ऊर्जा पडताळा म्हणजे ऊर्जा संवर्धनासाठी पद्धतशीर प्रयत्नांच्या दिशेने पहिली पायरी आहे. या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापराचा अभ्यास केला जातो आणि ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी कोणत्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो याचे विश्लेषणही केले जाते.

संकल्पना : ऊर्जा संवर्धन अधिनियम २००१ नुसार ऊर्जा पडताळा या संकल्पनेमध्ये ऊर्जेच्या वापराची पडताळणी आणि देखरेख यांचा अंतर्भाव होतो. तसेच यामध्ये खर्च-फायद्याच्या विश्लेषणासह ऊर्जा कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या कृती योजनेसह तांत्रिक अहवाल सादर केला जातो.

ऊर्जा पडताळा प्रक्रियेमध्ये प्रथम संस्थेच्या कार्याची आणि जुन्या ऊर्जा बिलांच्या नोंदीची माहिती घेतली जाते. त्यानंतर या सर्व माहितीचे विश्लेषण करून त्याचा उपयोग या सुविधा आणि ऊर्जेच्या वापराबद्दल तसेच ऊर्जा संवर्धनाच्या संधींबद्दल माहिती मिळविण्यासाठी केला जातो.

र्जा पडताळ्याची आवश्यकता : ऊर्जा पडताळ्याचा उपयोग पुढील गोष्टींची पूर्तता करण्यास होतो : (१) ऊर्जेची बचत करून कोणत्याही संस्थेची चालू प्रक्रिया किंमत कमी करणे.(२) ज्या ठिकाणी ऊर्जेचा अपव्यय होत आहे, परंतु जेथे सुधारणेला वाव आहे अशा क्षेत्रांची ओळख करून ऊर्जेचा खर्च कमी करणे. (३) ऊर्जेचा खर्च कमी करून उत्पादनाची किंमत कमी करणे. (४) प्रदूषण कमी करणे. (५) नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर कमी करणे (उदा., कोळसा, तेल इ.) (६) उत्पादन व उपयुक्तता उपक्रमांसाठी आवश्यक अशा ऊर्जा खर्च कपात, प्रतिबंधात्मक देखभाल आणि गुणवत्ता व नियंत्रण कार्यक्रमांना सकारात्मक दिशा देणे. (७) संपूर्ण संस्थेमध्ये ऊर्जेच्या अधिक प्रभावी वापरासाठी योजना प्रदान करणे. (८) ऊर्जा पुरवठा आणि प्राप्त उत्पादन यांचा परस्पर संबंध ओळखणे. (९) ऊर्जा संवर्धन उपायांच्या अंमलबजावणी खर्चाचा वेतन परतावा कालावधी ठरविणे.

र्जा पडताळ्याचे वर्गीकरण : उपलब्ध संसाधने, आकार, इमारतीचे प्रकार आणि उद्दिष्टांनुसार ऊर्जा पडताळणी प्रक्रियेचे तीन प्रकार पडतात : (१) प्राथमिक ऊर्जा पडताळा किंवा गमन ऊर्जा पडताळा, (२) लक्ष्यित ऊर्जा पडताळा आणि (३) तपशीलवार ऊर्जा पडताळा.

() प्राथमिक र्जा पडताळा किंवा गमन र्जा पडताळा : प्राथमिक ऊर्जा पडताळा हा गमन ऊर्जा पडताळा किंवा निदानपूर्वक पडताळा या नावानेही ओळखला जातो. हा पडताळा तुलनेने वेगवान पडताळा असतो कारण यामध्ये चालू स्थितीची माहिती किंवा सहजपणे उपलब्ध होणारी माहिती वापरली जाते.

प्राथमिक ऊर्जा पडताळा हा प्रामुख्याने पुढील कारणांसाठी अंमलात आणला जातो : (१) ऊर्जा बिल आणि पावत्यांच्या आधारे ऊर्जा खर्च निश्चित करणे. (२) ऊर्जेच्या वापराशी संबंधित उत्पादन माहिती मिळविणे. (३) ऊर्जा बचतीच्या व्याप्तीचा अंदाज घेणे. (४) सर्वांत संभाव्य आणि सहज लक्ष वेधून घेणारी ऊर्जा बचतीची क्षेत्रे (उदा., अनावश्यक प्रकाश, इंधन गळती इ.) शोधणे. (५) त्वरित अंमलात आणता येणारे आणि विशेषत: बिनखर्चिक किंवा कमी खर्चात सुधारणा करणारे ऊर्जा बचतीचे मार्ग ओळखणे. (उदा., इंधन गळती शोधून काढणे, वापरात नसणारी उपकरणे बंद करणे इ.) (६) ऊर्जा वापरासाठी संदर्भ बिंदू ठरविणे. (७)अधिक तपशीलवार अभ्यास किंवा मापनासाठी क्षेत्रे ओळखणे.

() लक्ष्यित र्जा पडताळा : लक्ष्यित ऊर्जा पडताळा हा बहुधा प्राथमिक ऊर्जा पडताळाच्या प्राप्त माहिती नंतर केला जातो. या पडताळ्यामध्ये निर्देशित केलेल्या लक्ष्यित प्रकल्पांची तपशीलवार माहिती आणि विश्लेषण प्रदान केले जाते. निर्देशित लक्ष्य प्रकल्पाचे उदाहरण म्हणून, एखादी संस्था प्रभावी ऊर्जा बचतीसाठी आपली प्रकाश व्यवस्था, बाष्पपात्र प्रणाली (Boiler System) किंवा संकुचित हवा प्रणाली लक्ष्य करू शकते.

लक्ष्यित ऊर्जा पडताळा प्रकारामध्ये उद्दिष्टांशी संबंधित लक्ष्यित क्षेत्रांच्या सविस्तर सर्वेक्षणासोबत ऊर्जा प्रवाह आणि ऊर्जा खर्चाच्या विश्लेषणाचाही समावेश होतो. या प्रकारच्या पडताळ्यामधून अंतिम प्राप्त परिणाम म्हणजे ऊर्जा बचतीच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या शिफारशी असतात.

() तपशीलवार र्जा पडताळा : हा सर्वसमावेशक पडताळा असून यामध्ये ऊर्जा वापरणाऱ्या सर्व प्रणाली आणि उपकरणांचे मूल्यांकन केले जाते. हा पडताळा ऊर्जा बचत आणि खर्चाचा सर्वांत अचूक अंदाज देतो. सविस्तर ऊर्जा पडताळा हा प्रामुख्याने पुढील तीन मुख्य टप्प्यांत केला जातो : (अ) पडताळा पूर्वीचा टप्पा, (ब) पडताळा दरम्यानचा टप्पा आणि  (क) पडताळा नंतरचा टप्पा.

() पडताळा पूर्वीचा टप्पा : पडताळा पूर्वीचा टप्पा हा दोन भागांमध्ये विभागला जातो :

.क्र. कृती योजना हेतू / परिणाम
टप्पा क्र. १ ·         योजना आणि आयोजन

·         गमन ऊर्जा पडताळा

·         ऊर्जा व्यवस्थापक, उत्पादन / शाखा व्यवस्थापक यांच्यासोबत अनौपचारिक मुलाखत

·         ऊर्जा पडताळा कार्यसंघ स्थापन करणे.

·         वेळेचे नियोजन करून ऊर्जा पडताळा उपकरणे उपलब्ध करून देणे

·         उद्योगाच्या प्रकारानुसार योग्य माहिती जमा करणे.

·         शाखेमध्ये चालणाऱ्या प्रक्रियेशी संबंधित कामांची माहिती घेणे.

·         चालू स्तरावरील कार्यप्रणाली आणि पद्धतींचे प्रथम स्तरीय निरीक्षण करणे.

टप्पा क्र. २ ·         सर्व विभागीय प्रमुख व संबंधित व्यक्तींसोबत प्रास्ताविक बैठक/जागरूकता कार्यक्रम अंमलात आणणे. ·         सर्व विभागांशी सहकार्य वाढविणे

·         प्रत्येक विभागासाठी प्रश्नावली जाहीर करणे

·         ऊर्जा संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे

() पडताळा दरम्यानचा टप्पा : पडताळा दरम्यानचा टप्पा हा खालील भागांमध्ये विभागला जातो :

.क्र. कृती योजना हेतू / परिणाम
टप्पा क्र. १ ·         प्राथमिक माहिती जमा करणे ·         जुन्या नोंदींचे विश्लेषण करणे.

·         प्रक्रिया रचना, प्रक्रिया माहिती आणि प्रक्रिया वेळापत्रकाचा आराखडा

·         वार्षिक ऊर्जेचे बिल आणि ऊर्जा वापराच्या पद्धतींची माहिती.

टप्पा क्र. २ ·         सर्वेक्षण आणि देखरेख दौरा करणे ·         मोजमाप : अधिक आणि अचूक माहिती संग्रहित करण्यासाठी मोटर सर्वेक्षण, रोधकीय आवरण आणि प्रकाश सर्वेक्षण करणे.

·         चालू प्रक्रियेच्या माहितीची खात्री करून घेणे.

टप्पा क्र. ३ ·         निवडलेल्या उपकरणांसाठी तपशीलवार प्रयोगांचे आयोजन ·         चाचण्या / प्रयोग :

-२४ तास ऊर्जा देखरेख

– भार बदलाची शैली ओळखणे.

– उपकरणांच्या कार्यक्षमता चाचण्या इ.

टप्पा क्र. ४ ·         ऊर्जा वापराचे विश्लेषण ·         ऊर्जा आणि साहित्य वापराचा समतोल

·         ऊर्जा अपव्ययाचे विश्लेषण

टप्पा क्र. ५ ·         ऊर्जा संवर्धन संधींची ओळख व विकास ·         ऊर्जा संवर्धनाच्या सुलभ कल्पना विकसित करणे

·         ऊर्जा पडताळावेळी पूर्वी सुचवलेल्या कल्पनांचे पुनरावलोकन करणे

·         नवीन / कार्यक्षम तंत्रज्ञानासाठी विक्रेत्यांशी संपर्क साधणे.

टप्पा क्र. ६ ·         खर्च फायद्याचे विश्लेषण ·         ऊर्जा संवर्धन उपायांचा प्राधान्यक्रम ठरविणे.

·         आकर्षक प्रकल्पांची निवड करणे.

टप्पा क्र. ७ ·         वरिष्ठ व्यवस्थापनासमोर अहवाल सादर करणे ·         दस्तऐवजीकरण, वरिष्ठ व्यवस्थापनासमोर अहवालाचे  सादरीकरण.

() पडताळा नंतरचा टप्पा : पडताळा नंतरचा टप्पा हा ऊर्जा पडताळाचा शेवटचा टप्पा असून यामध्ये खालील कृतींचा समावेश होतो:

.क्र. कृती योजना हेतू / परिणाम
टप्पा क्र. १ ·         अंमलबजावणी आणि पाठपुरावा ·         ऊर्जा संवर्धन उपायांच्या शिफारसीची अंमलबजावणी व साहाय्य करणे ,कामगिरीचे परीक्षण करणे.

·         कृती योजना, अंमलबजावणीचे वेळापत्रक.

·         पाठपुरावा आणि नियतकालिक पुनरावलोकन.

र्जा पडताळ्यासाठी वापरात येणारी महत्त्वाची उपकरणे : ऊर्जा पडताळा घेण्याकरिता ऊर्जा विश्लेषक, अंकात्मक बहुमापक (Digital multimeter), लक्स मापक, जलप्रवाह मापक, तापमान सूचक, इंधन कार्यक्षमता निरीक्षक, वायू गळती शोधक, पायलट ट्यूब आणि मॅनोमीटर, टॅकोमीटर, अद्ययावत ऊर्जा मापक, अंकात्मक पायरोमीटर तसेच सायक्रोमीटर ही उपकरणे प्रामुख्याने वापरली जातात.

र्जा पडताळ्याचे फायदे : प्रत्यक्ष फायदा : ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा खर्च वाचविला जाऊ शकतो.

अप्रत्यक्ष फायदे : (१) संस्थेचा वेळ, इंधन आणि कामगारांचा पुरेपूर वापर देखभाल यामुळे दुरुस्ती खर्च कमी करता येतो. (२) सुधारित उपकरणांच्या वापरामुळे व वाढीव कार्यक्षमतेमुळे अतिरिक्त क्षमतेच्या उपकरणांची गरज कमी होऊन भांडवली खर्च कमी होतो. (३) ऊर्जा पडताळ्यामुळे इतर खर्चातही बचत होते. उदा., पाण्याची मागणी कमी केल्यामुळे पाणी शुल्क कमी होते. (४) कामगारांचा अधिक कार्यक्षम वापर होतो. उदा., स्वयंचलित नियंत्रण प्रणालीचा वापर. (५) कामाची स्थिती सुधारून वाढीव उत्पादकता निर्माण करता येते.

पहा : अंकात्मक बहुमापक.

संदर्भ :

• Hasanbeigi, Ali Industrial Energy Audit Guide Book: Guidelines for conducting an Energy Audit in Industrial Facilities, Lynn Price.

• Turner, W. C. Energy Management Handbook

• ऊर्जा कार्यक्षमता विभाग : संकेतस्थळ (Website : Bureau of Energy Efficiency)

समीक्षण : ए. ए. धर्मे