बालकदिवस. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना जगातील मानवकल्याणासाठी विविध कृतिकार्यक्रम, विशेष दिन राबवून मानवामध्ये जाणीवजागृती करत असते. उदा., जागतिक महिला दिन, एड्स सप्ताह, मानवी हक्क दिन, बालदिन इत्यादी. यांमध्ये एक दिवसापासून ते एक आठवडा, पंधरवडा, पूर्ण वर्ष, दशक इतक्या कालावधीत नियोजित कार्यक्रम साजरे करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला जातो. या कालावधीत निश्चित कृतिकार्यक्रम करून जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

२० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. त्यामुळे ‘२० नोव्हेंबर’ हा दिवस जागतिक बालदिन म्हणून जगात साजरा केला जातो. २० नोव्हेंबर १९८१ रोजी बालकांच्या हक्कमसुद्यावर सदस्यदेशांनी सह्या केल्या. या सनदेवर आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी सह्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी (United Nations International Children’s Emergency Fund – UNICEF) ही संस्था जागतिक स्तरावर बालकांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी करत असते. बालदिन जागतिक स्तरावर विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.

देश व बालदिन तक्ता

देश

बालदिवस

भारत

१४ नोव्हेंबर

ब्राझील

१२ ऑक्टोबर

चीन

१ जून

मेक्सिको

३० एप्रिल

न्यूझीलंड

मार्चचा पहिला रविवार

पोलंड

१ जून

श्रीलंका

१ ऑक्टोबर
जपान

५ मे

बांगला देश

१७ मार्च
आझरबैजान

१ जून

अल्बेनिया

१ जून
अर्जेंटिना

ऑगस्ट महिन्यातील तीसरा रविवार

आर्मेनिया

१ जून
बल्गेरिया

१ जून

मध्य आफ्रिका

२५ डिसेंबर
चिली

ऑक्टोबर महिन्यातील पहिला बुधवार

कोलंबिया

एप्रिल महिन्यातील शेवटचा शनिवार
कोस्टा रीका

९ सप्टेंबर

हाँगकाँग

४ एप्रिल
क्रोएशिया

११ नोव्हेंबर

झेक प्रजासत्ताक

१ जून
एक्वादोर

१ जून

ईजिप्त

२० नोव्हेंबर
एरिट्रिया

८ डिसेंबर

जर्मनी, पश्चिम

२० सप्टेंबर
जर्मनी, पूर्व

१ जून

फिनलंड

२० नोव्हेंबर
ग्वातेमाला

१ ऑक्टोबर

हाँडुरस

१० सप्टेंबर
हंगेरी

मे महिन्यातील शेवटचा रवीवार

क्यूबा

जुलै महिन्यातील तीसरा रविवार
हैती

१२ जून

आयर्लंड

२० नोव्हेंबर
इंडोनेशिया

२३ जुलै

कोरिया, उत्तर

१ जून
कोरिया, दक्षिण

५ मे

जपान

५ मे
कझाकस्तान

१ जून

लाओस

१ जून
मालदीव प्रजासत्ताक

१० मे

मॅनमार

१३ फेब्रुवारी
मलेशिया

२० नोव्हेंबर

मंगोलिया

१ जून
मोल्दोवा

१ जून

मोझँबीक

१ जून
व्हिएटनाम

१ जून

व्हेनेझुएला

जुलै महिन्यातील तीसरा रविवार
वॉन्यव्हॉतू

२४ जुलै

यूरग्वाय

ऑगस्ट महिन्यातील दुसरा रविवार
संयुक्त अरब अमीर राज्ये (UAE)

१५ मार्च

युक्रेन

१ जून
टूव्हालू

ऑगस्ट महिन्यातील पहिला सोमवार

तुर्की

२३ एप्रिल
ट्युनिशिया

११ जानेवारी

त्रिनिदाद व टोबॅगो

२० नोव्हेंबर
थायलंड

जानेवारी महिन्यातील दुसरा शनिवार

तैवान

४ एप्रिल
स्वीडन

ऑक्टोबर महिन्यातील पहिला सोमवार

सुरिनाम

५ डिसेंबर
न्यूझीलंड

मार्च महिन्यातील पहिला रविवार

नायजेरिया

२७ मे
निकाराग्वा

१ जून

नॉर्वे

१७ मे
पॅलेस्टिनीअन टेरिटोरीज

५ एप्रिल

पॅराग्वाय

१६ ऑगस्ट
पनामा

जुलै महिन्यातील तीसरा रविवार (जुना १ नोव्हेंबर)

पेरू

एप्रिल महिन्यातील दुसरा रविवार
सूदान

२३ डिसेंबर

स्पेन

मे महिन्यातील दुसरा रविवार
स्लोव्हाकिया

१ जून

दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक

नोव्हेंबर महिन्यातील पहिला शनिवार

सिंगापूर

१ ऑक्टोबर

सर्बीया

२० नोव्हेंबर

रशियन सोव्हिएट फेडरेशन

१ जून
रूमानिया

१ जून

पोर्तुगाल

१ जून
गिनी बिसाऊ

१ जून

मकाऊ

१ जून
केप व्हर्द

१ जून

साऊँ टोमे ई प्रीन्सिपे

१ जून
तिमोर

१ जून

अंगोला

१ जून
फिलिपीन्स

२० नोव्हेंबर

 

भारतामध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू (Jawaharlal Motilal Nehru) यांच्या १४ नोव्हेंबर या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना लिहिलेल्या पत्रांतून बालशिक्षणाबाबत आपले विचार मांडले आहेत. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षक यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी मुलांना ‘देवाघरची फुलेʼ मानली. ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे; देशाची खरी शक्ती व समाजउभारणीचा पाया बालकेच असतात, असे ते म्हणत.

उद्दिष्टे : १) बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीवजागृती करणे. २) बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे. ३) बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करणे. ४) बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे. ५) जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे. ६) बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे. ७) बालकांमध्ये ‘विश्वकुटुंबाची’ संकल्पना वाढीस लावणे.

वैशिष्ट्य : बालदिनानिमित्त विभूतिपूजा टाळून, बालकांच्या गरजा व हक्क यांबाबत राष्ट्रातील पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली जाते. पंडित नेहरू यांचा धीरोदात्तपणा, वीरवृत्ती, असामान्य चरित्र व चारित्र्य, अथांग मानवता हे बालकांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. कविवर्य रवींद्रनाथ टागोर (Ravindranath Tagore) यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जवाहरलाल म्हणजे ऋतुराज’. हा ‘ऋतुराज’ मुलामुलींमध्ये खुलवून त्यांचे जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी अशा दीपस्तंभाची गरज असते. ती भागविण्याचा येथे अल्पसा प्रयत्न सुरू आहे; परंतु आज शिक्षणपद्धतीकडे नेहरूंच्या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे नको त्या वयात नको ते गुन्हे बालकांकडून घडत आहेत. त्यांची मने ‘कोडगी’ बनल्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे, याची पालकांना जाणीव राहिलेली नाही. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण आपण संस्काराला कमी पडत आहोत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण, प्रादेशिक भाषेतील शाळांमधील घटती विद्यार्थिसंख्या; व्यापारी दृष्टिकोनातून शाळा काढून संस्थाचालक संस्थानिक बनले आहेत. शिक्षकप्रशिक्षणाचा कणाच मोडला आहे. पूर्व माध्यमिक शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आज भ्रष्टाचार वाढला आहे. त्यासाठी चांगल्या चारित्र्याचे शिक्षक, पालक, संस्थाचालक, राज्यकर्ते इत्यादींची गरज आहे. त्यांची निर्मिती बालशिक्षणातून केली पाहिजे. केवळ ‘बालआनंद मेळावा’, ‘बालमहोत्सव’, ‘बालदिन’ यांसारख्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे न करता त्यांतून मुलामुलींमध्ये कुटुंब, समाज, देश इत्यादींबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यांप्रती उचित कार्य करण्याची प्रेरणात्मक शिकवण दिली पाहिजे.

बालशिक्षणाच्या बाबतीत अनुताई वाघ (Anutai Wagh), ताराबाई मोडक (Tarabai Modak), साने गुरुजी (Sane Guruji), राजा मंगळवेढेकर, भा. रा. भागवत इत्यादींचे योगदान मोठे आहे. याची जाण व भान ठेवून शासकीय स्तरावर पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.

https://www.youtube.com/watch?v=AhKvnHlnXxQ

बालदिनी डिजिटल एज्युकेशनचे स्वप्न आपण पाहतो. मुलामुलींसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्वस्पर्धा, खेळ, गाणी, नृत्य व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतो. बालकल्याणकारी योजनांची खैरात केली जात आहे. निराधार, वंचित मुलांसाठी आश्रमशाळा काढून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. २००२ पासून ‘चाचा नेहरू बाल महोत्सवʼ सुरू करण्याची प्रथा शासकीय स्तरावर सुरू आहे. असे असले, तरी थोर शिक्षणतज्ज्ञ रूसो यांच्या ‘मुलाला मूल म्हणून जगू द्याʼ या विचाराचा पालकांमध्ये विसर पडत चालला आहे. आपला पाल्य शिक्षणात मागे राहणार नाही, या हव्यासापोटी शाळा, ट्यूशन, व्यक्तिमत्त्वविकसनाच्या व्यापारी तत्त्वावर संक्रमित होणाऱ्या चुकीच्या प्रथा इत्यादी बालकांवर बळजबरीने लादल्याने बालकांची दमछाक होते. फक्त दप्तराचे ओझे कमी करून चालणार नाही, तर त्यांच्या मनावरील ताण कसा कमी होईल, याची जाण व भान प्रत्येक पालकाने ठेवले पाहिजे. बालक हे औपचारिक शिक्षणात तसेच कुटुंबाच्या दडपणाखाली न राहता ते हसतखेळत शिकले पाहिजे, वाढले पाहिजे.

संदर्भ :

  • कविमंडळ, राजश्री, चाचा नेहरू.
  • गोखले, शरदचंद्र, बालविकास परिचय.
  • मंगळवेढेकर, राजा, बिनभिंतीची उघडी शाळा, पुणे.
  • Sharma, Rajendra; Sharma, Rachana, Social psychology, New Delhi, 2007.

समीक्षक – उमाजी नायकवडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply