एस्प्राँथेदा, होसे दे : (२५ मार्च १८०८ – २३ मे १८४२). सुप्रसिद्ध स्पॅनिश कवी. गीत कवितेमध्ये स्वच्छंदतावादी रचना करणारा क्रांतिकारक कवी म्हणून त्याची ओळख आहे. यांचा जन्म स्पेनमधील आलमेंद्रालेहो या शहरात एका लष्करी कुटुंबात झाला. इ.स.१८२० मध्ये माद्रीदला आल्यानंतर तिथल्या सॅन माटेओ या स्पॅनिश शाळेमध्ये त्याचे शिक्षण मध्ये पूर्ण झाले (१८२३). आलमेंद्रालेहो या शहरात तेव्हा स्पॅनिशमध्ये स्वतंत्र युद्ध सुरू असल्याने त्यांच्या कर्नल वडिलांमुळे त्यांना बरेच फिरायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या बालमनावर युद्धाच्या शोकांतिकाचा खूप खोलवर परिणाम झाला. आल्बेर्तो लिस्ता ह्या स्पॅनिश विद्वानाकडे शिक्षण घेत असताना वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच होसेदे हा क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावरू लागला. तेथे त्याला रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सदस्य मिळाले.

क्रांतिकारी कार्यासाठी त्याला अनेकदा तुरुंगात डांबण्यात आले. परिणामत: त्याला स्पेनमधील ग्वादालाहारा येथे इ.स.१८२३ मध्ये तुरूंगवास भोगावा लागला. पाच वर्ष तुरूंगवास भोगून त्याच्या कर्नल वडिलांनी त्याला जामीन मिळून तेथून पळ काढायला सांगितल्यानंतर जिब्राल्टर, लिस्बन, लंडन, पॅरिस अशा ठिकाणी तो वास्तव्य करू लागला. तेव्हा त्याने कवितेच्या लेखनाचे कौशल्य आत्मसात करून अतिशय लहान वयात कविता लिहिल्या. होसे दे हा लहान पणापासून धार्मिक विरोधी मनोवृत्तीचा होता. लहानपणापासून त्याला युद्धाच्या शोकांतिका वाचण्याचा छंद असल्याने त्याला युद्ध नीती बदल बरीच माहिती होती. इ.स. १८२६ ला लिस्बनला आल्यानंतर तो लेखक म्हणून चरितार्थ करू लागला. या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर लॉर्ड बायर्नच्या आणि स्कॉटच्या काव्याचा प्रभाव  पडला. त्याच्या पोसियास (१८२३) या गीतकवितेवर लॉर्ड बायर्न आणि स्कॉट या दोघांचा प्रभाव दिसतो.

१८३१ मध्ये टेरेसा मंच सोबत विवाह बद्ध झाला. त्यांनंतर इ.स.१८३३ मध्ये स्पेनला आल्यानंतर सैन्यात तो अधिकारी झाला. १८३५-३६ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या क्रांतिकारी उठावात त्याने सक्रिय भाग घेतला. १८४१ मध्ये हेग येथील स्पॅनिश वकिलातीचा तो सचिव झाला. १८४२ मध्ये तो स्पेनच्या संसदेचा सभासद झाला. आपल्या पत्नीच्या आठवणी त्याने एल डायब्लो मुंडो (१८३९), कंन्ट्रो (१८३९) या दोन पुस्तकातून मांडल्या. अल्प काळातच देशभक्ती, उदारमतवादी कवितेच्या जगातून तो दूर फेकला गेला. त्याचकाळात त्याने डेव्हिलेश वर्ल्ड (१८४०) या कवितेची रचना केली. एस्प्रोन्सेडाने हेग (१८४०), अल्मेरिया (१८४२) हे त्याचे महत्त्वाची ग्रंथ होत.  त्याच्या काव्यावर नैराश्याची आणि भ्रमनिरासाची गडद छाया आहे. देशभक्ती आणि स्वातंत्र्याकांक्षा त्याच्या काव्यातून उत्कटपणे आविष्कृत झालेल्या दिसतात. ‘स्पेनचा बायरन’ म्हणून तो ओळखला जातो. वयाच्या अवघ्या ३४ वर्षी माद्रिद्र येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :