ब्रिटीश भूगोलतज्ञ जे एपलटन यांने प्रोस्पेकट-रेफुज सिद्धांत [Prospect Refuge Theory]  त्याच्या “एक्स्पिरिअन्स ऑफ लांडस्कॅप” (१९७०) या पुस्तकात मांडला. भूदृश्य व मानवी वर्तन यातील परस्पर संबंध यावर त्याने भाष्य केले आहे. प्रॉस्पेक्ट म्हणजे संधी पण या संदर्भात उपलब्ध दृश्य परिसर वा उपलब्ध दृश्याची विस्तीर्णता व रेफुज म्हणजे आसरा वा आश्रय. एपलटन म्हणतो माणसांना दृश्य परिसराच्या उपलब्धते बरोबर आसराही लागतो व माणसे अश्याच जागा निवडतात. विविध भूदृश्यांचे दाखले व उदाहरणे देऊन त्याने त्याचा सिद्धांत स्पष्ट केला आहे. टेकडावर विस्तीर्ण दृश्य तर असते परंतु चोहोकडून हल्ला होऊ शकतो अशी भीती वाटू शकते. मात्र एक आश्रयाचे झाड सुरक्षित करते. तसेच दाट झाडीत आश्रय असतो. परंतु दृश्य उपलब्ध नसल्याने सतत भीती वाटू शकते ही व अशी अनेक उदाहरणे तो देतो.

अगदी बागेतल्या बाकाच्या निवडीपासून ते इमारतीच्या स्थान निश्चितीत पर्यंत याचा प्रत्यय आपल्याला येतो. एपलटन म्हणतो ‘न दिसता पाहणे’ हा मानवी स्वभाव धर्म आहे. या सिद्धांतानुसार जर मोकळ्या जागांचे नियोजन केले तर मोकळे विस्तीर्ण दृश्य व आसरा या मानवी गरजा पूर्ण होवून मोकळ्या जागा अधिक उपयुक्त व आवडणाऱ्या होवू शकतील.

समीक्षक : श्रीपाद भालेराव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.