धुळवड (Dhulivandan)

(धूलिवंदन). एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी करतात. या उत्सवाचा संबंध कामदहनाशी जोडला जातो. पुराणांत याविषयी…

दिंडी (Dindi)

पालखीच्या बरोबर एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकऱ्‍यांचा समूह.  संतांची किंवा दिंडी काढणाऱ्‍यांची नावे दिंड्यांना असतात. दिंडी शब्दाचा ‘वीणा’ वा ‘वीणेसारखे एक वाद्य’ असाही एक अर्थ…

गुरुत्वमध्य (Center Of Gravity)

[latexpage] वस्तुमान असलेल्या प्रत्येक कणावर गुरुत्व-बल (Gravity force) कार्य करीत असते. त्या बलाला कणाचे वजन (Weight) असे म्हणतात. त्या बलाची दिशा नेहमीच अधोमुख असते. कणांच्या समूहातील प्रत्येक कणाची गुरुत्व-बल अधोमुखच…

दशावतारी नाटके (Dashavtari Plays)

महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार. कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मासात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेषतः देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा या भागांत दशावतारी नाटके…

प्रायोगिक वर्गीकरण (Experimental Taxonomy)

पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार एका गटातील (Natural Order or Family)  वनस्पतींतील जाती (species)…

रामचंद्र दत्तात्रेय रानडे (Ramchandra Dattatraya Ranade)

रानडे, रामचंद्र  दत्तात्रेय : (३ जुलै १८८६—६ जून १९५७). भारतीय तत्त्वज्ञ व संत. काही तत्त्वज्ञांचा दृष्टीकोन विश्वकेंद्रित असतो, तर काहींचा मानवकेंद्रित असतो. गुरूदेव रानडे यांचा ईश्वरकेंद्रित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानात जगाचा…

ताईत (Tabeez)

स्वतःच्या संरक्षणार्थ वापरावयाची प्रतीकात्मक वस्तु. हा शब्द ‘ताई’ व ‘एतु’ या दोन कानडी शब्दांपासून बनलेला आहे असे समजतात. दगड, धातु, लाकुड इ. पदार्थांचे ताईत करून बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत…

चंपाषष्ठी (Champashashthi)

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते.…

गोकुळाष्टमी (Gokulashtami)

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती,जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो.देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले.गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदीआनंद…

गुढी पाडवा (Gudhi Padwa)

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच…

कल्पवृक्ष (Kalpvriksh)

हिंदू पुराणकथांतील एक वृक्ष. स्वर्गातील मंदार, पारिजात, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन या पंचदेवतरूंत त्याची गणना असून तो इच्छित वस्तू देतो, अशी कल्पना आहे. भारतीय पुराणे व साहित्यातही त्याचे वर्णन आहे.…

पॅरान्थ्रोपस  इथिओपिकस (Paranthropus aethiopicus)

पॅरान्थ्रोपस पराजातींमधील सर्वांत कमी माहिती असलेली एक प्रजात. फ्रेंच पुरामानवशास्त्रज्ञ कॅमे ॲरमबूर्ग (१८८५–१९६९) आणि इव्ह कॉप्पन्स (जन्म : ९ ऑगस्ट १९३४) यांना इथिओपियामध्ये ओमो नदीच्या परिसरात एक खालचा जबडा मिळाला…

फ्ल्यूट (Flute)

सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे प्रकार सामान्यत: त्याची लांबी, छिद्र (रंध्र) संख्या तसेच वादनतंत्रे यांतील भिन्नतेमुळे पडले आहेत.…

अभिवाह (Flux)

धातू किंवा धातुपाषाण वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाची तरलता (पातळपणा) वाढविण्यासाठी व नको असलेली मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या स्वरूपात निघून जावीत म्हणून जे पदार्थ त्याच्यात टाकण्यात येतात, त्यांना ‘अभिवाह’ म्हणतात. धातुविज्ञानात अभिवाहांचा…

कल्हई (Tinning)

सामान्यपणे पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप देतात,अशा लेपाला कल्हई म्हणतात. शुद्ध कथिल विषारी नसते व त्याच्यावर हवेचा किंवा आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही. त्यामुळे कल्हई केलेले पृष्ठ…