मोहडोंबरी (Mohdombari)

आदिवासीतील कोलाम जमातीचा सण.कोलामी भाषेत या सणाला ‘बुर्री’ किंवा ‘भुर्री’ असे नाव आहे. या सणामध्ये मोहफूल आणि मोहाच्या झाडाचे महात्म्य असते, म्हणून कोलामांनी मराठी भाषिक लोकांसाठी ‘मोहडोंबरी’ हे नाव ‘बुर्री’…

इंदल (Endal)

महाराष्ट्रातील पावरा आदिवासी जमातीतील प्रसिद्ध उत्सव. सातपुडा परिसरात भिल्ल व पावरा या दोन्ही समाजात प्रामुख्याने हा उत्सव साजरा करतात. ‘इंदल’ म्हणजे इंदीराजा; एक लोकदेवता. पुत्रप्राप्तीसाठी, घरातील बरकतीसाठी, सुखशांतीसाठी ,वैयक्तिक स्वरूपात…

करहण (Karhan)

धान्य पिकवणारी देवता. पावरा आदिवासी ख्ळ्यात ज्वारीची मळणी करण्याअगोदर ज्वारीच्या कणसांच्या राशीचा पूजाविधी करतात. पूजाविधी केल्याने करहरण माता प्रसन्न  होते, तिच्यामुळे धनधान्याला बरकत येते, असे पावरा मानतात. असा पूजाविधी केल्यानंतर…

याहामोगी (Yahamogi)

महाराष्ट्र गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांतील आदिवासी जमातींची कुलदेवता. दरवर्षी महाशिवरात्रीला याहामोगीची जत्रा भरते. या तीनही राज्यांतील आदिवासी लाखोंच्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. याहामोगीचे मंदिर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील…

गावबांधणी (Gaonbandhani)

गावात नैसर्गिक व तत्सम संकटांनी प्रवेश करू नये या धार्मिक भावनेपोटी गाववस्तीच्या शिवेवर मंत्रतंत्राच्या साहाय्याने रेषा काढून गाव बंद करणे म्हणजे गावबांधणी . ही प्रथा मुख्यतः कोलाम या आदिवासी जमातीत…

घोटूल (Ghotul)

आदिवासी जमातींतील युवक-युवतींना सामाजिक -सांस्कृतिक आणि पर्यावरणीय ज्ञान आणि संस्कार मिळावेत यासाठी ग्रामपातळीवर उभी करण्यात आलेली संस्कारकेंद्रे. सामाजिक मानवशास्त्रात या संस्कारकेंद्रांचा युवागृह म्हणून उल्लेख केला जातो. जगभरातील विविध आदिम जमातींत अशी युवागृहे आढळतात. प्रौढ जीवनातील वैवाहिक कर्तव्याबरोबर इतर अनुषंगिक कर्त्यव्ये पार पाडण्याचे ज्ञान आणि अनुभव घोटुलमधून मिळत असल्याने यास युवागृहे हे नामाभिधान तर्कसंगत वाटते. जमातीपरत्वे घोटुलला वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थः- ‘घोटुल’ (बस्तरमधील माडिया, मूरिया, गोंड जमाती). ‘कुमारगृह’(आसाम मधील गारो जमात ), ‘रंगबंग’(हिमालय प्रदेशातील भेटिया जमात), ‘गितिओरा’(छोटानागपूर क्षेत्रात राहणाऱ्या मुंडा, हो जमाती), ‘मौरूंगा’ (पूर्वोत्तर भारतातील ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरातील आदिवासी ). ‘जोख’, ‘एरया’, ‘धुमकुरिया’ (उडीसा मधील उरांव जमाती) ‘बनवयो’ (नागा जमाती); याशिवाय गोटुल, जोंकरपा, बासा अशी याची जमातपरत्वे भिन्न-भिन्न नावे आहेत. आदिवासींच्या उपजीविकीमध्ये अगत्याचे स्थान असलेल्या जीवनानुनयी बाबींचे शिक्षण या गृहांमधून मिळते. मध गोळा करणे, शिकार करणे, शेतीची विविध कामे करणे अशा व्यावसायिक शिक्षणाबरोबर मर्यादित पर्यावरणात जीवनयापनासाठी जमातीची शिस्त, सामाजिक न्याय, परंपरागत चालणाऱ्या प्रथा, परंपरा, नृत्य गायनादी कलांचे शिक्षण, आणि महत्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षणसुद्धा याच युवागृहात प्राप्त होते.
आसाममधील आओ जमातीत, बिहार मधील ओरांव जमातीत घोटुल वयोमानानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. ओरांव जमातीत घोटुल तीन गटात पाहायला मिळतात. एक -‘पुनाजोखार’- किशोर अवस्थेत असणाऱ्या युवकांना इथे तीन वर्षे राहावे लागते. तसेच आपल्या पेक्षा मोठ्या गटातील सदस्यांची या गटातील सदस्यांना सेवा करावी लागते. यानंतर त्यांना ‘मझतुरियाजोखार’ या दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो. येथेही तीन वर्षे सेवा करावी लागते. तिसरा वर्ग ‘कोहाजोखार’. येथे विवाह होईपर्यंत थांबण्याची मुभा असते. ‘कोसघोटुली’(अबुझमाड ) या घोटुलाचे स्वरूप इतर घोटुलांपेक्षा वेगळे असते. या घोटुलमध्ये अविवाहित मुली नाचतात, गातात, पण झोपण्यासाठी मात्र आपल्या घरी जातात. इतर घोटुलमध्ये मुले-मुली रात्री घोटुलमध्येच विश्राम करतात. काही आदिमजमातींत मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे, तर काही जमातींत एकत्र अशी युवागृहे आढळतात. नागा जमातीत अशा प्रकारचे घोटुल दिसतात. ‘इखुइंची’ आणि ‘इलुइची’. जे क्रमशः मुले आणि मुलींच्या घोटुलशी संबंधित आहेत.

घोटूल

युवागृहे सर्वसाधारणपणे गावापासून दूर असतात, पण काही आदिवासी जमातीत ही युवागृहे गावाच्या मध्यभागी असतात. खेड्याच्या मध्यभागी बांबूचे कुंपण घातलेली ही झोपडी. तीन ते चारफूट उंच मातीच्या ओट्यावर, कुडाच्या भिंती असलेली आणि गवताने साकारलेली असते. घोटुलच्या लाकडी खांबावर व भिंतीवर चित्रे काढलेली असतात. तरुण कलाकारांचीच ही कलाकृती असते. या झोपडीला एकच दरवाजा असतो. घोटुलची शिस्त व स्वच्छता वाखाणण्यासारखी असते. कामे वाटून दिलेली असतात. त्यात कामचुकारपणा सहसा होत नाही. रोज सायंकाळी दिवसाची सर्व कामे आटोपताच हळूहळू अविवाहित युवक-युवतींचे पाय घोटुलकडे वळू लागतात. घोटुलमध्ये सुमारे ९ ते २० वर्षे वयाची मुले-मुली येतात. घोटुलमधील स्वच्छंदी जीवन हसणे, खेळणे, एकमेकांशी मोकळेपणाने वागणे, थट्टा करणे, गाणे म्हणणे, नाच करणे इत्यादींच्या द्वारे आनंदात व्यतित होते, आणि भावीजीवनातील साथीदाराची निवड करण्याचा मार्ग सुकर होतो. स्वच्छंदी जीवन असले तरी कोणत्याही प्रकारची सक्ती मात्र होत नाही. घोटुलच्या प्रांगणात वयात आलेले युवक-युवती रात्री एकत्र जमून समूह नृत्ये करतात. रेलॉ, सींगमाडिया, हुलकी, करमा, रेवा, सेला, गेडी, गिरदा, सुआ अशा अनेक प्रकारची नृत्ये केली जातात. घोटुलच्या समोर होळीचा सण साजरा करतात. होळी भोवती ढोलकीच्या तालावर वर्तुळाकार फेर धरून एकमेकांच्या कमरेभोवती व खांद्यावर हात टाकून बेभान होऊन नृत्य करतात. याप्रसंगी शृंगारिक गीते गायिली जातात. मुलींची छेडखानी, थट्टा मस्करीला सुद्धा यात स्थान असते. या गीतांचे विषय विविध असतात. वैवाहिक स्वप्न, लग्नसमारंभ, प्रियकराच्या भेटीची आतुरता, प्रेयसीची थट्टा, वैवाहिक जीवन, प्रियकराची निवड, प्रेयसीचे सौंदर्य इत्यादी. विधवा व विवाहित स्त्रियांना घोटुलमध्ये प्रवेश नसतो. (अधिक…)