(सपाट डेटाबेस). फ्लॅट-फाइल डेटाबेसमध्ये डेटाबेस हा फाइल (File) स्वरूपात संग्रहित करतात. रेकॉर्ड (Record) एकसमान स्वरूपाचे असतात आणि रेकॉर्डस् मधील संबंध अनुक्रमित किंवा ओळखण्याची कोणतीच संरचना नसते. फाइल ही अत्यंत साधी असते. फ्लॅट-फाइल ही साधी मजकूर किंवा द्विमान फाइल (बायनरी फाइल) असू शकते. डेटाबेसमधील माहितीच्या संबंधावरून अनुमान काढले जाते, परंतु खुद्द डेटाबेस ते संबंध स्पष्ट करू शकत नाही.

एका फ्लॅट-फाइलमध्ये विशेषत: मजकूर असतो, ज्याद्वारे सर्व शब्दप्रकिया किंवा इतर संरचना वर्ण किंवा मार्कअप काढून टाकले जातात. फ्लॅट फाइल डेटाबेस साध्या मजकूर स्वरूपात माहिती साठविते. रिलेशनल डेटाबेसमधील (Relational database) फ्लॅट-फाइलमध्ये प्रत्येक ओळीत एक रेकॉर्ड असलेली सारणी असते आणि रेकॉर्ड मधील भिन्न स्तंभ फील्डला विभक्त करण्यासाठी स्वल्प विराम मर्यादित असतात. रिलेशनल डेटाबेसच्या विपरीत, फ्लॅट-फाइल डेटाबेसमध्ये एकाधिक सारण्या नाहीत. फ्लॅट-फाइलमध्ये साठवलेल्या माहितीमध्ये त्यांच्याशी संलग्न कोणतेही फोल्डर्स किंवा पथ नाहीत.

माहिती आयात करण्यासाठी फ्लॅट-फाइल माहिती-वखार (डेटा वेअरहाऊसिंग; Data warehousing) प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. त्यांनी साठवलेल्या माहितीवर हेरफेर केले जात नाही, परंतु त्यांना सर्व्हरवरून माहिती वाहून नेत असलेल्या सोईनुसार प्राधान्य दिले जाते. फ्लॅट-फाइल केवळ सारणीत माहिती संग्रहित करण्याचे एक सारखे साधन म्हणून कार्य करतात, परंतु त्यांमध्ये समाविष्ट असलेल्या सारणींमधे कोणतेही संलग्नता नसते.

फ्लॅट-फाइल संरचना

आज्ञावलीकार ओरॅकल (Oracle) आणि एसक्यूएल (SQL) मध्ये अनुप्रयोग तयार करतांना फ्लॅट-फाइल डेटाबेसचा वापर करतात, जे बहुविध प्रोग्रामिंग भाषांना आधार देतात. कारण  फ्लॅट-फाइलचे असणारे अत्यंत साधे स्वरूप शिवाय संरचित फाइलपेक्षा त्या कमी जागा व्यापतात. परंतु फ्लॅट-फाइलमधील माहिती फक्त वाचता, साठविता आणि पाठविता येते. फ्लॅट-फाइल ही संगणक प्रणालीची एक प्रकारची पद्धत आहे जी सर्व माहिती एकाच निर्देशिकामध्ये संग्रहित करते. फ्लॅट-फाइल डेटाबेसमध्ये माहिती प्रतिनिधीत्व काही मानकांचे पालन करते. फ्लॅट-फाइल डेटाबेसमधील प्रत्येक स्तंभ हा विशिष्ट माहिती प्रकारासाठी प्रतिबंधित केलेला असतो. माहितीचे फाॅरमॅटिग करतांना ठराविक रूंदी असावी याकरिता डिलिमिटर (delimiter) यांचा फ्लॅट-फाइलमध्ये समावेश करण्यात येतो कारण त्यामुळे रेकॉर्ड मधील विविध प्रकारच्या फील्ड शोधण्याचा त्राण कमी होतो. फ्लॅट-फाइलमधील प्रथम पंक्ती फील्ड नावाचा संदर्भ देते. विशिष्ट फील्ड नाव प्रत्येक फील्ड कोणत्या माहितीशी संबंधित आहे हे ओळखणे सोपे करते. फ्लॅट-फाइल डेटाबेसमधील सर्व पंक्ती संबंधित बीजगणित मधील ट्युपल (Tuple) संकल्पनांचे अनुसरण करतात, जेथे ट्युपल घटकांची रचना केलेली यादी आहे. डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीमध्ये (Database management system; DBMS) माहिती हस्तांतरित होईपर्यंत फ्लॅट-फाइल्स मधील माहिती त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात असते. एकदा प्रेषण पूर्ण झाले की, माहिती बदलली जाते आणि वेगवेगळ्या स्वरूपात जतन केली जाते.

कळीचे शब्द : #database #DBMS #TEXT

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक