(पाया-2 अंक पद्धती). द्विमान अंक पद्धतीत स्थानात्मक अंक पद्धतीचा (Positional numeral system) वापर करण्यात आला आहे. यामध्ये 2 या अंकाला पाया (Base) नियुक्त करून 0 (शून्य) आणि 1 (एक) दोन भिन्न चिन्हांचा वापर अंक दर्शविण्याकरिता करण्यात येते.
द्विमान अंक हे दशमान अंकापेक्षा तुलनेने बरीच मोठी असतात कारण द्विमान अंक फक्त 0 आणि 1 या दोन शक्यतांमध्ये फरक करते तर दशमान अंक 10 शक्यतांमध्ये फरक करू शकतात. म्हणजेच द्विमान अंक दशमान अंकापेक्षा कमी माहिती प्रवाहित करतात. त्यामुळे त्यांचे नाव संक्षिप्त स्वरूपात बिट (bit) असे करण्यात आले आहे. संगणकाचा सूक्ष्मप्रक्रीयक हा बिटवर प्रक्रिया करतो.
दशमान अंकांचे द्विमान अंकात रूपांतरण खालीलप्रमाणे दाखविण्यात येते.
दशमान | द्विमान | रूपांतरण |
0 | 0 | 0(20) |
1 | 1 | 1(20) |
2 | 10 | 1(21)+0(20) |
3 | 11 | 1(21)+1(20) |
4 | 100 | 1(22)+0(21)+0(20) |
5 | 101 | 1(22)+0(21)+1(20) |
6 | 110 | 1(22)+1(21)+0(20) |
7 | 111 | 1(22)+1(21)+1(20) |
8 | 1000 | 1(23)+0(22)+0(21)+0(20) |
9 | 1001 | 1(23)+0(22)+0(21)+1(20) |
10 | 1010 | 1(23)+0(22)+1(21)+0(20) |
तर कुठल्याही संख्यांची द्विमान अंकात रुपांतरण करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
उदा., 9 या संख्येसाठी पुढील प्रमाणे गणिती पद्धतीनुसार मांडणी केल्या जाते :
9/2 = 4 आणि 1 बाकी
4/2 = 2 आणि 0 बाकी
2/2 = 2 आणि 0 बाकी
1/2 = 0 आणि 1 बाकी
आलेल्या बाकी अंक या उलट म्हणजे खालून-वरती अशा स्वरूपात लिहिल्या जाते – 1001
1001 = 1(23)+0(22)+0(21)+1(20)
द्विमान अंक पद्धतीमध्ये द्विमान बेरीज, वजाबाकी, भागाकार हे सोडवता येतात, तसेच ते संगणक अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात. संगणकात सर्व कोडिंग आणि भाषा जसे की, सी, सी++, जावा इ. प्रोग्राम लिहिण्यासाठी द्विमान अंक 0 आणि 1 वापरतात किंवा कोणताही अंकात्मक माहिती एन्कोड करतात. संगणकाला फक्त कोड केलेली भाषा समजते.
माहिती तंत्रज्ञान आणि संगणकविज्ञानाला द्विमान अंक पद्धतीचे महत्त्व त्यांच्या संक्षिप्तता आणि विश्वसनीयता यांमुळे प्राप्त झाले आहे. तर विद्युत यांत्रिकी उपकरणात 0 आणि 1 याचा वापर दोन अवस्था जसे की, चालू-बंद, उघड-बंद किंवा जाणे-येणे या क्रिया दर्शविण्याकरिता वापरण्यात येतात.
पहा : अंक, अंक पद्धती, गणित, संगणक, हिंदु-अरबी अंक पद्धति.
कळीचे शब्द : #बायनरी #बायनरीबेरीज #द्विमान #दशमान #अंकपद्धती # बिट
संदर्भ :
समीक्षक : अक्षय क्षीरसागर