(प्रस्तावना) पालकसंस्था : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर | समन्वयक : सुधीर पोटे | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (Akhil Bhartiya Gandharav Mahavidyalaya Mandal)

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (Akhil Bhartiya Gandharav Mahavidyalaya Mandal)

विविध स्तरावरील संगीत परीक्षांद्वारे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाद्वारे संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या भारतातील मोजक्या संस्थांपैकी एक अग्रेसर संगीत संस्था ...
अनोखेलाल मिश्र (Anokhelal Mishra)

अनोखेलाल मिश्र (Anokhelal Mishra)

मिश्र, पं. अनोखेलाल : (? १९१४ – १० मार्च १९५८). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीजवळील ताजपूर, सकलडीहा ...
अब्दुल करीमखाँ (Abdul Kareem Khan)

अब्दुल करीमखाँ (Abdul Kareem Khan)

अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ...
अमीर हुसेनखाँ (Ameer Hussainkhan)

अमीर हुसेनखाँ (Ameer Hussainkhan)

अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील ...
अरविंद मुळगांवकर (Arvind Mulgaonkar)

अरविंद मुळगांवकर (Arvind Mulgaonkar)

मुळगांवकर, अरविंद : (१८ नोव्हेंबर १९३७ – १७ फेब्रुवारी २०१८). महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक. ते ...
अरियकुडि रामानुज अयंगार (Ariyakudi Ramanuja Iyengar)

अरियकुडि रामानुज अयंगार (Ariyakudi Ramanuja Iyengar)

अरियकुडि रामानुज अयंगार : (१९ मे १८९०–२३ जानेवारी १९६७). दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यातील अरियकुडी ...
अरुण दाते (Arun Date)

अरुण दाते (Arun Date)

दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश ...
अल्लादियाखाँ (Alladiya Khan)

अल्लादियाखाँ (Alladiya Khan)

अल्लादियाखाँ : ( १० ऑगस्ट १८५५—१६ मार्च १९४६ ). कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक व जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष ...
अशोक दामोदर रानडे (Ashok Damodar Ranade)

अशोक दामोदर रानडे (Ashok Damodar Ranade)

रानडे, अशोक दामोदर : (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुलै २०११). भारतातील संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यू, संगीतशास्त्रज्ञ-रचनाकार, गायक व गुरू म्हणून विख्यात ...
अहमदजान थिरकवा (Ahmedjaan Thirakwa)

अहमदजान थिरकवा (Ahmedjaan Thirakwa)

थिरकवा, अहमदजान : (१८९१ ? – ११ जानेवारी १९७६). प्रख्यात हिंदुस्थानी तबलावादक. त्यांचे जन्मवर्ष १८८४ किंवा १८८६ असेही दर्शविले जाते ...

अ‍ॅल्टो (Alto)

(१) पाश्चात्त्य संगीतातील मानवी आवाज-पल्ल्यांच्या केलेल्या चार प्रकारांपैकी एक. मूळ इटालियन शब्द आल्तो (उंच). स्त्रियांच्या आवाजाचा मंद्र पंचमापासून ते तार ...
आधार स्वर (Adhar Swar)

आधार स्वर (Adhar Swar)

मध्यसप्तकाचा षड्ज हा भारतीय आणि पाश्चात्त्य संगीतातील अचल आधार स्वर होय. यालाच प्राण स्वर किंवा जीव स्वर अशीही संज्ञा आहे ...
आनंदराव रामचंद्र लिमये (Anandrao Ramchandra Limaye)

आनंदराव रामचंद्र लिमये (Anandrao Ramchandra Limaye)

लिमये, आनंदराव रामचंद्र : (२९ नोव्हेंबर १९२७—२५ मे १९९४). जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला. आनंदरावांचे ...
आबान मिस्त्री (Aban Mistry)

आबान मिस्त्री (Aban Mistry)

आबान मिस्त्री मिस्त्री, आबान : (६ मे १९४० — ३० सप्टेंबर २०१२). भारतातील प्रसिद्ध महिला तबलावादक तसेच संगीतशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ...
आलाप (Alaap)

आलाप (Alaap)

चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे आरोहावरोही ...
आलापना (Alapana)

आलापना (Alapana)

आलापना हा तत्कालीन परिस्थितीमध्ये ऐनवेळी पण काहीसे गुणगुणल्याप्रमाणे सादर केला जाणारा एक गानप्रकार आहे. ज्याद्वारे सादर केल्या जाणाऱ्या रागाचा स्थायीभाव ...
आसावरी थाटातील राग (Asavari Thaat)

आसावरी थाटातील राग (Asavari Thaat)

भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात गंधार, धैवत, निषाद हे तीन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध असतात. या थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, ...
इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन - इप्टा (Indian People's Theatre Association - IPTA)

इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन – इप्टा (Indian People’s Theatre Association – IPTA)

भारतातील कलावंतांची एक सर्वांत जुनी संस्था. भारतभर ती ‘इप्टा’ या नावाने ओळखली जाते. स्वातंत्र्य लढ्याच्या वाटचालीबरोबरच दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमिवर समाजात ...
उ. अल्लारखाँ (Ustad Allarakhan)

उ. अल्लारखाँ (Ustad Allarakhan)

उ. अल्लारखाँ : (२९ एप्रिल १९१९ – ३ फेब्रुवारी २०००). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय तबलावादक आणि श्रेष्ठ कलावंत. त्यांचे मूळनाव अल्लारखाँ ...
उल्हास बापट (Ulhas Bapat)

उल्हास बापट (Ulhas Bapat)

बापट, उल्हास यशवंत : (३१ ऑगस्ट १९५० – ४ जानेवारी २०१८). प्रसिद्ध निष्णात महाराष्ट्रीय संतूरवादक आणि या तंतुवाद्यावर ‘मींड’ (स्वरसातत्य) ...