राजकीय परिपत्रक म्हणून ओळखला जाणारा एक अर्थशास्त्रीय ग्रंथ. यास ‘साम्यवादाचा जाहीरनामा’ असे म्हणतात. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ व अर्थतज्ज्ञ कार्ल मार्क्स व अर्थतज्ज्ञ फ्रीड्रिख एंगेल्स यानी इ. स. १८८४ मध्ये हा ग्रंथ लंडन येथे प्रसिद्ध केला. या ग्रंथामुळे साम्यवादी विचारसरणीचा पाया रचला गेला. जगातील प्रभावशाली राजकीय कागदपत्रांपैकी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ एक प्रमुख दस्तऐवज म्हणून ओळखला जातो.

मार्क्स आणि एंगेल्स यांनी अनेक विचारवंतांच्या प्रभावातून कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला आहे. जर्मन आदर्शवादी तत्त्वज्ञान, फ्रेंच समाजवाद आणि इंग्रज व स्कॉटीश राजकारणातील अर्थव्यवस्थांपासून या ग्रंथरचनेसाठी प्रेरणा घेतल्याचे दिसून येते. तद्वतच फ्रेंच तत्त्वज्ञ जॅक डेर्रीदा यांच्या पुनर्रचना संकल्पना आणि शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इतिहासाचा प्रभाव मार्क्स आणि एंगेल्स यांच्या लेखनावर जाणवतो. या प्रभावामध्ये साम्यवादाचा भविष्यकालीन प्रभाव भविष्यण्याऐवजी वर्गसंघर्ष आणि भांडवलशाहीचा संघर्ष, तसेच भांडवलशाहीतील उत्पादन यांविषयी विश्लेषण या ग्रंथात केले आहे. इतिहासापासून अस्तित्वात असलेला सर्व समाज हा वर्गसंगर्षाचा इतिहास आहे, हा या पुस्तकाचा मुख्य सारांश आहे. भांडवलशाही समाज समाजवादामध्ये परावर्तीत होईल, असा विश्वास विचारवंताना वाटतो. भांडवलशाहीचे उच्चाटन होऊन जगभरात साम्यवादी क्रांती प्रस्थापित होईल, असा शेवटी पुस्तकामध्ये निष्कर्ष काढलेला आहे.

साम्यवादावर टीका करण्यापेक्षा साम्यवाद स्वीकारनेच योग्य असल्याचे ग्रंथात म्हटले असून या ग्रंथात मिख्यत: पुढील चार घटक दिसून येतात.

  • (१) भांडखोर भांडवलदार व कामगार वर्ग : ग्रंथाच्या पहिल्या घटकामध्ये इतिहासातील भौतिकवादी संकल्पना स्पष्ट केली आहे. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. समाजात भांडवलशाही नामक अल्पसंख्यांक औद्योगिकांच्या हुकूमशाहीखाली बहुसंख्य कामगार वर्ग दबलेला असून कामगार वर्ग त्याला ‘सर्वहारा वर्ग’ असे महटले आहे. हा वर्ग उत्पादन मालकाच्या भांडवलदाराच्या विरोधात वर्गसंघर्ष आढळून येतो. म्हणजेच कामगारांचा श्रमीकसंघ व भांडवलदाराचा संघ या दोघांमध्ये वर्गसंघर्ष होवून या संघर्षाचे रूपांतर क्रांतीमध्ये होतो आणि हा वर्गसंघर्ष समाप्त होवून समाजाची पुनर्रचना होईल किंवा वाद घातलेल्या वर्गाचा सामान्य नाश होईल. भांडवलशाहीमध्ये भांडवलदार कामगारांकडून ठरवून दिलेल्या कार्यापेक्षा अतिरिक्त कार्य करून घेवून स्वत:साठी नफा मिळवितात आणि भांडवल म्हणजे पैसा जमा करतात; परंतु असे करताना हा भांडवलदार वर्ग स्वतःच्या विनाशाची बिजे स्वतःच पेरतो, स्वतःची कबर स्वतःच खोदतो असे या ग्रंथात म्हटले आहे; कारण कामगारांना आपल्यावरील अन्यायाची व स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊन ते क्रांतीद्वारे भांडवलशाहीचा नाश करतील. भांडवलशाही संपृष्टात येऊन साम्यवादाकडे समाजाची वाटचाल होईल.
  • (२) कामगार वर्ग आणि साम्यवाद : साम्यवादी पक्षातील लोक हे कामगार वर्गांना विरोध करणार नाहीत, तर सर्वसामान्य जनतेच्या इच्छेचे आणि जगभरातील कामगार वर्गाच्या हिताचे सामान्य रक्षण करेल. साम्यवादी वर्ग हा कामगार वर्गांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यास सहकार्य करेल. कामगारांना विनामूल्य सहकार्य व प्रेम देऊन त्यातून भांडवलशाहीच्या विकासाठी प्रेरित करेल. साम्यवादी गट कामगाराना विविध श्रमसंघामार्फत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रेरित करेल. यातूनच प्रगतीशील उत्पन्न कर, वारसाहक्क व खाजगी मालमत्ता नष्ट करणे; बालमजुरीचे उच्चाटन; मोफत सार्वजनिक शिक्षण; वाहतूक व दळणवळणासारख्या सेवेचे राष्ट्रीयीकरण; राष्ट्रीय बँकेमार्फत प्रत्ययाचे केंद्रीकरण आणि सार्वजनिक मालकीचा विस्तार या सर्व बाबी साधल्या जातील. ज्याच्या अंमलबजावणीमुळे एक वर्गहीन समाज निर्माण होईल असे ग्रंथरचनेत नमुद केल्याचे दिसून येते.
  • (३) समाजवादी आणि साम्यवादी साहित्य : प्रतिक्रीयात्मक समाजवादाला पुराणमतवादी किंवा भांडखोर समाजवाद आणि गंभीर उदारमतवादाला समाजवाद व साम्यवाद यांमधील फरक आहे. कामगार वर्ग या सर्वांमध्ये फरक ओळखतो आणि काय इष्ट आहे याविषयी कामगार वर्गाची भूमिका क्रांतिकारक ठरते. ज्यामध्ये हा वर्ग या सर्व समाजवादाला झुगारून देऊन साम्यवादाकडे वाटचाल करतात.
  • (४) विविध विरोधी पक्षांशी संबंधित साम्यवादांचे स्थान : या पुस्तकात फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड आणि जर्मनी यांसारख्या देशांत एकोणिसाव्या शतकामध्ये विशिष्ट देशांतील संघर्षावर साम्यवादी स्थितीविषयी चर्चा केलेली आढळून येते. यात ‘भांडखोर भांडवलशाहीची पूर्वसंध्या’ असे वर्तवून लवकरच भाडवलशाही नष्ट होणार होऊन जागतिक क्रांती अनुसरण करेल आणि सामाजिक लोकशाही निष्ठेने कार्य करेल. तसेच इतर साम्यवादी क्रांतीचे धैर्याने समर्थन करत आहे. सयुक्त राष्ट्रांमधील विविध देशांतील श्रमशक्तींना एकत्र येऊन संघठित करण्याचे आवाहन या ग्रंथात केले आहे.

कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथाचा प्रभाव विसाव्या व एकविसाव्या शतकांतील अनेक लेखक, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ तसेच राजकारण्यांवर पडलेला दिसून येतो. पीटर ओसॉर्न यांच्या मते, एकोणिसाव्या शतकात लिहिलेला सर्वांत प्रभावशाही मजकूर म्हणून कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. शैक्षणिक तत्त्वज्ञ जॉन रेनेस यांच्या मते, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मध्ये सांगितलेल्या भांडवलशाही क्रांती-प्रतिक्रांती, वर्गसंघर्ष संकल्पनेमुळे पैशांच्या साधनसंपत्तीमुळे नवीन जागतिक बाजारपेठा आणि सर्वव्यापी शॉपिंग मॉल स्थापन करण्याला प्रेरणा मिळाली आहे. इंग्रजी मार्क्सिस्ट ख्रिस हरमन यांच्या मते, आजही मॅनिफेस्टोकडे दुर्लक्ष करून चालत नाही; कारण ज्या समाजात आम्ही राहतो, त्या समाजाची अंतर्दृष्टी असते. ती कोठे जाते किंवा जात आहे याविषयी अर्थशास्त्रज्ञ व समाज आजही वर्तवू शकत नाही. इंटरनॅशनल सोशलिस्टचे संपादक ॲलेक्स कॉलिनीकोस यांनी २०१० मध्ये म्हटले की, एकविसाव्या शतकासाठी मार्क्स आणि एंगेल्स यांचा जाहीरनामा खरोखरच आजही एक जाहीरनामाच आहे.

कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ एक धक्कादायक आणि मूलगामी दस्तऐवज होता, यात शंका नाही; परंतु या ग्रंथात भांडवलशाहीखाली दबलेल्या लोकांना त्यांच्या स्थितीविषयी जागरुक केले आणि कामगार वर्गामध्ये संघटन निर्माण करण्यावर प्रभाव पाडला. कम्युनिस्ट लीगच्या पुनर्रचनाचे आणि कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यामध्ये, तसेच पुढे कम्युनिस्ट साहित्यावरदेखील प्रभाव पडला. भाडवलशाहीच्या जुलुमांमुळे व त्यातीलच आंतरविरोधामुळे वर्गसंघर्ष निर्माण होणार व साम्यवाद प्रस्थापित होईल, असे या ग्रंथात वर्तविले आणि पुढे पाहायलासुद्धा मिळाले. त्यामुळे या ग्रंथाचा अनुभवाधिष्ठित पुरावा म्हणून उपयोग होवू लागला. यूरोपीय व इतरही देशांमधील कामगारांमध्ये संघभावना आणि आपल्यावरील होत असलेल्या अन्यायाची जाणीव निर्माण करण्यात कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ मैलाचा दगड ठरलेला आहे.

संदर्भ :

  • झिंगन, एम. एल., विकास का अर्थशास्त्र एवं आयोजन, नई दिल्ली, २००७.
  • देशपाडे, ज्योत्स्ना, विकासाचे अर्थशास्त्र, नागपुर, २०११.
  • Adranky, V., The History of the Communist Manifesto of Marx and Engels, New York, 1938.
  • Hobsbawm, Eric, How To Change The World, London, 2011.

समीक्षक : राजस परचुरे