संबंधात्मक डेटाबेस व्यवस्थात्मक प्रणाली (आरडीबीएमस) ही डेटाबेस व्यवस्थात्मक प्रणालीचा (डीबीएमएस; डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम) भाग आहे. यात रेखांकित (डिझाईन; Design) स्वरुपात विशिष्ट पद्धतीने संबंधात्मक डेटाबेस तयार करण्यासाठी केला जातो. संबंधात्मक डेटाबेस हा एक प्रकारचा डेटाबेस आहे, ज्यात पंक्ती (रो; Row) आणि स्तंभ (कॉलम;  coloum) वापरून रचनात्मक (स्ट्रक्चर्ड; structured) स्वरुपात माहिती संग्रहित होते. यामुळे डेटाबेसमध्ये विशिष्ट माहितीचा शोध घेणे आणि मिळविणे सोपे होते. यामध्ये प्रत्येक सारणीमधील (टेबलमधील) माहिती एकमेकांशी संबधित असते आणि इतर सारण्यांशी देखील संबधित असू शकते.

संबंधात्मक डेटाबेस व्यवस्थात्मक प्रणालीचे वैशिष्टे :

  • सारण्यांमध्ये माहिती संचयित करण्याची सुविधा प्रदान
  • पंक्ती आणि स्तंभांच्या स्वरुपात माहिती जतन केली जाते.
  • प्राथमिक की (Primary key) ची सुविधा पंक्ती विशिष्ट पद्धतीने ओळखण्यासाठी पुरविली जाते.
  • माहितीच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी निर्देशांक (इंडेक्स) तयार करतो.
  • दोन किंवा अधिक सारण्यांमध्ये संबंध स्थापित करू शकतो.

संबंधात्मक डेटाबेस व्यवस्थात्मक प्रणालीचे फायदे :

१. माहिती रचना (डेटा स्ट्रक्चर; Data structure) : सारण्यामधील माहिती वापरकर्त्यास सहज समजु शकते. समान नोंदी (मॅचिंग एंट्रीज; maching entries) डेटाबेस प्रश्न (क्वेरी; query) वापरून सहजपने शोधली जाऊ शकतात.

२. नेटवर्कमध्ये प्रवेश करणे (अक्सेसिंग नेटवर्क;  Accessing Network) : डेटाबेसमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा डेटाबेस वापरण्यासाठी वापरकर्त्यांना संगणक प्रणालीमध्ये लॉग–इन करणे आवश्यक नाही.  विकसक (डेव्हलपर) नेटवर्क प्रवेश सुविधेचा वापर करून डेक्सटॉप साधने आणि वेब अनुप्रयोग (ॲप्लिकेशन) विकसित करून डेटाबेसशी संवाद साधण्यासाठी करतात.

३. भाषा : आरडीबीएमस रचना प्रश्न भाषेला (स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज-एस क्यू एल) समर्थन देतो. कारण एस क्यू एल ची वाक्यरचना (सिंटॅक्स) सोपी आहे.

४. आरडीबीएमएस सह देखरेख करणे सोपे आहे कारण ते डेटाबेस प्रशासक (ॲडमिन) किंवा तंत्रज्ञकांना (टेक्निशीअन्स) त्यांच्या मुख्य यंत्रणेमध्ये राहण्याऱ्या डेटाबेसची देखभाल (मेंटेन), दुरुस्ती (रिपेअर), नियंत्रण (कंट्रोल), चाचणी (टेस्ट) आणि पुनर्साठवण (बॅकअप) घेणास मदत करतो.

५. एकाधिक वापरकर्ता प्रवेश : आरडीबीएमएस मध्ये एकापेक्षा जास्त वापरकर्ते एकाच वेळी डेटाबेसचा वापर करू शकतात.

६. विशेषाधिकार (प्रिव्हीलेज) : आरडीबीएमएस मध्ये अधिकृतता (ऑथराइझेशन) आणि विशेषाधिकार नियंत्रण वैशिष्यांसह (प्रिव्हीलेज कंट्रोल फिचर्स) डेटाबेस प्रशासक अधिकृत वापरकर्त्यांद्वारे विनंती केलेल्या कोणाचाही प्रवेश निर्बंध करू शकतो.

संबंधात्मक डेटाबेस व्यवस्थात्मक प्रणालीचे तोटे :

  • किंमत : डेटाबेस यंत्रणेची देखभाल आणि स्थापन करण्याचा खर्च जास्त असतो.
  • रचना मर्यादा (स्ट्रक्चर्ड लिमिट्स) संबंधात्मक डेटाबेस क्षेत्राच्या (फील्ड) लांबीवर मर्यादा घालतात. डेटाबेस तयार करतानाच क्षेत्रामध्ये किती घनतेचा डेटा संचयित (स्टोअर) करू शकतो हे आधिच निर्दिष्ट (स्पेसिफाय) करणे आवश्यक असते.

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख