विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा एक त्वचारोग. याला गजकर्ण असेही म्हणतात. गजकर्ण शरीराच्या ज्या भागाला होतो त्यानुसार त्याला वेगवेगळी नावे आहेत. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या, तर शरीराच्या मान, गाल व हातापायांच्या तळव्यावरील गजकर्णाला नायटा म्हणतात. (पहा : कु. वि. भाग-१ गजकर्ण.)