क्लोरीन हा वायू कारखान्यातून अपघाताने गळती झाल्यास प्रदूषक ठरतो. हा वायू वनस्पतींना अतिशय विषारी असतो. हवेत झपाट्याने विरत असला तरी अतिशय कमी तीव्रतेतही तो वनस्पतींना धोकादायक असतो. शतकोटी भागात १० भाग असतानाही मुळा आणि लसूणघास या संवेदनशील वनस्पती दोन तासात डागाळल्याचे प्रयोगात आढळले आहे. सर्वसाधारण वनस्पतींना ५०– ८० भाग तीव्रतेचा क्लोरीन ४ तासांत विषारी ठरतो.  हरितद्रव्याचा नाश, पाने तांबडी पडणे, पानांच्या कडांना व टोकांना चट्टे पडणे, भोके पडणे व पाने गळून पडणे अशा खुणा निरनिराळ्या झाडांवर नोंदण्यात आल्या आहेत. लसूणघास, मुळा, पेतुनिया, शेवंती व पाईन वृक्ष या वनस्पती क्लोरिनला फार संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.

संदर्भ :

  • Brennan, E.; Leone, I.A.;  Daines, R.H. Chlorine as a phytotoxic air pollutant, Int.J.Air Water Pollut. 9: 791 – 797, 1965.
  • Brennan, Eileen; Leone, Ida A.; Daines, R.H. Response of pine trees to chlorine in the atmosphere, Forest Sci. 12: 386 – 390, 1966.
  • Miller, E. J.; and Strong, F.C. A case of chlorine gas injury to shrubs, vines, grass and weeds, Arboristis’ News, p.73, 1940.

समीक्षक – बाळ फोंडके


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

Sheela Patil साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.