सी++ ही एक संगणकीय भाषा आहे. वस्तुनिष्ठता (object oriented), निम्नस्तरीय स्मृती उपयोजन (low level memory manipulation) आणि गणितीय सूत्राधिष्ठित आज्ञावली (generic programming) ही या भाषेची वैशिष्ट्ये आहेत.

आ. १. सी ++ आज्ञावली

इतिहास / पार्श्वभूमी : १९७९ मध्ये डॅनिश संगणक शास्त्रज्ञ ब्‍यार्ने स्त्राउस्त्रप (Bjarne Stroustrup) यांनी सी-भाषिक वर्ग या विषयावर संशोधन सुरू केले. पीएच.डी.करिता अभ्यास करताना स्त्राउस्त्रप यांना एक नवीन संगणकीय भाषा तयार करण्याची प्रेरणा आज्ञावली (programming) निर्मितीच्या अनुभवातून मिळाली. स्त्राउस्त्रप यांना आढळले की — सिमुला (Simula) या आज्ञावली प्रकारामध्ये बृहद् सॉफ्टवेअरच्या प्रगतीसाठी उपयुक्त वैशिष्ट्ये होती, परंतु व्यावहारिक वापरासाठी ही भाषा मंद गतीची होती. तसेच बीसीपीएल (BCPL) हा आज्ञावली प्रकार जलद होता, परंतु बृहद् सॉफ्टवेअरच्या प्रगतीसाठी योग्य नव्हता.

२०१७ पर्यंत सी ++ ही जावा आणि सी या संगणकीय भाषांनंतरची तिसरी सर्वांत लोकप्रिय कार्यान्वयन/आज्ञावली भाषा आहे.

भाषेचे स्वरूप : सी ++ भाषेचे दोन मुख्य घटक आहेत : प्रामुख्याने सी उपवर्गाद्वारे (subset) प्रदान केलेल्या हार्डवेअर वैशिष्ट्यांचे थेट आरेखन (mapping) आणि त्या आरेखनावर आधारित शून्यमूल्य अतिरिक्त अवच्छेद (Zero overhead abstraction).

आ. २. सी++ उपयुक्तता.

सी ++‍ ही भाषा सॉफ्टवेअर प्रणालींच्या अनुप्रयुक्त्यांमध्ये (Application software) उपयुक्त ठरते. सॉफ्टवेअर बांधणी (infrastructure) आणि संगणकीय पटल (desktop) अनुप्रयोग, सर्व्हर (E-commerce, Web search or SQL server) आणि क्लिष्ट अनुप्रयुक्तीची (उदा., टेलिफोन स्विच) सी ++ ही एक संकलित भाषा आहे.

मानांकन : आयएसओ / आयईसी १४८८२ : २०१७ (अनौपचारिक रीत्या सी ++ १७ म्हणून ओळखले जाते) डिसेंबर २०१७ मध्ये मान्यताप्राप्त आणि आयएसओ या मानक संस्थेने प्रकाशित केलेल्या नवीनतम मानक आवृत्तीद्वारे  सी ++ आज्ञावली प्रमाणित आहे. सी # (C sharp),  जावा (Java) आणि सी (C) च्या आधुनिक आवृत्त्या यांवर सी ++ या भाषेचा प्रभाव पडतो. सी ++ या भाषेचे एकत्रीकरण (compilation) करावे लागते, त्यामुळे जावा (JavaScript) या भाषेप्रमाणे       सी ++ ही थेट शोधसंचावर (browser) चालत नाही.

उपयुक्तता : (१) सी ++ ही सहज आणि वहनक्षम (portable) भाषा आहे. त्यामुळे तिचा वापर अनुप्रयक्ती सुधारणांकरिता (App development) केला जातो.

(२) सी ++ एक वस्तुनिष्ठ कार्यान्वयन भाषा आहे आणि त्यात वर्ग, वारसा, बहुविधता, विदा सारांश (data abstraction) आणि विदा संचयित कोश (encapsulation) समाविष्ट आहे.

(३) सी ++ हा एक समृद्ध संग्रह (library) आहे.

(४) सी ++ अपवाद हाताळणीकरिता परवानगी देते आणि ओव्हरलोडिंग फंक्शन जे सी या यंत्रणेमध्ये ही सुविधा शक्य नाही.

(५) सी ++ एक कार्यक्षम आणि जलद भाषा आहे. ही आरेखित वापरकर्ता आंतरपृष्ठ (GUI, Graphical User Interface) यापासून वास्तव कालावधी सदृशीकरणासाठी (real time simulation) अनुप्रयोगांच्या विस्तृत श्रेणीचा शोध घेते.

 

संदर्भ :

• Applications of C/C++ in the Real World – Invensis Technologies

• https://www.invensis.net › Home › IT