जीवनसत्त्व म्हणजे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात सजीवास आवश्यक चयपचयास मदत करणारा असा कार्बनी रेणू आहे. यांपैकी काही आवश्यक रेणू सहसा शरीरात तयार होतात; तर काहींचे प्रमाण पुरेसे नसते, त्यामुळे ती जीवनसत्त्वे आहारातून घ्यावी लागतात. उदा., जीवनसत्त्व (VitaminC) काही सजीवांत निसर्गत: तयार होते, परंतु इतरांमध्ये ते बाहेरून पुरवावे लागते. जीवनसत्त्वांची आहारात कमतरता असल्यास त्या त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेप्रमाणे विशिष्ट आजार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे साधारणपणे १९३५ नंतर गटातील जीवनसत्त्वे गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागली. १९५०च्या सुमारास आवश्यकतेनुसार जीवनसत्त्वांचे मिश्रण असणाऱ्या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन चालू झाले. शासनाने साठवण्यात येणाऱ्या पीठ व दूध उत्पादकांना आपल्या उत्पादनात अधिक जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात पुरवण्याबद्दल सूचना केल्या. अशा उत्पादनांना समृद्धीकरण केलेली उत्पादने म्हणतात. उदा., गर्भारपणाच्या काळात फॉलिक अ‍म्ल (Folic Acid) अधिक असलेले अन्न घेतल्यास किंवा फॉलिक अम्लाच्या गोळ्या घेतल्याने चेता नलिकेच्या विकृतीपासून बचाव होतो.

१९१२ साली पोलिश जीवरसायनशास्त्रज्ञ कासिमिर फंक (Casimir Funk) यांनी ‘व्हिटॅमिन’ (Vitamin) हा शब्द प्रथम वापरला. त्यांनी सूक्ष्म प्रमाणात असलेले आहारातील घटक वेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १९१३ पासून १९४८ पर्यंत १३ जीवनसत्त्वांचा शोध लागला.

जीवनसत्त्वे आणि त्यांचे स्त्रोत

जीवनसत्त्वांचे वर्गीकरण मेदविद्राव्य व जलविद्राव्य अशा दोन गटांमध्ये करण्यात येते. मानवी आहारात आवश्यक अशा १३ जीवनसत्त्वांपैकी मेदविद्राव्य , , आणि के ही चार व नऊ जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत. थायामीन (बी), रिबोफ्लाविन (बी) निॲसीन (बी), पँटोथिनिक अम्ल (बी), पायरीडॉक्सिन (बी), बायोटीन (बी), फोलेट (बी) आणि कोबालमीन (बी१२) ही जीवनसत्त्वे बी कॉम्प्लेक्स या नावाने ओळखली जातात. याशिवाय नववे जीवनसत्त्व जलविद्राव्य आहे.

जलविद्राव्य जीवनसत्त्वे पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे त्यांचे उत्सर्जन मूत्रामधून होते. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नसल्यामुळे त्यांचा सातत्याने आहारात समावेश करणे आवश्यक आहे. मूत्र परीक्षणातून जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहारात पुरेशा प्रमाणात आहेत की नाही हे ओळखता येते. मेद शोषणाबरोबर मेदविद्राव्य जीवनसत्त्वे सुद्धा लहान आतड्यात शोषली जातात. जीवनसत्त्वे आणि शरीरात साठवली जातात. त्यांच्या शरीरातील आधिक्यामुळे कधी कधी दुष्परिणाम देखील होतात.

प्रत्येक जीवनसत्त्व अनेक जैवरासायनिक क्रियेमध्ये मदत करते. त्यामुळे त्यांचे कार्य अनेक अवयवांमध्ये घडून येते. बहुपेशीय सजीवांमध्ये शरीराच्या सामान्य वाढीसाठी व भ्रूण विकासाच्या टप्प्यांमध्ये जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. माता-पित्याकडून उपलब्ध झालेल्या जनुकीय आराखड्यानुसार होणारा गर्भविकास मातेकडून मिळालेल्या पोषणावर अवलंबून असतो. त्यासाठी आवश्यक खनिजे व जीवनसत्त्वे वेळोवेळी उपलब्ध असणे गरजेचे असते. त्यांच्या उपलब्धतेनुसार गर्भाची त्वचा, अस्थी आणि स्नायू तयार होतात. यातील एका किंवा अनेक घटकांची उपलब्धता नसल्यास गर्भ किंवा बालकामध्ये त्रुटिजन्य विकार होण्याची शक्यता असते. जरी सूक्ष्म प्रमाणात एखादा घटक मिळाला नाही, तर गर्भावर अपरिवर्तनीय परिणाम होतो.

एकदा शरीराची वाढ पूर्ण झाली तरी प्रौढामध्ये शरीर निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी पेशी (Cell), ऊती (Tissue) व अवयव यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आहाराबरोबर पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे घावी लागतात. बहुतेक जीवनसत्त्वे आहारातून मिळतात. परंतु, बायोटिन आणि के ही जीवनसत्त्वे अन्नलिकेतील जीवाणूंद्वारे तयार केली जातात. जीवनसत्त्व हे त्वचापेशीमध्ये सूर्यप्रकाशातील विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील किरणांच्या प्रभावाखाली तयार होते. आहारातील पूर्ववर्ती (Precursors) घटकांपासून मानवी शरीरात काही जीवनसत्त्वे तयार होतात. उदा., बीटा कॅरोटिनपासून (Beta carotene) जीवनसत्त्व, तर ट्रिप्टोफॅन अमिनो आम्लापासून (Tryptophan amino acid) निअ‍ॅसीन जीवनसत्त्व तयार होते.

पहा : जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ई, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व ड, जीवनसत्त्वे (पूर्वप्रकाशित नोंद), त्रुटीजन्य विकार, जीवनसत्त्व ब.

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Vitamin

समीक्षण : नंदिनी देशमुख