जीवनसत्त्व मेदविद्राव्य असून याला ‘सनशाइन जीवनसत्त्व’ असेही म्हणतात. हे जीवनसत्त्व स्टेरॉइडसारख्या (Steroids) संरचनेत तसेच संप्रेरकांसारखे (Hormones) कार्य करते. जीवनसत्त्वाचा पूर्वघटक (pro-vitamin) ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल (7-Dehydrocholesterol) हे जीवनसत्त्व याचे निष्क्रिय रूप आहे. या पूर्वघटकाचे सक्रिय घटकामध्ये परिवर्तन त्वचेखाली सूर्यप्रकाशातील अतिनील किरणाद्वारे (Ultravioletrays) होते. यामागे अंतर्रेणू परिवर्तन (Intramolecular rearrangement) कारणीभूत आहे. कोलेस्टेरॉल संश्लेषण (Biosynthesis) होताना ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल रेणू तयार होतो. सूर्यप्रकाशाच्या मदतीने ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉलचे त्त्वचेमध्ये कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये (Cholecalciferol) रूपांतरण होते. कोलेकॅल्सिफेरॉल हे जीवनसत्त्वाचे सक्रिय रूप आहे. जीवसत्त्व डी (पूर्वघटक डी) लहान आतड्यातून पित्त क्षारासमवेत शोषला जातो. डी जीवनसत्त्वाचे यकृत आणि नंतर वृक्कामध्ये डी (१, २५-डायहायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉल) यामध्ये रूपांतरण होते.

जीवनसत्तव ड (कोलेकॅल्सिफेरॉल) : रासायनिक संरचना

वनस्पतिजन्य जीवनसत्त्वापेक्षा प्राणिजन्य जीवनसत्त्व शरीरात सहजपणे शोषले जातात. अंडी, अंड्यातील पिवळा बलक, दूध व दुग्धजन्य पदार्थ, लोणी, चीज, माशांच्या यकृतापासून मिळणारे तेल हे जीवनसत्त्वाचे उत्तम स्रोत आहे. तसेच कोवळ्या सूर्यप्रकाश हा देखील जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

दररोजची आवश्यकता : बालकांमध्ये दररोज १०० आंतरराष्ट्रीय एकक (IU), वाढत्या मुलांमध्ये दररोज २५०IU तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना दररोज २५०IU अशा प्रमाणात जीवनसत्त्वाची (कोलेकॅल्सिफेरॉल) आवश्यकता असते.

ड जीवनसत्त्व कार्य : जीवनसत्त्व डी यामुळे रक्तरसातील (Plasma) कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या पातळीचे नियमन होते. डी रोगप्रतिकारक रेणू (Modulator) असल्याने कोविड साथीच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनसत्त्व डी सुचविले गेले. त्याच्या कमतरतेमुळे कोविड रुग्णाची लक्षणे वाढल्याचे दिसून आले होते. रक्तपेशींची संख्या वाढण्यासाठी डी आवश्यक असते. हे रक्तक्षय (Anemia) कमी करण्यास मदत करते तसेच प्रतिकारक्षमता वाढवते. डी च्या सानिध्यात लहान आतडे व वृक्क यांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण वाढते. जीवनसत्त्वामुळे पुर:स्थ ग्रंथी (Prostate), मोठे आतडे, मलाशय आणि स्तन यांसंबंधीच्या कर्करोगांमध्ये काही प्रमाणात संरक्षण मिळते.

जीवनसत्त्व ड : स्रोत

ड जीवनसत्त्व कमतरता : या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस (Rickets) हा विकार होतो. याच्या तीव्र विकारात गुडघ्यापासून खालील पायांची हाडे वाकडी होतात. मुडदूस विकारात हाडांचे अपुरे खनिजीकरण होते. प्रौढांमध्ये जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अस्थिमृदुता (Osteomalacia) होते. प्रौढ व्यक्तींच्या हाडांमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या कमतरतेमुळे अस्थिसुषिरता (Osteoporosis) निर्माण  होते. या आजारात लहानशा धक्क्यामुळे देखील शरीरातील हाडे भंगतात. हाडांमध्ये मोठ्याप्रमाणात पोकळ्या तयार होतात.

सध्या कोविड साथीच्या काळात जीवनसत्त्वाचे डोस घेण्याचे वैद्यकीय सल्ल्यानुसार सुचवले आहे.

शाकाहारी तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्ती, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार असलेले रुग्ण त्याचप्रमाणे अपशोषण (Malabsorption) आणि कुपोषण (Malnutrition) यांमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते.

ड जीवनसत्त्व आधिक्य : या जीवनसत्त्वाच्या त्वरित झालेल्या आधिक्यामुळे मळमळ, उलट्या, अतिसार ही लक्षणे दिसतात. दीर्घकालील परंतु, सावकाश झालेल्या आधिक्यामुळे वृक्क व वृक्क-मूत्रवाहिन्यांमध्ये अश्मरी (खडे) होतात. स्नायूंमध्ये वाढलेल्या कॅल्शियममुळे स्नायू काठीण्य होते. फुफ्फुस धमन्या कठीण होतात. एरवी ज्या ऊतींमध्ये कॅल्शियम साठत नाही अशा ठिकाणी विक्षेपी कॅल्सीकरण (Metastatic calcification) होते. वाढत्या मुलांमध्ये हाडांचे अत्याधिक खनिजीकरण होऊ शकते.

पहा : जीवनसत्त्व ड (पूर्वप्रकाशित), जीवनसत्त्वे, मुडदूस.

संदर्भ :

समीक्षक : वंदना शिराळकर