ऑस्टिन, जॉन : (१७९०-१८५९). ब्रिटिश कायदेतज्ञ आणि न्याय्य शास्त्रज्ञ. त्यांनी अनेक कायदेशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यांनी राज्यशास्त्राची संबंधीत एकसत्तावादी सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला. राज्यशास्त्रात प्रामुख्याने सार्वभौमत्वाच्या एकसत्तावादी सिद्धांतासाठी ऑस्टिन जॉन प्रसिद्ध आहेत. ऑस्टिन वर बेंथमच्या विचाराचा प्रभाव होता. The Province Of Jurisprudence Determined (१८३२) या त्यांच्या ग्रंथात त्यांनी सार्वभौमत्व हे अमर्याद आणि अविभाज्य असते, असे विवेचन केले. त्याची आज्ञा म्हणजे कायदा होय हे स्पष्ट केले आहे. सार्वभौमत्व हे कायद्याचे उगमस्थान मानून सार्वभौम सत्ता अनियंत्रित असते असे त्याने स्पष्ट केले. त्यामुळेच त्याने निसर्गसिद्ध हक्कांची संकल्पना अमान्य केलेली दिसते. सार्वभौमत्व विषयीची अस्पष्टता त्याने  दूर केली. एकसत्तावादी सार्वभौमत्वाची संकल्पना स्पष्टपणे मांडण्याचे श्रेय ऑस्टीन कडे जाते. मात्र त्याची सार्वभौमत्वाची संकल्पना औपचारिक आणि व्यवहाराला सोडून आहे अशी टीकाही केली जाते. त्याचा विचार खूपच वादविषय  ठरलेला आहे.

संदर्भ :

  •  Bix, Brian, John Austin, The Stanford encyclopaedia of philosophy, Stanford University, 2019.