(तारका संस्थिती). स्टार टोपॉलॉजी हा नेटवर्क टोपॉलॉजीचा (Network Topology) एक प्रकार आहे. स्टार या इंग्रजी नावाप्रमाणे या टोपॉलॉजीचा आकार स्टार प्रमाणे म्हणजेच ताऱ्याप्रमाणे असतो. स्टार टोपॉलॉजीमधे एक मध्य उपकरण (Central Device) असते, त्याला हब (Hub) असे म्हणतात. हब या उपकरणाला स्टार टोपॉलॉजीमध्ये असलेले सर्व संगणक, तारांच्या (Cable) साहाय्याने एकमेकांना जोडलेले असतात. स्टार टोपॉलॉजी यालाच स्टार नेटवर्क (Star Network) असेही म्हणतात. स्टार टोपॉलॉजीमध्ये असलेल्या संगणकांना पाठवायचा संदेश अथवा माहिती अगाेदर हबकडे पाठवली जाते व नंतर हब ती माहिती स्टार टोपॉलॉजीमध्ये असलेल्या संगणकाकडे पाठवण्याचे काम करते.

स्टार टोपॉलॉजीमध्ये असलेल्या मध्य उपकरणामध्ये (हब) काही बिघाड झाल्यास संपूर्ण स्टार नेटवर्क हे निकामी होऊ शकते व स्टार टोपॉलॉजीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. अन्य नेटवर्क टोपॉलॉजीच्या तुलनेत स्टार टोपॉलॉजी हे कमी खर्चिक व विश्वसनीय आहे.

स्टार टोपॉलॉजी फायदे : १. स्टार टोपॉलॉजी स्थापित करणे सोपे आहे.

२. स्टार टोपॉलॉजीमध्ये काही समस्या उद्भवल्यास निकामी उपकरण शोधणे सोपे आहे.

३. स्टार टोपॉलॉजीमध्ये संगणक जोडणे अथवा काढणे सोपे आहे, म्हणजेच स्टार नेटवर्क वाढविणे/कमी करणे सोयीस्कर आहे.

४. स्टार टोपॉलॉजी हे इतर नेटवर्क टोपॉलॉजीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.

५. स्टार टोपॉलॉजी ही वापरायला सोपी आहे.

स्टार टोपॉलॉजीचे तोटे : १. प्रत्येक संगणक हे मध्य उपकरणला स्वतंत्र तारेचा उपयोग करून जोडलेले असते, यामुळे उपकरण जास्त तारांची गरज लागते.

२. मध्य उपकरणमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण स्टार नेटवर्क निकामी होते.

कळीचे शब्द : #नेटवर्कटोपॉलॉजी #NetworkTopology #हब #Hub #स्टार #Cable

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख