(संगणक प्रोग्रामिंग भाषा). क्लिपर एक एक्स-बेस कंपायलर (xBase Compiler) आहे, जी मुळात एमएस-डॉस (MS-DOS) अंतर्गत सॉफ्टवेअर प्रोग्राम (programme) तयार करण्यासाठी वापरली जाते. जरी क्लिपर ही सामान्य हेतूकरिता प्रोग्रामिंग भाषा असली तरी ती प्रथमत: डेटाबेस/बिझनेस प्रोग्राम तयार करण्याकरिता वापरली गेली.
डीबेस (dBase; dBASE) या डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीतील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉट-प्रॉम्प्ट (dot-prompt; .prompt). या परस्परसंवादी आदेशित संचाची अंमलबजावणी क्लिपर मध्ये करण्यात आलेला नाही. क्लिपरची निर्मिती १९८४ मध्ये नान्टकेट कॉर्पोरेशनद्वारे (Nantucket Corp.) करण्यात आली. १९८४ मध्ये कंपनीला कॉम्प्युटर असोसिएट्स (Computer Associates) यांना विकण्यात आले आणि उत्पादनाचे नाव बदलून सीए-क्लिपर (CA-Clipper) केले गेले. क्लिपर या भाषेची डीबेस III डेटाबेसचा मुळ कोड कंपायलर म्हणून सुरूवात झाली आणि त्यानंतर तिला विकसित करण्यात आले.
क्लिपरची निर्मिती त्यावेळी सर्वांत लोकप्रिय डेटाबेस भाषा असणाऱ्या ॲशटोन टेट’ज डीबेस III या प्रोग्रामिंग भाषेला बदलविण्याकरिता करण्यात आली होती.
क्लिपर एमएस-डॉस (MS-DOS) अंतर्गत स्टॅण्डअलोन ॲप्लिकेशनद्वारे संकलित (complied) आणि अंमलात (executed) आणली जाऊ शकते. हाच डीबेसपेक्षा क्लिपरचा फायदा आहे. 1985 — 1992 या वर्षादरम्यान लाखो क्लिपर ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. विशेषत: छोट्या व्यवसायासाठी, जेथे ग्राहक व्यवस्थापन आणि नोंदयादीतील व्यवस्थापन यांमधील विविध बाबींशी डेटाबेस हाताळण्यात येतो. विशिष्ट गरजेनुसार क्लिपरचे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले.
जेव्हा क्लिपर हे परिपक्व अवस्थेत होते, तेव्हा ते बरेच वर्षे डॉस वरच वापरण्यात आले, परंतु सी-प्रोग्रामिंग भाषा (C programming language), पास्काल प्रोग्रामिंग भाषा (Pascal programming language), ऑब्जेक्ट ओरिएंट प्रोग्रामिंग (OOP; Object Oriented Programming) आणि कोड-ब्लॉक डेटा-टाइप यांच्या समावेशासह ती पूर्वीच्या भाषेपेक्षा अधिक सक्षम अशी भाषा तयार झाली.
भाषेची आणखी काही वैशिष्ट्ये :
- मूळ सांकेतिक शब्दकोश
- उच्च-कार्यक्षमतेसाठी संकलक (Compiler);
- वर्णात्मक एकीकृत विकास पर्यावरण;
- व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे (VGA) वर्णात्मक पद्धतीचे समर्थन;
- माउसच्या वापराचे समर्थन;
- आपल्या कार्यवाही योग्य मेमरी वापर कमी केला जातो;
- डेटा आणि संगणकाला पुरवलेली माहिती क्रमशः;
- ‘शॉर्टकट कळ’ची उपलब्धता;
कळीचे शब्द : #संगणकीय भाषा # clanguage #pascal # आज्ञावली #programming #language
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Clipper_(programming_language)
- https://www.thocp.net/software/languages/clipper.htm
- https://vivaclipper.files.wordpress.com/2012/08/clipper-programming-language.pdf
समीक्षक : विजयकुमार नायक