ली समोर आली. यामुळे  अशा अणुप्रतिकृती तयार करण्यात आल्या, ज्यात असमान देवाणघेवाण विस्ताराने सांगता येत होती. नंतरच्या जीवशास्त्रातल्या अनेक प्रक्रियांसाठी ही किल्ली वापरली गेली. १९५० च्या सुमारास, प्राध्यापक पदावर हायझेनबर्ग-मॅक्स प्लांकमध्ये (Heisenberg`s Max-Planck) काम करीत असताना, त्यांची रुची भौतिकशास्त्राच्या तात्त्विक बैठकीकडे आणि जीवशास्त्राच्या भौतिकी समस्यांकडे वळली. हर्बर्ट फाय्गल (Herbert Feigl) यांच्यामुळे त्यांच्या मेंदू-मन-समस्या या संबंधातील विचारांना चालना मिळाली. त्यानुसार, मेंदूतील प्रक्रिया भौतिकशास्त्रातील नियमांप्रमाणे होतात आणि मेंदूतील सर्व प्रक्रिया आपल्याला डीकोड करता येत नाहीत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांनी जर्मन भाषेत  Physics, life and mind हे पुस्तक लिहिले.  त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या इतिहासावर, मध्ययुगीन काळातील शास्त्रीय सांस्कृतिक बदलांवर आणि रेनेसांवर युरीजीना, अल किंडी आणि निकोलस डी कुझा (Eriugena, al-Kindi and Nicolas de Cusa) यांच्या सहकार्याने पुस्तके लिहिली.आल्फ्रेड गायरर यांचा जन्म बर्लिन येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण शांघाय, बर्लिन आणि बवेरीयामधील श्वाबाक येथे झाले. त्यांनी गॉटीन्गेन ह्या शहरामध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. या कालावधीत त्यांनी वेर्नेर हायझेनबर्ग (Werner Heisenberg) यांनी नव्याने स्थापन केलेल्या भौतिकशास्त्राच्या मॅक्स प्लांक संस्थेत (Max-Planck-Institute) काम केले. त्यांनी कार्ल विरत्झ (Karl Wirtz) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केले. हायड्रोजन बॉन्डमधून प्रोटॉनची हालचाल आणि द्रवांचे भौतिक शास्त्र (proton transfer across hydrogen bonds and physics of liquids) या विषयात त्यांचा अभ्यास होता. त्यांनी यावर लिहिलेल्या शोधनिबंधामध्ये अनेक पदार्थांच्या अणूंच्या आकारांची, पाण्याच्या अणूंच्या आकारांशी तुलना करून, रोटेशनल व ट्रांझिशनल घर्षण कोइफिशंटची गणिते करून कशी काढता येतील ह्याचे विश्लेषण आहे. विरत्झबरोबर काम करताना त्यांना हा अंदाज आला की अणुभौतिकीशास्त्राच्या अभ्यासामुळे जीवशास्त्राची काही मूलतत्त्वे समजायला सोपी जातील आणि मग त्या दिशेने त्यांची रुची वाढत गेली. त्यांना जर्मन पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून अमेरिकेला जाण्याची आणि एमआयटीमध्ये संप्रेरकांच्या कार्यपद्धतीवर (enzyme kinetics) काम करायची संधी मिळाली. जर्मनीमध्ये ते हान्सस फ्रेड्रिक  फ्रेक्सा (Hans Friedrich-Freksa) यांच्या नव्याने स्थापन झालेल्या विषाणू संशोधन केंद्र, मॅक्स प्लांक संस्था, ट्यूबिंगेन (Tübingen) येथे संशोधन सहकारी म्हणून रुजू झाले. नेचर मासिकात, गायरर आणि स्क्रेम यांचे एकत्रित तीन निबंध प्रसिद्ध झाले. त्यात विषाणूतील जनुक वेगळे काढले तरी त्यामुळे रोग होऊ शकतो; विषाणूतील आरएनएमध्ये एकच साखळी असते आणि रोग घडवून आणण्यासाठी अखंड अणु गरजेचा असतो: विषाणू आरएनएमधील एका न्यूक्लीओटीडमध्ये जर नायट्रस आम्ल टाकले  तर विषाणूमध्ये परिवर्तन  होते; असे प्रतिपादन केले होते.

 संदर्भ :

  • Gierer, A., Berking, S., Bode, H., David, C.N., Flick, K., Hansmann, G., Schaller, H., Trenkner, E. (1972), ‘Regeneration of hydra from reaggregated cells.’ Nature New Biol. 239, 98-101.
  • Gierer, A., Schramm, G. (1956), ‘Infectivity of ribonucleic acid from Tobacco Mosaic Virus.’ Nature 177, 702-703.
  • Gierer, A. (1957), ‘Structure and biological function of ribonucleic acid from Tobacco Mosaic Virus.’, Nature 179, 1297-1299.
  • Gierer, A., Mundry, K.W. (1958), ‘Production of mutants of Tobacco Mosaic Virus by chemical alteration of its ribonucleic acid in vitro.’ Nature 182, 1457-1458.
  • Gierer, A. (1963), ‘Function of aggregated reticulocyte ribosomes in protein synthesis.’ Mol. Biol. 6, 148-157.
  • Gierer, A., Meinhardt, H. (1972) ‘A theory of biological pattern formation.’ Kybernetik (continued as Biological Cybernetics) 12, 30-39.
  • Gierer, A. (2012) ‘The Hydra model – a model for what?’ J. Dev. Biol. 56, 437-445.
  • Gierer, A. (1987) ‘Directional cues for growing axons forming the retinotectal projection Development’ 101, 479-489.

समीक्षक : रंजन गर्गे