(प्रस्तावना) पालकसंस्था : मराठी विज्ञान परिषद, मुंबई | समन्वयक : मोहन मद्वण्णा | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
जीवशास्त्र/जीवविज्ञान या विज्ञानशाखेत सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने जीवविज्ञानाची अनेक उपविभाग व शाखा यांमध्ये वर्गवारी केली जाते. या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ‘वनस्पतिविज्ञान’ आणि ‘प्राणिविज्ञान’ या दोन प्रमुख मोठ्या शाखांमध्ये दिली जाते. शाखाविस्तार लक्षात घेऊन वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची स्वतंत्र ज्ञानमंडळे तयार करण्यात आली आहेत. ‘जीवशास्त्र-प्राणिविज्ञान’ या ज्ञानमंडळांतर्गत प्राणिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राणिविज्ञान या विज्ञानशाखेच्या शारीर, शरीरक्रियाविज्ञान, आकारविज्ञान, कोशिकाविज्ञान, प्राणिभूगोल इत्यादी विविध उपशाखा आहेत. या उपशाखांच्या अनुषंगाने विविध अभ्यासपद्धतींचा अवलंब केला जातो. मानवी वैद्यक, पशुवैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मजीवांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, संरचना व कार्य तसेच सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञान या शाखेत केला जातो. सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान या सूक्ष्मजीवविज्ञानाच्या प्रमुख उपशाखा आहेत. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, जनुकक्रिया इत्यादींसारख्या मूलभूत जैव प्रक्रियांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना मूलभूत प्रायोगिक साधन म्हणून मुख्यत सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो.

जीवरसायनशास्त्र हे जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान या विषयांशी निगडित असलेले शास्त्र असून त्यामध्ये सजीव घटकांच्या रासायनिक विश्लेषण व रासायनिक स्थित्यंतर यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सजीव सृष्टीचा अभ्यास करताना या शास्त्रातील नवनवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जैवतंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत असलेली आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. यात सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. रेणू पातळीवर आधारित असलेले हे शास्त्र मुख्यत्वेकरून कृषि, आरोग्य व पर्यावरण या विज्ञानशाखांशी संबंधित आहे. या शाखांशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. एकूणच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी जीवशास्त्र-प्राणिविज्ञान या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum)

अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum)

दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) आढळून येणारे अंतर्द्रव्य जालिका हे एक पेशीअंगक (Cell organelle) आहे. परस्परांना जोडलेल्या अनेक सूक्ष्म पोकळ नलिका ...
अँफिऑक्सस (Amphioxus / Lancelet)

अँफिऑक्सस (Amphioxus / Lancelet)

रज्जुमान (Chordata) संघातील ज्या प्राण्यांच्या डोक्याकडील भागात मेरूरज्जू असतो, त्याचा सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ बनवला आहे. या उपसंघात अँफिऑक्सस या प्राण्याचा समावेश ...
अमीबा (Amoeba)

अमीबा (Amoeba)

सगळ्या जिवंत प्राण्यांत अगदी साधी शरीररचना असणारा हा प्राणी आहे. आधुनिक वर्गीकरणानुसार दृश्यकेंद्रकी अधिक्षेत्रामधील (Eukaryotic Domain) अमीबोझोआ संघातील (Amoebozoa Phylum) ...
अवशेषांगे (Vestigial organs)

अवशेषांगे (Vestigial organs)

सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये कमी विकसित किंवा कार्यक्षमता कमी झालेल्या शरीरातील काही अवयवांना अवशेषांगे (Vestigial organs) म्हणतात. लॅटिन भाषेमध्ये vestigium म्हणजे वाळूतून ...
असिपुच्छ मासा (Green swordtail Fish)

असिपुच्छ मासा (Green swordtail Fish)

या माशाचा समावेश सायप्रिनोडोन्टीफॉर्मिस (Cyprinodontiformes) गणातील पॉइसिलीडी (Poeciliidae) कुलात होतो. त्याच्या शेपटीला असलेल्या तलवारीसारख्या विस्तारामुळे ह्याला असिपुच्छ मासा असे म्हटले ...
आंधळा साप / वाळा (Blind Snake)

आंधळा साप / वाळा (Blind Snake)

आंधळा साप (इंडोटिफ्लॉप्स ब्रॅमिनस) आंधळा साप : खवल्यांनी झाकलेले डोळे. हा साप सरीसृप (Reptilia) वर्गाच्या स्क्वामाटा (Squamata) गणातील टिफ्लोपिडी (Typhlopidae) ...
आर्गली (Argali)

आर्गली (Argali)

पृष्ठवंशी संघातील स्तनी (mammalia) वर्गाच्या खुरी अधिगणाच्या समखुरी गणातील (Artiodactyla) सर्वांत मोठी वन्य मेंढी आहे. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन (Ovis ...
आर्डवुल्फ (Aardwolf)

आर्डवुल्फ (Aardwolf)

हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी ...
आर्डव्हॉर्क (Aardvark)

आर्डव्हॉर्क (Aardvark)

आर्डव्हॉर्क (ओरिक्टेरोपस ॲफर) या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या ट्युबिलिडेंटाटा (Tubulidentata)गणातील ओरिक्टेरोपोडिडी (Orycteropodidae) या कुलात होतो. या कुलातील आर्डव्हॉर्क ही एकमेव ...
आहारातील आवश्यक खनिजे (Essential minerals in the diet)

आहारातील आवश्यक खनिजे (Essential minerals in the diet)

शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते. हाडे आणि दात यांच्या निर्मितीमध्ये, शरीरातील आवश्यक द्रव्यांमध्ये, ऊतींमध्ये तसेच अनेक विकर ...
इग्वाना (Iguana)

इग्वाना (Iguana)

पृष्ठवंशी संघाच्या सरीसृप वर्गाच्या (Reptilia) स्क्वॅमाटा-सरडा (Squamata-Lijzard) गणातील इग्विनिआ (Iguania) उपगणातील इग्वानिडी (Iguanidae) कुलातील सरड्यासारखा दिसणारा परंतु, त्याच्यापेक्षा मोठा प्राणी ...
उत्परिवर्तन : गुणसूत्र रचना बदल  (Mutation in chromosome structure)

उत्परिवर्तन : गुणसूत्र रचना बदल  (Mutation in chromosome structure)

गुणसूत्राच्या संख्येत झालेल्या बदलाप्रमाणेच गुणसूत्राच्या रचनेत झालेला बदल (Mutation in chromosome structure) हा गुणसूत्रीय उत्परिवर्तनाचा (Chromosomal mutation) एक प्रकार आहे. मानवाप्रमाणे ...
उत्परिवर्तन : गुणसूत्र संख्या बदल  (Mutation in chromosome number)

उत्परिवर्तन : गुणसूत्र संख्या बदल  (Mutation in chromosome number)

संख्यात्मक गुणसूत्र विकृतींची काही उदाहरणे व त्यांची गुणसूत्र रचना (सूत्रसमूहचित्र; Karyotype) गुणसूत्राच्या संख्या अथवा रचनेत झालेला बदल हा गुणसूत्रीय उत्परिवर्तनाचा (Chromosomal ...
उत्परिवर्तन (Mutation)

उत्परिवर्तन (Mutation)

सजीवांच्या एका पिढीकडून पुढील पिढ्यांकडे संक्रमित होऊ शकणाऱ्या जीनोममधील कोणत्याही बदलास उत्परिवर्तन असे म्हणतात. सर्व सजीवांच्या जीनोममध्ये बदल होणे ही ...
एमू (Emu)

एमू (Emu)

हा पक्षिवर्गाच्या कॅझुअॅरिफॉर्मिस (Casuariiformes) गणातील ड्रोमॅइडी (Dromaiidae) कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई (Dromaius novaehollandiae) असे आहे. हा ...
एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय) [Escherichia Coli (E. Coli)]

एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय) [Escherichia Coli (E. Coli)]

एश्चेरिकिया कोलाय (Escherichia Coli) या जीवाणूचा समावेश प्रोटीओबॅक्टिरिया (Proteobacteria) संघातील गॅमाप्रोटीओबॅक्टिरिया (Gammaproteobacteria) वर्गाच्या एंटेरोबॅक्टिरियालीस (Enterobacteriales) या गणात  होतो. हा जीवाणूंच्या ...
कर्नाळा पक्षी अभयारण्य ( Karnala bird Sanctuary)

कर्नाळा पक्षी अभयारण्य ( Karnala bird Sanctuary)

कर्नाळा अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. याचे भौगोलिक स्थान १८० ५४’ ३१” उत्तर व ...
कायटन (Chiton) 

कायटन (Chiton) 

कायटन हे मृदुकाय संघातील (Mollusca) बहुकवची पॉलिप्लॅकोफोरा (Polyplacophora) वर्गातील प्राणी असून किनाऱ्यालगतच्या भरती-ओहोटीमधील प्रदेशांत समुद्रतळाशी किंवा खडकाला चिकटून त्यांच्या खाचीत ...
कावळा (House crow)

कावळा (House crow)

कावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. हा मूळचा आशियातील पक्षी असून जगामध्ये त्याचा आढळ सर्वत्र आहे ...
कृत्रिम रचनांतरण (Artificial Transformation)

कृत्रिम रचनांतरण (Artificial Transformation)

कृत्रिम रचनांतरण ही डीएनएमध्ये फेरबदल घडवण्याची एक प्रक्रिया आहे. कृत्रिम रचनांतरणामध्ये अनेक स्रोतांपासून मिळवलेले डीएनएचे तुकडे पुनर्संयोजित करून जीवाणूंमध्ये व्यक्त करवूनघेता ...