टंगस्टनाची ऑक्सिडीकरण अवस्था २+ पासून ६+ पर्यंत असू शकते. जास्त ऑक्सिडीकरण क्रमांक असलेली संयुगे अधिक स्थिर असतात. आवर्त सारणीतील सहाव्या गटातील अ विभागात असलेल्या क्रोमियम आणि मॉलिब्डेनम यांप्रमाणेच टंगस्टनाचे रासायनिक गुणधर्म आहेत. जलविद्रावात टंगस्टनाचे जटिल आयन (विद्युत् भारित अणुगट) निर्माण करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्या विक्रिया थोड्या गुंतागुंतीच्या असतात.

टंगस्टन डाय-ऑक्साइड

ऑक्साइडे : टंगस्टनाची निश्चित आणि स्थिर अशी तीन परिचित ऑक्साइडे आहेत.

(१) टंगस्टन डाय-ऑक्साइड : (WO2). टंगस्टन डाय-ऑक्साइड संयुग तपकिरी रंगाचे असून याचे स्फटिक चतुष्कोणीय असतात. याची घनता १२·११ इतकी असते. तपकिरी पुडीच्या स्वरूपात आढळणारे हे ऑक्साइड आपोआप पेट घेते आणि त्याचे टंगस्टन ट्राय-ऑक्साइड तयार होते.

डायटंगस्टन पेंटॉक्साइड

(२) डायटंगस्टन पेंटॉक्साइड : (W2O5). हे टंगस्टनाचे निळे ऑक्साइड आहे.  तापविल्यावर ८०० से. तापमानाला याचे संप्लवन (Sublimation) होते. याचे हायड्रोजनने क्षपण करून टंगस्टन डाय-ऑक्साइड किंवा टंगस्टन धातू सहज मिळविता येते.

(३) टंगस्टन ट्राय-ऑक्साइड : (टंगस्टिक ऑक्साइड, W2O3). सामान्यत: पिवळ्या पुडीच्या स्वरूपात असते. पुडीची घनता ७·१६ ते १,४७३ से. या तापमानाला थोडे संप्लवन होऊन वितळते. ऑक्साइडांपैकी हे सर्वांत प्रमुख असून टंगस्टनाची पूड मिळविण्यासाठी सामान्यत:

टंगस्टन ट्राय-ऑक्साइड

याचाच उपयोग केला जातो. १,०५० से. पेक्षा अधिक तापमान असलेल्या कार्बनाने क्षपण केल्यावर टंगस्टन डाय-ऑक्साइडापासून निवळ धातू तयार होते. ते पाण्यात व अम्ल विद्रावात विरघळत नाही, परंतु क्षाराच्या प्रबल विद्रावात टंगस्टेटे तयार होतात.

अम्‍ले : टंगस्टिक ऑक्साइडाची निश्चित व परिचित अशी तीन अम्ले आहेत.

टंगस्टिक अम्ल

(१) टंगस्टिक अम्ल (H2WO4) : हायड्रोजन कार्बोनेट आणि सोडियम टंगस्टेट यांची विक्रिया झाली असता टंगस्टिक अम्ल तयार होते. तसेच टंगस्टन आणि हायड्रोजन पेरॉक्साइड यांची परस्परांशी विक्रिया करून टंगस्टिक अम्ल तयार करतात.

(२) मेटाटंगस्टिक अम्ल : (H8W12O40·x H2O). हे जलविद्राव्य असते.

लवणे : M2WO4· xH2O असे टंगस्टेटाचे सामान्य सूत्र असते. क्षार धातू (लिथियम, सोडियम, पोटॅशियम इ.) व मॅग्नेशियम यांची टंगस्टेटे पाण्यात विरघळतात परंतु इतर विरघळत नाहीत.

उपयोग : कॅल्शियम, बेरियम व मॅग्नेशियम यांच्या टंगस्टेटांचा अनुस्फुरक (Fluorescent) द्रव्ये म्हणून ऋण किरण नलिकेत उपयोग करतात.

लवण रासायनिक सूत्र
मेटा टंगस्टेटे 3M2O·12WO3·x H2O
पॅरा टंगस्टेटे 5M2O·12WO3·xH2O
टंगस्टन : इतर काही हॅलाइडे

हॅलाइडे : टंगस्टनाची ३, ४, ५ व ६ संयुजा असणारी हॅलाइडे माहित आहेत. हवेत किंवा पाण्याच्या वाफेत अस्थिर असणे, हे त्यांचे सामान्यत: आढळणारे गुणधर्म होत.

उपयोग : बाष्पनशील असल्यामुळे त्यांचा विशेषत: हेक्झॅक्लोराइडाचा WCl6 उपयोग हीन धातूंवर टंगस्टनाचा मुलामा देण्यासाठी होतो.

कार्बाइडे : टंगस्टनाच्या कार्बाइडांपैकी प्रमुख म्हणजे टंगस्टन कार्बाइड (WC) व डायटंगस्टन  कार्बाइड (W2C)ही होत.

टंगस्टन कार्बाइड : (WC). टंगस्टन व कार्बन (काजळी) यांचे मिश्रण १,५००–१,६०० से. इतके तापवून ती करड्या पुडीच्या स्वरूपात तयार करतात. त्यांच्या पुडीचा कठीणपणा जवळजवळ हिऱ्याइतका असतो.

टंगस्टन : इतर काही महत्त्वाची संयुगे

उपयोग : कार्बाइडाच्या पुडीत संयोजक म्हणून कोबाल्टाचे चूर्ण मिसळून व उष्णता देऊन तिला विविध आकार देता येतात. या संयोजित कार्बाइडाचा तारा ओढावयाच्या मुद्रा, लेथ, खडकाला छिद्रे पाडावयाची हत्यारे, करवती इ. अनेक कापावयाच्या यांत्रिक हत्यारांत मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

पहा : टंगस्टन.

संदर्भ : http://tungsten.atomistry.com/compounds.html