व्यवहारवाद (Commonsense Philosophy)

अठराव्या शतकात टॉमस रीड (१७१०–९६) आणि अन्य काही स्कॉटिश तत्त्वज्ञांनी उदयास आणलेला एक तत्त्वज्ञानीय पंथ. जग आणि माणूस ह्यांच्या स्वरूपासंबंधीचे ज्ञान आपल्या नेहमीच्या व्यवहारबुद्धीमध्येच सामावलेले असून ते प्रमाण आहे, हा…

रहस्यवाद (Mysticism)

‘रहस्यवाद’ वा ‘गूढवाद’ हे पद विश्वाचे अंतिम सत्यस्वरूप आणि ते जाणून घेण्याचा मार्ग यांविषयी एक विशिष्ट समजूत, भूमिका अथवा प्रवृत्ती दर्शविते. अंतिम सत्य तार्किक विचारसरणीला ज्ञात होत नसते. सद्वस्तू ही…

एत्येन बॉनो दे काँदीयाक (Etienne Bonnot de Condillac)

काँदीयाक, एत्येन बॉनो दे : (३० सप्टेंबर १७१५—३ ऑगस्ट १७८०). प्रबोधनकालीन फ्रेंच तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म फ्रान्समधील ग्रनॉबल येथे एका कायदेपंडित घराण्यात झाला. सुरुवातीस त्याने धर्मोपदेशकाचा पेश पत्करला; पण त्याला धर्मशास्त्रापेक्षा…

ऑग्यूस्त काँत (Auguste Comte)

काँत, ऑग्यूस्त : (१९ जानेवारी १७९८—५ सप्टेंबर १८५७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रभावशाली फ्रेंच तत्त्वज्ञ. प्रत्यक्षार्थवादी तत्त्वज्ञानाचा प्रणेता आणि ‘मानवतेच्या धर्मा’चा संस्थापक. दक्षिण फ्रान्समध्ये माँपेल्ये येथे जन्म. त्याच्या रोमन कॅथलिक पंथीय आईवडिलांची ईश्वरावर…

अज्ञेयवाद (Agnosticism)

तत्त्वज्ञानातील एक विचारप्रणाली. अज्ञेयवाद हा आंशिक संशयवाद होय. संशयवादाची भूमिका अतिरेकी नास्तिवाची असते. मानवाला कोणत्याच प्रकारचे सर्वमान्य, विश्वसनीय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, अशी संशयवादाची शिकवण असते. परंतु अज्ञेयवाद इतक्या…

क्लार्क लेनर्ड हल (Clark Leonard Hull)

हल, क्लार्क लेनर्ड : (२४ मे १८८४–१० मे १९५२). अमेरिकन नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. अक्रॉन, न्यूयॉर्क येथे त्याचा जन्म झाला. तरुणवयातच पोलिओचा संसर्ग झाल्यामुळे त्याला अपंगत्व आले. मिशिगन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर…

व्हिल्हेल्म व्हुंट (Wilhelm Wundt)

व्हुंट, व्हिल्हेल्म : (१६ ऑगस्ट १८३२–३१ ऑगस्ट १९२०). जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. शरीरक्रियावैज्ञानिक. प्रायोगिक मानसशास्त्राचे अध्वर्यू. मॅनहाइमजवळील (Mannheim) नेकाराऊ (Neckarau) येथे जन्म. हायडल्‌बर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राची पदवी मिळविली (१८५६). त्याच विद्यापीठात…

बुऱ्हस फ्रेडरिक स्किनर (Burrhus Frederic Skinner)

स्किनर, बुऱ्हस फ्रेडरिक : (२० मार्च १९०४ — १८ ऑगस्ट १९९०). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) राज्यातील सस्क्वेहॅना  (Susquehanna) येथे. हार्व्हर्ड विद्यापीठातून एम्.ए.ची पदवी मिळवल्यानंतर (१९३०) त्याच विद्यापीठातून त्याने…