वनस्पतींमध्ये शोधण्यात आलेले एथिलीन हे पहिले वायुरूपी संप्रेरक आहे.

निर्मिती व वहन : पेशींना इजा झाली असता, परजीवी कीटकांनी हल्ला केल्यास अथवा पेशींवर कुठलाही ताण (Stress) आल्यास एथिलीनची निर्मिती होते. मिथिओनाईन ( Methionine) या अमिनो अम्लापासून एथिलीन बनविले जाते.

संप्रेरकांची कार्ये : १) ऑक्सिजन या संप्रेरकाची बरीचशी कार्ये एथिलीनच्या माध्यमातून घडवून आणली जातात; २) उपरिबीजपत्रात वाढ होते; ३) अननसामध्ये फूल धारणेला मदत; ४) मुळे व खोडांची लांबी नियंत्रित ठेवली जाते; ५) बाजूच्या शाखांची लांबी एथिलीनमुळे वाढते; ६) एथिलीनमुळे तृणधान्यांच्या बिया लवकर अंकुरतात; ७) एथिलीनमुळे पाने पिवळी होऊन गळण्याचे प्रमाण वाढते; ८) वनस्पतींच्या संरक्षण प्रक्रियेत एथिलीनचा सहभाग असतो; ९) पाणवनस्पतींमध्ये, एथिलीनमुळे, खोडे व देठांची लांबी वाढते. यामुळे वनस्पती पाण्यावर तरंगण्यास मदत होते.

समीक्षक : डॉ.बाळ फोंडके