गैर-भाजप व्यवस्था : गैर-भाजपचे चर्चाविश्व नव्वदीच्या दशकापासून सुरु झाले. १९९८-२००४, २००४-२०१४ असे त्यांचे दोन टप्पे आहेत. या दोन टप्पांमध्ये आघाडी म्हणून हा प्रयोग झाला. २०१४ मध्ये दारुण काँग्रेसचा व प्रादेशिक पक्षांचा पराभव झाला. त्यानंतर गैर-भाजप व्यवस्थेचा तिसरा टप्पा सुरू झाला. बिहार निवडणूकीत गैर-भाजप व्यवस्थेला निवडणूकीत चांगली कामगिरी करता आली. परंतु गैर-भाजप व्यवस्थेत दुफळीवाद सुरू झाला. पुन्हा भाजपकडे नितीश कुमार गेले. तामिळनाडू, प.बंगाल, महाराष्ट्र येथे गैर-भाजपची चर्चा होते. मात्र व्यवस्थीतपणे गैर-भाजप व्यवस्थेच्या संरचना घडल्या नाहीत. गुजरात विधानसभा निवडणूकीत सामाजिक पातळीवर गैर-भाजप व्यवस्था साकारली. रालोआमधील शिवसेना हा प्रदेशिक पक्ष गैर-भाजप सदृश्य भूमिका घेतो. तो रालोआ पासून वेगळा झाला (२०१९). गैर-भाजपचे अदृश्य आधार पुनर्वाटप, धर्मनिरपेक्षता, आर्थिक विकास प्रारुपाची समीक्षा आणि शेती धोरणावरील टीका हे आहेत.
संदर्भ :
- पवार प्रकाश, भाजप एकपक्ष वर्चस्व, समाज प्रबोधन पत्रिका.