संगणक सुरक्षेतील एक शब्द. संगणक प्रणालीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्याच्या क्षमतेला परिभाषित करतो. ग्रेगरी वाईट यांच्या मते, “कार्यालयात प्रत्यक्ष प्रवेश दिल्यास, अनुभवी हल्लेखोर संस्थेच्या संगणक प्रणाली आणि नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती त्वरीत शोधण्यास सक्षम असतात”. बहुतेकदा सुरक्षा तज्ञ आणि इतर ‘भौतिक प्रवेश’ आणि ‘तार्किक प्रवेश (Logical Access)’ यांची तुलना करतात, कारण वापरकर्ते हार्डवेअरशी दूरस्थ व्यवस्थेद्वारे इंटरनेट-प्रोटोकॉल-ॲक्सेस सारख्या पद्धतींचा वापर करून संवाद साधतात. भौतिक प्रवेशामध‌्ये हार्डवेअर ठेवलेल्या वातावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. अनेक सल्लागार भौतिक प्रवेशाला जोखीम व्यवस्थापन मानतात.

कंपन्या सामान्यत: हार्डवेअर यांना अनधिकृत भौतिक प्रवेशापासून समान सामान्य सुरक्षा प्रक्रियेद्वारे संरक्षित करतात, कारण ते व्यापार गुपिते (Trade secrets) आणि व्यवसाय स्थानावरील इतर सर्व गोष्टींचे संरक्षण करतात. या संरक्षणांमध्ये इमारतींवरील ओळखचिन्ह (ID Badges) आणि सुरक्षा फाटक (Security Gates), तसेच बायोमेट्रिक ओळख सारख्या अधिक प्रगत पद्धतींचा समावेश आहे.

अनधिकृत भौतिक प्रवेश ही एक मोठी जोखीम आहे. अनधिकृत भौतिक प्रवेश ही समस्या फक्त व्यावसायिक जगतापूर्ती मर्यादित नसून माहिती तंत्रज्ञान जगतातही ही समस्या आहे. आधुनिक युगात, भौतिक प्रवेश बहुतेकदा भौतिक प्रवेश नियंत्रण प्रणालीद्वारे (Physical Access Control System) नियंत्रित केली जाते, उदा., इलेक्ट्रॉनिक दरवाजे वापरण्यासाठी अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांसह (Authorization Guidelines) कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आरेखित केले जातात.

भौतिक प्रवेश नियंत्रण प्रणाली (Physical Access Control System) :  भौतिक प्रवेश नियंत्रण प्रणाली भौतिक प्रवेशाच्या आसपासच्या सुरक्षिततेची अंमलबजावणी करण्याचा कणा आहे. ही प्रणाली संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अवलंब करून कोणाला प्रवेश आहे हे निश्चित करते. यात खोल्या, उपकरणे, तिजोरी इत्यादी वापरांसाठी प्रवेश निश्चित केला जातो. अशा प्रणालीमध्ये विविध प्रवेश स्तरांचा डेटाबेस आणि त्या प्रवेश स्तरांशी संबंधित लोकांच्या सूची असतात. हे ओळखपत्रे (credentials) प्रदान करणार्‍या व्यक्तीना प्रवेश देते.

भौतिक प्रवेश नियंत्रणाचे महत्त्व :  भौतिक प्रवेश नियंत्रण हे चांगल्या सुरक्षा योजनेच्या केंद्रस्थानी असते, डिजिटल सुरक्षेसह ते आणखीनच चांगले काम करते. डिजिटल सुरक्षा माहितीचे संरक्षण करते – ज्याचा गैरवापर एखाद्या कंपनीची किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा, वित्त किंवा कार्यप्रदर्शन खराब करण्यासाठी केला जाऊ शकतो. भौतिक सुरक्षितता लोकांना आणि उपकरणांना अधिक दृष्य मार्गाने (Visible Way) संरक्षित करते.  भौतिक अडथळे (Physical Barriers) अज्ञात लोकांना धोकादायक सामग्री (Hazardous Materials) आणि उपकरणांसह सर्व्हर रूम किंवा इतर जागांमध्ये भटकण्यापासून रोखू शकतात.

कळीचे शब्द : #PhysicalAccess #LogicalAccess #UnauthorizedPhysicalAccess #PhysicalAccessControl #PhysicalAccessControlSystem

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर