संगणक विषाणू ही संगणकची कार्यप्रणाली पूर्णपणे संगणक आज्ञावलीवर (programme) आधारित असते. विविध कार्य करण्यासाठी विशेष आज्ञावल्या प्रयोगात आणल्या जातात, जर हे कार्य करणाऱ्या आज्ञावल्या ग्रसित झाल्या तर ते संगणकावरील माहितीला नुकसान पोहचवू शकतात.

संगणक विषाणू हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर  (software) असतो, जो संगणक मधली फाईल/माहिती खराब करण्यासाठी किंवा ग्रसित संगणकवरील (Infected computers) माहिती दुसऱ्या संगणकाकडे पाठवून त्या संगणकाची महत्त्वपूर्ण माहिती चोरी करण्यासाठी बनवला जातो. जर संगणक विषाणूमुळे ग्रसित झाला तर तो ठीक काम करू शकत नाही. कधी कधी तर हार्डड्राईव्हमध्ये जतन केलेली माहिती पण खराब करू शकतो. आजकाल संगणक विषाणूचा प्रसार इंटरनेट आणि ई-मेलच्या साहाय्याने जलद गतीने होत आहे. संगणक विषाणू संगणक नेटवर्कच्या मदतीने नेटवर्कमध्ये जोडले गेलेल्या संगणकमध्ये सोप्याप्रकारे हस्तांतरित होऊ शकतो. विषाणूची हि कार्यप्रणाली आहे, अशा प्रकारे विषाणू स्वतःचा प्रसार करतात आणि संगणकाला हानी पोहचवतात.

संगणक विषाणू खालीलप्रमाणे प्रभावित करतात :

  1. संगणक मधली महत्त्वपूर्ण माहिती खराब करून टाकतात.
  2. संगणकच्या निर्देशिका (डिरेक्टरी) मध्ये बदल करतात.
  3. संगणकची गती कमी करून टाकतात.
  4. आज्ञावली मधली माहिती बदलून टाकतात.
  5. फाईल उघडण्यास रोखतात.
  6. फाईलचा आकार बदलून टाकतात.

मालवेअर (Malware) : मालवेअर चे पूर्ण नाव दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर आहे जे की एक सॉफ्टवेअर आज्ञावली आहे. याचाच अर्थ असा की हे  खराब सॉफ्टवेअर जे बिलकुल ठीक नाही, जर हे संगणकमध्ये आले तर पूर्ण संगणकाला खराब करून टाकतात. हा एक प्रकारचा गरज नसलेला सॉफ्टवेअर आहे जो वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या संगणकामध्ये प्रस्थापित होऊन जातो. मालवेअर हे संगणक विषाणूचे एक नाव आहे जे आपल्या सिस्टिमच्या डेटाला हळूहळू नष्ट करू लागते. मालवेअर आपल्या संगणकमध्ये इंटरनेटच्या माध्यमाने येतात कारण जेव्हा इंटरनेटद्वारे माहिती गोळा करण्यासाठी आपण एखाद्या दुर्भावनायुक्त साईटवर जातो किंवा कुठून गेम्स, मुव्हीस डाउनलोड करतो तेव्हा हे मालवेअर आपल्या संगणकमध्ये येतात.

टाइमबॉम्ब विषाणू (Timebomb viruse) : हा एक असा विषाणू आहे जो एका निश्चित वेळेपर्यंत, जेव्हा कि याला आज्ञावली करते वेळी त्यात टाकला जातो. तो पर्यंत हा निष्क्रिय असतो परंतु नंतर विशिष्ट वेळेनंतर हा सक्रिय होऊन जातो. टाइमबॉम्ब एक संगणकाचा प्रोग्रामचा भाग आहे जो एक पूर्व निश्चित तारीख किंवा वेळ गाठल्यानंतर कार्य करण्यास प्रारंभ करतो किंवा थांबवतो. हा विषाणू वापरकर्त्याच्या हार्डड्राईव्ह मधली बरीच माहिती नष्ट करून टाकतो.

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख