(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). मोबाइल टेलिफोनमध्ये समाकलित केलेला सुवाह्य संगणक. स्मार्टफोनमध्ये दृश्य पटलासह (एलसीडी; LCD; Liquid Crystal Display) वैयक्तिक माहिती व्यवस्थापित करणारी आज्ञावली -जसे इलेक्ट्रॉनिक कॅलेंडर आणि ॲड्रेस बुक -साधारणत: वैयक्‍तिक अंकात्मक साहाय्यक (PDA; पीडीए) आणि परिचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम; Operating System) समाविष्ट असते, जी इतर संगणक सॉफ्टवेअरला वेब ब्राउझिंग, ई-मेल, संगीत, व्‍हिडिओ आणि इतर अनुप्रयोग व्यवस्थापित करण्यास परवानगी देते. थोडक्यात, स्मार्टफोन हे सुवाह्य संगणक असून ते मोबाइल टेलिफोनमध्ये समाकलित केले आहे.

पहिला स्मार्टफोन आयबीएमने तयार केला असून 1993 मध्ये बेलसाउथ (BellSouth; एटी अँड टी कॉर्पोरेशन कंपनीचा पूर्वीचा एक भाग) यांनी विकला होता. यात त्याचे कॅलेंडर, अ‍ॅड्रेस बुक, कॅल्क्युलेटर आणि इतर कार्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी स्पर्श-पटलाचा (touchscreen) वापर होत असे. पुढे संगणकातील घन-स्मृती आणि समाकलित मंडले कमी खर्चीक झाल्यामुळे स्मार्टफोन हे संगणकासारखे झाले आणि इंटरनेट प्रवेश यांसारख्या अधिक प्रगत सेवा त्यात शक्य झाल्यात. 2001 मध्ये प्रगत सेवा तथाकथित थर्ड-जनरेशन (3G; थ्री-जी) मोबाइल फोन नेटवर्क अस्तित्त्वात आल्यानंतर सर्वव्यापी झाल्यात. थ्री-जी पूर्वी बहुतेक मोबाइल फोन टेलिफोन कॉल व मजकूर संदेशास पुरेशा दराने डेटा पाठवू किंवा प्राप्त करू शकत होते. थ्री-जीचा वापर करून, छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, संगीत फाइल्स, ई-मेल आणि बरेच काही पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी संप्रेषण बिट (Bit) दरावर होते.

बहुतेक स्मार्टफोन उत्पादकांकडे त्यांच्या परिचालन प्रणालीचा परवाना आहे. उदा., मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे विंडोज मोबाइल ओएस, सिम्बियन ओएस, गुगलचे अँड्रॉइड ओएस किंवा पाम ओएस. रिसर्च इन मोशनचे ब्लॅकबेरी आणि ॲपल इनकॉ.चे आयफोन यांची स्वतःची मालकी असणारी परिचालन प्रणाली आहे.

स्मार्टफोनमध्ये एकतर कीबोर्ड समाकलित केलेला टेलिफोन नंबर पॅडसह असतो किंवा मजकूर संदेशन, ई-मेल आणि वेब ब्राउझर वापरण्यासाठी मानक “क्यूडब्ल्युइआरटीवाय कीबोर्ड” (QWERTY) असतो. आभासी- कीबोर्ड ची रचना एका स्पर्श-पटलावर समाकलित केली जाऊ शकते.

स्मार्टफोनमध्ये छायाचित्रे आणि लघु व्हिडिओ मुद्रित करणे आणि प्रसारण करण्यासाठी कॅमेरा त्यात समाविष्ठ असतो. याव्यतिरिक्त, बरेच स्मार्टफोन वाय-फाय हॉट स्पॉट्स मधील व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) द्वारे प्रवेश करू शकतात. वाढत्या क्षमतांचे सुवाह्य उपकरण आणि पारेषित करावायाचे प्रोटोकॉल (नियम) यांमुळे स्माटफोन नवनवीन शोधांनी आणि कल्पनात्मक अनुप्रयोगांनी सक्षम होत आहेत. उदा., संवर्धित वास्तविकता. ज्यामध्ये स्मार्टफोनमसील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) स्थळाची चिप (Chip; चकती) दुकानाची ओळख, आवडीचे ठिकाण, भूभागावरील बरीच ठिकाणे दर्शविण्यासाठी फोनच्या कॅमेरा दृश्यावर आच्छादित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

स्मार्टफोनच्या अनेक वापरासोबतच मोबाइल बँकिंग पेमेंट, फॅक्स करणे, मोबाइल गेमिंग, म्युझिक आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग करणे यांसाठी सुद्धा त्याचा वापर होतो.

पहा : मोबाइल उपकरणे, मोबाइल परिचालन प्रणाली.

कळीचे शब्द :  #स्मार्ट #टेलिफोन #वाय-फाय #व्हिडिओ #स्ट्रिमिंग #प्रोटोकॉल

संदर्भ : https://www.britannica.com/technology/smartphone

समीक्षक  : रत्नदीप देशमुख