(सूक्ष्मसंगणक). मायक्रो संगणकाला वैयक्तीक (Personal) संगणक असेही म्हणतात. मायक्रो संगणक हे सुपर संगणक (Super Compute), मेन फ्रेम संगणक (Main frame Computer) व मिनी संगणक (Mini Computer) यांच्या तुलनेत फारच लहान असतात. मायक्रो संगणक हा एका टेबलावर किंवा एका पेटीमध्ये पण ठेवता येऊ शकतो. मायक्रो संगणक हे दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण करू शकतो. मायक्रो संगणक हे इतर संगणकाच्या तुलनेत लहान व कमी खर्चीक असतात. मायक्रो संगणकामध्ये प्रोसेसर (processor; प्रक्रियक), मेमरी (Memory; स्मृति), आदान-प्रदान द्वार (इनपुट-आउटपुट पोर्ट; Input- Output Port) इ. घटक एकाच पटलावर ठेवलेले असतात, यालाच आपण संगणकाच्या भाषेत मदरबोर्ड (Motherboard) असे म्हणतो. मायक्रो संगणकाचा वापर करून वापरकर्ता आपली दैनंदिन लहान मोठे सर्वच कामे करु शकतो उदा., प्रकल्प अहवाल तयार करणे, चर्चेसाठी प्रेझेटेंशन (Presentation)  तयार करणे इत्यादी. आपण मनोरंनासाठी त्याचा वापर करू शकतो. मायक्रो संगणक हे इतर संगणकाच्या तुलनेत लहान व स्वस्त असल्यामुळे लोकप्रिय आहे.

मुख्यातः मायक्रो संगणकाचे साधारणत चार प्रकार पडतात :

१. नोटबुक संगणक (Notebook Computer) : नोटबुक संगणक हे एका वहीच्या आकाराचे असतात. नोटबुक संगणक हे इतर मायक्रो संगणकाच्या तुलनेत सारखेच काम करते. नोटबुक संगणकामध्ये सर्व घटक जसे की-बोर्ड, माउस, मॉनिटर, प्रोसेसर, मदरबोर्ड इत्यादी एकत्रीत केलेले असतात. हे संगणक आकाराने लहान व वजनाने खुप हलके असल्यामुळे कुठेही बाहेर नेण्यासाठी उदा., ऑफीस,  कॉलेज व इतर कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी सोयीस्कर आहेत.

२. लॅपटॉप संगणक (Laptop Computer) : लॅपटॉप संगणक हे नोटबुक संगणकाच्या तुलनेत आकाराने थोडे मोठे असते व वजनाने थोडे जड असते. वापरकर्ता लॅपटॉपला बॅगेत ठेवुन कुठेही घेऊन जाऊ शकतो. लॅपटॉप संगणकामध्ये सर्व घटक जसे, की-बोर्ड, माउस, मॉनिटर, प्रोसेसर, मदरबोर्ड इत्यादी एकत्रीत केलेले असतात.

३. डेक्सटॉप संगणक (Desktop Computer) : डेक्सटॉप संगणक हे नोटबुक व लॅपटॉप संगणकाच्या तुलनेत मोठे असते.  डेस्कटॉप संगणकाची प्रक्रिया क्षमताही नोटबुक व लॅपटॉप संगणाच्या तुलनेत अधिक असते. डेस्कटॉप संगणक हा एका टेबलावर मावेल एवढी जागा घेतो. डेस्कटॉप संगणक हा वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला असतो जसे की, सीपीयू (केंद्रिय प्रक्रियक; CPU), मॉनिटर (दर्शक; Monitor), की-बोर्ड (Keyboard), मास (Mouse) इत्यादी. साधारणतः डेक्सटॉप संगणकाचा उपयोग हा ऑफीस व घरी दैनंदिन कामासाठी होतो.

४. पर्सनल डिजीटल असिस्टंट (Personal Digital Assistant) : (वैयक्तिक अंकीय मदतनीस). पर्सनल डिजीटल असिस्टंट या  संगणकाला पाम संगणक (Palm Computer) किंवा हॅण्डहेल्ड संगणक (Hand Held Computer) सुध्दा म्हणतात. हे संगणक इतर संगणकाच्या तुलनेत अतिशय लहान असतो. हॅण्डहेल्ड संगणक या नावावरुनच समजते की एका हातात हे संगणक ठेवता येऊ शकतो. वापरकर्ता या संगणकाचा वापर करुन गरजेची सर्व कामे करु शकतो जसे की, पुस्तक वाचने, ईलेक्टॉनिक मेल पाठवणे (ई-मेल), फोन कॉल करणे, एसएमएस करणे व मनोरंनासाठीही त्याचा वापर करता येतो.

कळीचे शब्द : #संगणक #नोटबुकसंगणक #NotebookComputer #लॅपटॉपसंगणक #LaptopComputer #डेक्सटॉपसंगणक #DesktopComputer

संदर्भ ः

समीक्षक : विजयकुमार नायक