पश्चिम यूरोपात, यूरोपियन आर्थिक सहकार समिती निर्मित सोव्हिएट युनियनच्या अंतर्गत जानेवारी १९४९ मध्ये कॉमेकॉनची स्थापना करण्यात आली. कॉमेकॉन समुहात तत्कालीन सोव्हिएट युनियन, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, व रुमानिया हे मूळ सदस्य देश आहेत. नंतर फेब्रुवारी १९४९ मध्ये अल्बानिया, तसेच १९५० मध्ये जर्मनीच्या विभाजनातून निर्मित पूर्व जर्मनी कॉमेकॉनचा सदस्य झाला. त्याच प्रमाणे जून १९६२ मध्ये मंगोलिया, १९६४ मध्ये यूगोस्लाव्हिया, १९७२ मध्ये क्युबा आणि तर १९७८ मध्ये व्हिएटनाम हे देश कॉमेकॉनचे सदस्य झालेत. पूर्व यूरोपिय देशांमध्ये राजकीय, आर्थिक सरळबांधणी करण्याकरिता सोव्हिएट युनियनमध्ये १९४७ मध्ये मोलोटोव्ह योजना आखली गेली. या योजनेअंतर्गत कॉमेकॉनची स्थापना करण्यात आली. कॉमेकॉनचा उद्देश आर्थिक नियोजन, व्यापार, विकास व संशोधन यांना प्रोत्साहन देणे हा होता. आर्थिक विकासात समन्वय हे कॉमेकॉनच्या स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट होते; परंतु १९९१ मधील मुक्त बाजार धोरणामुळे कॉमेकॉनचे अस्तित्व धोक्यात आले.

दक्षिण पूर्व आशियायी देशातील ओपेक प्रभावाला पश्चिम यूरोपमधील पूर्व ब्लॉकला ‘कॉमेकॉन’ हे प्रत्युत्तर होते. दक्षिण पूर्व आशियाई देशातील रशियाचा कॉमेकॉनद्वारे वाढणारा प्रभाव टाळण्याकरिता १९५७ मध्ये यूरोपियन आर्थिक समुदायाची स्थापना केली गेली; तर १९६१ मध्ये आर्थिक सहकार व विकास संघटना यांची स्थापना करण्यात आली. कॉमेकॉनच्या निर्मितीमध्ये प्राथमिक घटक सहकार्य आणि मध्य यूरोपातील देशांच्या आर्थिक पातळीवर आंतरराष्ट्रीय सामाजिक हितसंबंध मजबूत करण्याची जोसेफ स्टॅलीन यांची इच्छा होती. कॉमेकॉनच्या पायाभरणीमधे जोसेफ स्टॅलीन यांचा देशांतर्गत सहकार्य आणि यूरोपातील छोट्या राज्यांच्या आर्थिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय समाजवादी नातेसंबंध आणखी दृढ करणे हा दृष्टीकोन हे प्राथमिक घटक ठरले.

एक परिवर्तनीय चलन आणि बाजारपेठेची आवश्यकता असूनही चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी व पोलंड यांना मार्शल प्लॅनमधे रस होता. यामुळे सोव्हिएट युनियनपेक्षा यूरोपियन बाजाराचे अधिक मजबुतीकरण झाले असते; मात्र स्टॅलीन यांना ते स्वीकार्य नव्हते. १९४७ मधे स्टॅलीन यांनी साम्यवादी सत्ता असलेल्या सरकारांना यूरोपियन पुन:प्राप्ती योजनेच्या पॅरिस परिषदेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. या घटनेचे वर्णन दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात ‘सत्यक्षण‘ (दी मूव्हमेंट ऑफ ट्रुथ) असे केले गेले आहे.

शेजारच्या बफर राज्यांपासून इतर राजकीय शक्तींना लांब ठेवणे हा स्टॅलीन यांचा दृष्टीकोन होता. गॅट करारातील व्यापारातील सर्व भागीदारांना अभेदभावी वागणुकीचे तत्त्व साम्यवादी एकतेच्या दृष्टीकोनातून सुसंगत नव्हते. कॉमेकॉनची निर्मिती मॉस्को आर्थिक परिषदेमध्ये केली गेली (५ ते ८ जानेवारी १९४९). कॉमेकॉनच्या मूळ सदस्य देशांनी या परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले. या संघटनेची औपचारिक घोषणा २५ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आली. एक महिन्याने अल्बानिया, तर १९५० मध्ये पूर्व जर्मनी याचे सदस्य बनले. सुरुवातीच्या काळात नियोजनाचा वेग जास्त होता. निकोलाय वोझ्नेसेंकी या सोव्हिएट युनियनच्या नियोजन समितीच्या अध्यक्षांच्या तंत्रसत्ताधारी व किंमत आधारित दृष्टीकोनाला बाजुला ठेवल्यानंतर नियोजनाची दिशा राष्ट्रीय आर्थिक योजनेच्या समन्वयाच्या दिशेने वळलेली दिसून येते. या सर्वांना एकमताने मंजुरी मिळाल्याने सरकारकडून त्याचे रूपांतर स्वतंत्रपणे धोरणात करण्यात आले. १९५० ते १९६० या दशकात सोव्हिएट युनियन स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करित होता. त्या कारणाने जोसेफ स्टॅलीन यांनी कॉमेकॉनच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करून अंतर्गत दृष्ट्या सोव्हिएट युनियन स्वयंपूर्ण कसा असेल, यासाठी घटनात्मक साधनांपेक्षा त्याची दृष्टी कॉमेकॉनच्या कामकाजाची व्याप्ती सुलभीकरणापुरतीच मर्यादित ठेवली.

या कालावधीत ‘सोफीया तत्त्व’ हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यात बौद्धिक संपदा, अधिकार विफल केले गेले. याद्वारे सदस्य देशांकडील तंत्रज्ञान हे इतर सदस्य देशांना नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करून दिले गेले. याचा फायदा साहजिकपणे कमी औद्योगिकरण झालेल्या कॉमेकॉनच्या सदस्य देशांना झाला. विशेषतः तांत्रिक दृष्ट्या मागासलेल्या सोव्हिएट युनियन, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरी आणि पूर्व जर्मनीच्या यांना झाला. हे तत्त्व १९६८ नंतर कमी प्रभावशाली आणि विफल झाले; कारण त्यामुळे नवीन संशोधनाला चालना मिळत नव्हती. तसेच सोव्हिएट युनियन आता तांत्रिक दृष्ट्या प्रगत होऊ लागला होता.

स्टॅलीन यांच्या मृत्युनंतर कॉमेकॉन सदस्य देशांना पुन्हा एकदा पायाभरणीसाठी नव्याने संधी मिळाली. स्वयंपूर्णतेच्या धोरणाचा स्वीकार केलेल्या या सदस्य देशांनी पुन्हा परस्पर विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात केली. त्याकरिता परस्पर समन्वय साधला जावा या हेतुने १९५६ मध्ये दहा कायम सदस्य देशांनी स्थायी समिती स्थापन केली. पंचवार्षिक योजनांवर या काळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सोव्हिएट युनियनने कॉमेकॉन सदस्य देशांनी उत्पादित केलेल्या वस्तुंबदल्यात तेलाचा वापर सुरू केला. त्यामुळे कॉमेकॉनला पुन्हा एकदा संघर्षाचा सामना करावा लागला. पोलिश निषेध व हंगेरियन बंडाळी यांमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक व आर्थिक बदल झाले. यानंतरच्या काळात व्यापारातील वाढ व आर्थिक एकत्रीकरण यांबाबतच्या बदलांच्या मालिकेलाच सुरुवात झाली. यामधे हस्तांतरणीय रूबलची सुरुवात याचाही समावेश होतो.

१९६७ पर्यंत कॉमेकॉनचे कार्य एकमत करार तत्त्वावर सुरू होते. याचा परिणाम म्हणजे अपयश होते. १९६७ मध्ये कॉमेकॉनने ‘स्वारस्य पक्ष तत्त्व’ स्वीकारले या तत्त्वानुसार कोणताही देश आपल्या प्राथमिकतेनुसार कोणताही प्रकल्प निवडू शकेल आणि इतर सदस्य राज्ये त्यांची कामे कॉमेकॉनची समन्वय यंत्रणा वापरून करू शकतील. १९७० च्या शतकातील कॉमेकॉनचे एक यश म्हणजे सोव्हिएट खनिज तेल क्षेत्र विकसित होत गेले. त्यामुळे तेल व खनिजांच्या कमी किमतीचा फायदा कॉमेकॉनच्या सदस्य देशांना झाला. त्याचा परिणाम १९७० च्या मध्यापर्यंत कॉमेकॉन सदस्य देशांची आर्थिक वृद्धी वेगाने झाली. १९७३ च्या तेलाच्या पेचप्रसंगाचा फटका त्यांना बसला नाही.

वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती कार्यक्रम व मिखाइल गोर्बाचेव्ह यांचा उदय यांमुळे १९८५ च्या दरम्यान कॉमेकॉनमध्ये सोव्हिएटचा प्रभाव वाढला. कार्यक्षम शास्त्रीय व तांत्रिक आधारावर आर्थिक सहकार्याचा विकास साध्य व्हावा, या हेतुने वैज्ञानिक व तांत्रिक कार्यक्रम अधिक व्यापक करण्यात आला. या काळास पेरेस्त्रोइका (पुर्नरचना) म्हणून ओळखले जाते. कॉमेकॉन देशांच्या आर्थिक पायाभरणीसाठी गोर्बाचेव्ह यांच्याकडून केला गेलेला हा एक प्रयत्न होता. त्यांच्या दूरदृष्टीला २००० पर्यंत विज्ञान ही थेट उत्पादक शक्ती बनेल, असे अंदाजित होते. अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल करण्यासाठी यंत्रसंच व सामग्रीचे नुतनीकरणामुळे चालना मिळेल, असे त्यांना वाटून त्यानुसार त्यांनी पावले उचलली. अनेक आघाड्यांवरील अनेक आश्वासनांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला व हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही.

१९८८ मध्ये आलेल्या उदारीकरणामुळे कॉमेकॉन सदस्य देशांना यूरोपियन समुदायासोबत सरळपणे वाटाघाटी करण्याची परवानगी मिळाली. सिनात्रा तत्त्वानुसार सोव्हिएट युनियनने सोबतच्या देशांना स्वतंत्रपणे अंतर्गत बाबी हाताळण्याची परवानगी दिली. कॉमेकॉनचे अस्तित्व संपुष्टात येत असल्याची ही नांदीच होती. कॉमेकॉनचे शेवटचे अधिवेशन बुडापेस्ट येथे झाले व ९० दिवसांच्या आत कॉमेकॉन संपुष्टात आणण्याविषयी या अधिवेशनात संमती झाली. २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएट युनियन विघटित झाले; परिणामी कॉमेकॉन देखील संपुष्टात आले.

संदर्भ :

  • इनसायक्लोपीडीया ब्रिटानिका.
  • न्यु वर्ल्ड इनसायक्लोपीडीया.

समीक्षक : राजस परचुरे