(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). संगणकाचा प्रकार. लॅपटॉप संगणक आणि स्मार्टफोन यांच्या आकारांदरम्यान अर्थातच मध्यम असतो. सुरुवातीलस टॅबलेट संगणकांनी माहिती इनपुट करण्यासाठी कीबोर्ड किंवा स्टाईलसचा (stylus)  वापर केला, परंतु नंतर या पद्धती स्पर्श पटलाद्वारे (टच स्क्रीनद्वारे; Touch screen) विस्थापित झाल्या.

स्टायलॅटार (Stylator; 1957) आणि आरएएनडी टॅबलेट (RAND Tablet; 1961) या टॅबलेट  संगणकाच्या पूर्वीच्या मोठ्या संगणकात इनपुट करण्यासाठी स्टाईलस वापरला गेला. 1968 मध्ये युटा विद्यापठाचे पदवीधर विद्यार्थी अ‍ॅलन के यानी लहान, शक्तिशाली टॅबलेट शैलीतील संगणकाची कल्पना मांडली, ज्याला नंतर त्यांनी डायनाबुक (Dynabook) म्हटले  गेले.  तथापि, के यांनी प्रत्यक्षात कधीही डायनाबुक तयार केले नाही. कॅंब्रिज रिसर्चचे झेड88 (Z88) आणि लिनस टेक्नोलॉजीचे ’राइट-टॉप (Write-Top)  पहिले टॅबलेट संगणक होते’, त्यांना 1987 मध्ये सादर केले गेले. झेड88 ने मुख्य टॅबलेट संगणकाचा भाग असलेल्या कीबोर्डद्वारे इनपुट स्वीकारले, तर राइट-टॉप याने स्टालसद्वारे इनपुट स्वीकारले.  0.9 किलो (2 पौंड) वजनाचे  झेड88 हे 4 किलो (9 पाउंड) राइट-टॉपपेक्षा बरेच सुवाह्य (पोर्टेबल;Portable) होते, कारण ते अंतर्गत फ्लॉपी डिस्क ड्राइव्हसह आले होते.

इतर बर्‍याच प्रतिकृतींनी झेड88 आणि राइट-टॉपचे अनुसरण केले, परंतु जोवर ॲपल इनकॉ. यांचे आय-पॅड (iPad) 2010 पर्यंत प्रदर्शित झाले नाही तोवर त्यांची मागणी वाढली नाही. आयपॅड हे स्पर्श-पटल (टच-स्क्रीन; Touch Screen) उपकरण असून त्यांचे पटल, तिरके मोजल्यास सु. 24.6 सेंमी. (9.7 इंच) आहे. ते अंदाजे 1.2 सेंमी. (0.5 इंच) जाड होते आणि त्याचे वजन 0.7 किलो (1.5 पाउंड) होते. ॲपलच्या आयफोन (iPhone) प्रमाणेच आयपॅड बोटाच्या स्पर्शाने वापरले गेले. आयपॅड त्याच्या स्पर्श पटलावर उच्च-क्षमतेचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यास सक्षम होते. आयपॅड मधे आयट्यून्स (iTunes) सारखे काही अनुप्रयोग समाविष्ट करण्यात आले होते आणि आयफोनसाठी उपलब्ध असणारे सर्व अनुप्रयोग चालवू शकत होते.  बर्‍याच मोठ्या प्रकाशकांच्या भागीदारीत ॲपलने आयपॅडसाठी स्वतःचे ई-बुक (e-Book) म्हणजेच आयबुक (iBooks) हे अनुप्रयोग तयार केले. आयबुक स्टोअर इंटरनेटद्वारे प्रवेशयोग्य विकसित केले.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब (Samsung Galaxy Tab), मोटोरोला झूम (Motorola Xoom) आणि एचपी टचपॅड (HP TouchPad) यांसारख्या इतर टॅबलेट संगणकाने आयपॅडचे अनुकरण केले.  जगभरात विक्री झालेल्या टॅबलेट संगणकाची बाजारपेठ 2009 मध्ये केवळ २ दशलक्षांवरुन 2010 मध्ये २० दशलक्षांवर गेली. ॲपलचे आयपॅड मिनी (iPad mini) आणि अ‍ॅमेझॉन किंडल फायर (Amazon Kindle Fire) यांसारखी छोटी उपकरणे तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोट (Samsung Galaxy Note) सारख्या आकारांच्या बाबतीत लहान टॅबलेट आणि स्मार्टफोनच्या दरम्यान मध्यस्थ ठरणारी उपकरणे सुद्धा बाजारात आलीत. 2014 मध्ये 233 दशलक्ष टॅबलेट संगणक विकल्या गेले आणि त्यानंतरच्या तुलनेत टॅबलेट संगणकांच्या विक्रीत घट झाली. कारण स्मार्टफोनची जागा टॅबलेट संगणक  घेऊ शकत नाही. [स्मार्टफोन].

टॅबलेट संगणकाचे भौतिक आकार, परिचालन प्रणालीचे प्रकार, आदान-प्रदान तंत्रज्ञान आणि वापर यांद्वारे अनेक प्रकारांमध्ये सहजतेने वर्गीकरण केले जाऊ जाते. उदा., स्लेट, मिनी टॅबलेट, फाबलेट, टू-इन-वन, गेमिंग टॅबलेट, बुकलेट आणि बिझनेस टॅबलेट इत्यादी.

पहा : मोबाइल उपकरणे, मोबाइल परिचालन प्रणाली.

कळीचे शब्द :  #स्मार्ट #टेलिफोन #वाय-फाय #व्हिडिओ #स्ट्रिमिंग #प्रोटोकॉल.

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख