हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार आद्य महत्त्वाचा व सर्व स्वर शुद्ध असलेला थाट. त्यात तिसांहून अधिक राग अंतर्भूत आहेत. या थाटातील प्रमुख राग पुढीलप्रमाणे :
(१) अल्हैय्या-बिलावल, (२) शंकरा, (३) बिहाग, (४) देसकार, (५) देवगिरी-बिलावल, (६) यमनी-बिलावल, (७) हेमकल्याण, (८) सर्पर्दा, (९) मलुहा-केदार, (१०) जलधर-केदार, (११) दुर्गा, (१२) शुक्ल-बिलावल, (१३) ककुभ-बिलावल, (१४) लच्छासाख, (१५) नट-बिलावल, (१६) कामोद-नाट, (१७) पट-बिहाग, (१८) नट-बिहाग, (१९) पहाडी, (२०) नट, (२१) केदार-नट, (२२) बिहागडा, (२३) सावनी, (२४) छाया, (२५) गुणकली, (२६) मांड, (२७) दीपक इत्यादी.
संदर्भ :
- भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र (भाग १), हाथरस, १९६४.
समीक्षण : सुधीर पोटे