(संकरित संस्थिती). संगणकीय भाषेत संस्थिती (इं. टोपॉलॉजी; Topology) म्हणजे संगणकीय जाळ्यांचे विस्तार करणे. आंतरजाल (Internet) हे हायब्रीड टोपॉलॉजीचे उदाहरण आहे. नेटवर्क टोपॉलॉजी (Network Topology) मधील हायब्रीड टोपॉलॉजी हा एक प्रकार आहे. यामुळे दोन किंवा अधिक टोपॉलॉजी एकत्र जोडलेले असतात. या टोपॉलॉजीमध्ये बस टोपॉलॉजी (Bus Topology), मेश टोपॉलॉजी (Mesh Topology), रिंग टोपॉलॉजी (Ring Topology) या विविध नेटवर्किंग टोपॉलॉजी एकत्रित करून हायब्रीड टोपॉलॉजी तयार करण्यात येते.

हायब्रीड टोपॉलॉजी फायदे : या टोपॉलॉजीमध्ये संगणकीय जाळे बिघडल्यास चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे सोपे आहे. गरज पडल्यास हायब्रीड टोपोलॉजीचा आकार वाढवणे (Scalable) सोपे आहे, संगणकीय जाळ्यामध्ये ही टोपॉलॉजी प्रभावी आहे.

हायब्रीड टोपॉलॉजी तोटे : या टोपॉलॉजीमध्ये मोठे जाळे बनविणे फार गुंतागुंतीचे होते आणि इतर संगणकीय जाळे टोपॉलॉजीपेक्षा हायब्रीड टोपोलॉजी नेटवर्क बनवताना महाग पडते.

प्रमाण टोपॉलॉजीपेक्षा हायब्रीड टोपॉलॉजीची निवड एखाद्या व्यवसाय क्षेत्रात, शाळेत अथवा वापरकर्त्याच्या गरजेनुसार करण्यात येते. संगणकांची संख्या, त्यांचे क्षेत्र आणि नेटवर्किंगची आवश्यकता इ. निकषांवर सदर टोपॉलॉजी कार्यान्वित करण्यात येते.

हायब्रीड टोपॉलॉजीचे प्रकार : स्टार-‍रिंग हायब्रीड टोपॉलॉजी (Star-Ring hybrid topology) आणि स्टार-बस हायब्रीड टोपॉलॉजी (Star-Bus hybrid topology) या दोन हायब्रीड टोपोलॉजी सामान्यत: वापरता असतात.

स्टार-‍रिंग हायब्रीड टोपॉलॉजी

स्टार-‍रिंग हायब्रीड टोपॉलॉजी (Star-Ring hybrid topology) : सदर टोपॉलॉजी ही स्टार आणि रिंग या टोपॉलॉजी वापरून तयार करण्यात येते. दोन अथवा अधिक स्टार टोपॉलॉजी (तारका संस्थिती; Star Topology) या रिंग टोपॉलॉजीला जोडलेल्या असतात.

स्टार-बस हायब्रीड टोपॉलॉजी

स्टार-बस हायब्रीड टोपॉलॉजी (Star-Bus hybrid topology) : सदर टोपॉलॉजी ही स्टार आणि बस या टोपॉलॉजी वापरून तयार करण्यात येते. दोन अथवा अधिक स्टार टोपॉलॉजी या रिंग टोपॉलॉजीला जोडलेल्या असतात.

कळीचे शब्द : #Hybrid #Networkterms #Topology # हायब्रीडटोपॉलॉजी #नेटवर्किंगटोपॉलॉजी #टोपॉलॉजी

संदर्भ सूची:-

समीक्षक : विजयकुमार नायक