तक्ता १ : फ्लेक ग्रॅफाइट नाय रेझिस्ट ASTM A 436

बिडामध्ये निकेल मिसळून केलेल्या वेगवेगळ्या मिश्रधातूंचे हे एक कुटुंब आहे. नाय-रेझिस्ट बनविताना बिडामध्ये मुख्यतः निकेल मिसळले जाते. काही मिश्रधातूंच्या बाबतीत निकेलसोबत तांबे, क्रोमियम इत्यादींचा वापर केला जातो. या मिश्रधातूमधील कार्बन हा फ्लेकच्या किंवा गोळ्यांच्या स्वरूपातही असू शकतो. त्यानुसार त्या मिश्रधातूंना अनुक्रमे फ्लेक ग्रॅफाइट नाय-रेझिस्ट व तन्य/तंतूशील (Ductile) नाय-रेझिस्ट संबोधले जाते. अंतर्गत रचनेमधील ग्रॅफाइट सोडून उरलेले भाग म्हणजे मॅट्रिक्स हे ऑस्टेनाइट स्वरूपात असते. वास्तविक ऑस्टेनाइट हे लोहाचे उच्च तापमानास आढळून येणारे रूप आहे. परंतु निकेलच्या वापरामुळे ते तापमानास स्थिर होऊ शकते. ऑस्टेनाइट हा घटक अचुंबकीय आहे. नाय-रेझिस्ट हे उच्च मिश्रधातू पोलादांपेक्षा किमतीने स्वस्त आहे. त्याची ओतकाम सुलभता व मशिनिंग सुलभता पोलादाच्या मिश्रधातूंपेक्षा खूपच चांगली असते. किचकट किंवा गुंतागुंतीची कास्टिंगसुद्धा आपण नाय-रेझिस्टमध्ये काढू शकतो.

फ्लेक ग्रॅफाइट नाय-रेझिस्ट : यासंबंधी ASTM चे मानक A 436 आहे. तसेच BS मानक BS 3468 व भारतीय मानक IS 2749 हीसुद्धा साधारणपणे त्यासारखीच मानके आहेत. ASTM A 436 मध्ये आठ ग्रेड आहेत. यांपैकी चार ग्रेड या उच्च तापमानातील वापरासाठी आहेत (पाहा : तक्ता १ मधील २, २ b, ३ व ५ ), तर उरलेले चार ग्रेड (१,१ b, ४ व ६) गंजविरोधी वापरासाठी आहेत. निकेलच्या वापरामुळे ऑस्टेनाइट बनते. ते गंजरोधक (Corrosion resistant )असून त्याची उच्च तापमानास ताकददेखील चांगली असते. निकेलबरोबर क्रोमियम व सिलिकॉन घातल्यास मिश्रधातूंमध्ये झीजविरोधी (Wear resistance) गुणधर्म येतात, तसेच ते उच्च तापमानास पृष्ठभागावर होणारी प्राणवायूची प्रक्रियासुद्धा रोखून ठेवू शकतात.

तक्ता २ : तंतूशील नायरेझिस्ट ASTM A439

 

तंतूशील नाय-रेझिस्ट : यासंबंधी ASTM A439 हे मानक आहेत., तसेच BS 3468 व IS 2749 हीसुद्धा त्यासारखीच मानके आहेत. तक्ता २ मध्ये नऊ ग्रेड आहेत; त्यांचे रासायनिक घटक सर्वसाधारणपणे फ्लेक ग्रॅफाइट नाय-रेझिस्टसारखेच असतात. मात्र या मिश्रधातूंच्या रचनेत मॅग्नेशियमची प्रक्रिया करून ग्रॅफाइट हे गोळ्यांच्या स्वरूपात आणले जाते. फ्लेक ग्रॅफाइटमधील  १ व १ b यात तांबे असल्यामुळे त्या ग्रेड तंतूशील नाय-रेझिस्ट या स्वरूपात आणता येत नाहीत. तंतूशील नाय-रेझिस्टचे गुणधर्म फ्लेक ग्रॅफाइट नाय-रेझिस्टसारखेच असून त्याशिवाय त्याची उच्च ताकद व तंतूंशीलता यांचा आणखी फ्लेक ग्रॅफाइट नाय-रेझिस्ट व तंतूशील नाय-रेझिस्ट यांचे यांत्रिक गुणधर्म अनुक्रमे तक्ता ३ व ४ मध्ये दिले आहेत. काही तंतूशील नाय-रेझिस्ट हे कमी तापमानासदेखील आपला चिवटपणा टिकवून ठेवू शकतात. ते क्रायोजेनिक वापरासाठी उपयोगात आणले जातात. त्यांचे रासायनिक गुणधर्म पुढीप्रमाणे आहेत. त्यासंबंधी ASTM 571  हे मानक आहे.

तक्ता ३ : फ्लेकग्रॅफाइट नायरेझिस्ट यांत्रिक गुणधर्म ASTM A 436
        तक्ता ४ : तंतूशील नायरेझिस्टयांत्रिक गुणधर्म ASTM A439

उपयोग : नाय रेझिस्ट हे रासायनिक प्रक्रिया उद्योगात वापरले जाते. उदा., संपीडक (Compressor), ब्लोअर, धारित्र (Condenser), फॉस्फेट भट्टीचे भाग, पाइप, व्हाल्व्ह, पंप ,इम्पेलर इ. अन्न हाताळणीच्या यंत्रणेतदेखील ते वापरले जाते. उदा., कॅनिंग मशिनरी डिस्टलरी यंत्रणा, फीड स्क्रू, मेटल ग्रायन्डर, सॉल्ट फिल्टर इ. उच्च तापमानाच्या वापरात ते सिलिंडर लायनर, बहुमुखी निष्कास नळी (Exhaust Manifold), व्हाल्व्ह  गाइड, वायू टरबाइन प्रावरण (Gas turbine housing), घूर्णी भारित प्रावरण (Turbo Charger housing), नोजलरी वॉटर पंप बॉडी, ॲल्युमिनियम पिस्टनमधील पिस्टनरी इत्यादीसाठी वापरले जाते.

                                                                                                                         समीक्षक : पी.पी. देशपांडे