ईहामृग (Ihamarag)

ईहामृग : एक रूपकप्रकार. ईहा म्हणजे कृती किंवा वर्तन. ज्यात नायक मृगाप्रमाणे अलभ्य नायिकेची इच्छा करतो ते ईहामृग. याचे उदाहरण संस्कृत वाङ्मयात आढळत नाही. समवकाराप्रमाणेच यातही नायक आणि नायिका दिव्य…

पंचरात्र (Pancharatra)

पंचरात्र : भासाच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक. हे महाभारताच्या विराटपर्वावर आधारित नाटक आहे. ह्या नाटकाची कथावस्तू अशी - द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव तेरा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत.…

दूतघटोत्कच (Dutghatotkach)

दूतघटोत्कच : भासाचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते हा व्यायोग रूपकप्रकार आहे ; परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत. ह्या नाटकातील सर्व पात्रे…

अभिषेकनाटकम् (Abhisheknatakam)

अभिषेकनाटकम् : रामायणकथेवर आधारित भासाचे सहा अंकी नाटक.रामायणातील किष्किंधा कांडापासून युद्ध कांडापर्यंतची म्हणजेच वालीवध ते रामराज्याभिषेक अशी रामकथा यात येते. सुग्रीव, बिभीषण आणि राम या तिघांचा राज्याभिषेक या कथानकात आला…

बालचरित (Balcharit)

बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य विषय असून कृष्णाच्या बाललीलांचे वर्णनही यात आहे.देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म…

रूपक (Rupak)

रूपक: रूपक ह्या शब्दासाठी मराठीत नाटक हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात 'रूप' हा शब्द वापरलेला आहे.रूप व रूपक हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत.'रूप्यते' म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष…

अविमारकम् (Avimarakam)

अविमारकम् : भासलिखित संस्कृत नाटक. भासाची बहुतांश नाटके रामायण व महाभारत ह्या उपजीव्य महाकाव्यांमधील कथांवर आधारित आहेत.ह्या नाटकाची कथा मात्र वेगळी आहे. अविमारकम्ची मूळ कथा परंपरेने चालत आलेली आख्याने, पुराणकथा…

दूतवाक्य (Dutvaky)

भासाचे एकांकी नाटक. व्यायोग ह्या रूपकप्रकारात याचा समावेश होतो. महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. श्रीकृष्ण दूत म्हणून कौरवांकडे येतो, येथून या नाटकाला सुरुवात होते. उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या…

ऊरुभङ्ग (Urubhang)

भासकृत करुणरसप्रधान एकांकी संस्कृत नाटक. भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धात दुर्योधनाचा झालेला ऊरुभङ्ग म्हणजेच भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांचा केलेला चुराडा हा ह्या नाटकाचा विषय.हया कथानकातील खलप्रवृत्तीचा म्हणून प्रसिद्ध असणार्‍या दुर्योधनाच्या…

समवकार (Samavkar)

संस्कृतमधील दशरूपकांपैकी म्हणजे दहा नाट्यप्रकारांपैकी एक रुपकप्रकार. नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात म्हटले आहे की,नाट्यवेदाची निर्मिती करून तो भरतमुनींच्या स्वाधीन केल्यावर आणि नाट्यमंडपाची निर्मिती झाल्यावर ब्रह्मदेवाने स्वतः रचलेल्या 'अमृतमंथन' नावाच्या समवकाराचा प्रयोग…

वीथी (Vithi)

शेवटचा रूपकप्रकार. सर्व रसांच्या लक्षणांनी समृद्ध,तसेच तेरा अंगांनी युक्त आणि एक अंक असलेली तसेच एका पात्राने किंवा दोन पात्रांनी अभिनीत करावयाची,अशा प्रकारची वीथीची रचना असते. वीथी सर्व रसांच्या लक्षणांनी युक्त…

मध्यमव्यायोग (Madhyamvyayog)

भासनाटकचक्रातील एक नाटक म्हणजे मध्यमव्यायोग. त्याची कथा अशी - एकदा कोणी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या पत्नी व तीन मुलांसह हिडिंबा वनातून चालला असताना त्याला हिडिंबेचा मुलगा घटोत्कच याने अडवले. घटोत्कचाने…

भाण (Bhan)

दशरूपकांपैकी नववा रूपकप्रकार. भरताने नाट्यशास्त्रात याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे आत्मानुभूतशंसीपरसंश्रयवर्णनाविशेषस्तु| विविधाश्रयोहिभाणोविज्ञेयस्त्वेकहार्यश्च|| (१८.९९) परवचनमात्मसंस्थंप्रतिवचनैरुत्तरित्तरग्रथितै:| आकाशपुरुषकथितैरङ्गविकारैराभिनयेत्तत्|| (१८.१००) धूर्तविटसंप्रयोज्योनानावस्थान्तरात्मकश्चैव| एकाङ्कोबहुचेष्टःसततंकार्योबुधैर्भाणः|| (१८.१०१) या रूपकात एकच पात्र असते - धूर्त किंवा विट. धूर्त म्हणजे…

डिम (Dim)

एक रूपकप्रकार. यात देव, राक्षस, नागराज, पिशाच्चेइत्यादींच्या चरित्राचे चित्रण असावे. यात एकंदर सोळा नायक असावेत असे म्हटले आहे. शांत, शृंगार आणि हास्य हे रस यात वर्ज्य असून मुख्यतः दीप्तरसांचा म्हणजे…

उत्सृष्टिकांक(Utsrushtikank)

उत्सृष्टिकांक : एक रूपकप्रकार. त्यास 'अंक' असेही म्हटले आहे. उत्सृष्टिकांक ह्या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रकारे सांगितली गेली आहे - सृष्टि म्हणजे प्राण, आणि ते प्राण ज्यांच्यातून उत्क्रमण करण्याच्या म्हणजे बाहेर…