अणुकेंद्रांच्या आणि इतर कणांच्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) मूल्य अनाधुनिक चुंबकीय आघूर्णाच्या एककाच्या मूल्याहून बरेच कमी असते. त्यामुळे त्यांसाठी न्यूक्लीय मॅग्नेटॉन (m_n) हे एकक वापरले जाते. या एककाचे समीकरण खालीलप्रमाणे

m_n = \frac {eh}{4pm_p}

m_p, e आणि h हे प्रोटॉनचे वस्तुमान, प्रोटॉनचा विद्युतभार आणि प्लांकचा स्थिरांक आहे.

S. I. एककात न्यूक्लीय मॅग्नेटॉनचे मूल्य

1 m_n = 5.050 783 699 x 10^{-27} J/T.

पहा : बोहर मॅग्नेटाॅन.

समीक्षक : मा. रा. राजवाडे.