(संगणकीय उपकरणे). हे एक लहान संगणक असून ते हातात ठेवण्यासाठी आणि चालवण्यासाठी पुरेसा असा लहान संगणक आहे. मोबाइल उपकरण म्हणजे हाताने हाताळ्यायोग्य (हँडहेल्ड;  (handheld) कोणत्याही प्रकारच्या संगणकासाठी सामान्य शब्द आहे. हे उपकरण अत्यंत सुवाह्य (हातवाह्य; पोर्टेबल; portable) असतात. टॅबलेट (Tablet), ई-वाचक (e-reader) आणि स्मार्टफोन (smartphone) यांसारखी काही मोबाइल उपकरणे अशा बर्‍याच गोष्टी करू शकतात जे आपण डेस्कटॉप (desktop) किंवा लॅपटॉप (laptop) संगणकावर करू शकतो.

सुवाह्य संगणक उपकरणामध्ये एलसीडी (LCD; Liquid Crystal Display) किंवा ओएलईडी (OLED; Organic Light Emitting Diode) सपाटपटल (फ्लॅटस्क्रिन; flat screen) इंटरफेस असतो, जो अंकात्मक कळफलकासह किंवा वास्तिक बटणासह स्पर्शपटल (टचस्क्रीन; touchscreen) इंटरफेस प्रदान करतो. ही उपकरणे इंटरनेटशी जोडल्या जाऊ शकतात आणि वाय-फाय (wi-fi), ब्लुटूथ (Bluetooth), सेल्युलर नेटवर्कद्वारे इतर उपकरणांशी जोडता येऊ शकतात. लिथियम-आयन बॅटरीद्वारे त्यांना उर्जा (power) प्रदान केली जाते.

मोबाइल उपकरणे : मोबाइल संगणक, छोटा आकाराचा संगणक, नोटबुक, डिजिटल मीडिया प्लेयर (Digital Media Player), एंटरप्राइझ डिजिटल साहाय्यक, ग्राफिंग कॅल्क्युलेटर, हँडहेल्ड गेम कन्सोल, हँडहेल्ड पीसी, लॅपटॉप, मोबाइल इंटरनेट उपकरण (एमआयडी; MID), वैयक्तिक डिजिटल साहाय्यक (पीडीए; PDA), पॉकेट कॅल्क्युलेटर, पोर्टेबल मीडिया प्लेयर, अल्ट्रा-मोबाइल पीसी, भ्रमणध्वनी, कॅमेरा फोन, स्मार्टफोन, फॅबलेटस, डिजिटल कॅमेरे, डिजिटल कॅमकॉर्डर, डिजिटल स्टील कॅमेरा (डीएससी; DSC), डिजिटल व्हिडिओ कॅमेरा (डीव्हीसी; DVC), पेजर, वैयक्तिक नेव्हिगेशन उपकरण (पीएनडी; PND) घालण्यायोग्य संगणक, कॅल्क्युलेटर घड्याळ, स्मार्टवॉच, स्मार्ट कार्ड.

टॅबलेट संगणक

टॅबलेट संगणक (Tablet) : लॅपटॉपप्रमाणे टॅबलेट संगणक सुवाह्य असून ते एक भिन्न संगणकीय अनुभव प्रदान करतात. टॅबलेट संगणकांत किबोर्ड अथवा टचपॅड नसतात, परंतु संपूर्ण पटल स्पर्श संवेदी (टच-सेन्सेटिव्ह; touch-sensitive) असते. त्यामुळे आभासी कळफलकावर टंकलेखन करता येते आणि बोटाचा वापर माउससारखा संकेतनाकरिता करण्यात येतो.

टॅबलेट संगणक पारंपरिक संगणकासारखे सर्व कामे करू शकत नाहीत. बर्‍याच लोकांसाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप सारख्या पारंपरिक संगणकाची आवश्यकता असते. तथापि, सुविधेच्या दृष्टिकोनातून टॅबलेट संगणक दुय्यम संगणक म्हणून आदर्श ठरू शकतो.

आधुनिक टॅबलेट मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनसारखे दिसतात, फक्त टॅबलेट स्मार्टफोनपेक्षा तुलनेने मोठे असतात. [टॅबलेट संगणक].

स्मार्टफोन

स्मार्टफोन (Smartphone) : स्मार्टफोन ही पारंपरिक सेलफोनची अधिक प्रभावशाली आवृत्ती आहे. फोन कॉल, व्हॉईसमेल (voicemail), मजकूर संदेशन इ. मूलभूत वैशिष्ट्यांसह ते इंटरनेटशी वाय-फाय किंवा सेल्युलर नेटवर्कद्वारे इंटरनेटशी जोडले जाऊ शकतात (त्यासाठी मासिक डेटा योजना खरेदी करणे आवश्यक आहे). याचाच अर्थ आपण ज्याकरिता संगणक वापरतो जसे की, आपला ई-मेल तपासणे, महाजालकावर धावते वाचन करणे किंवा ऑनलाइन खरेदी करणे इ. त्याचकरिता स्मार्टफोन वापरू शकतो.

बरेच स्मार्टफोन स्पर्श संवेदी पटल वापरतात, म्हणजे उपकरणावर वास्तविक कीबोर्ड नसते. त्याऐवजी, आपण आभासी कीबोर्डवर टंकलेखन करू शकतो आणि हाताच्या बोटांचा वापर करून दृश्य पडद्याच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. तसेच उच्च-गुणवत्तेचा डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल संगीत व व्हिडिओ फाइल्स चालू करण्याची क्षमता इ. मानक वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट आहेत. मोबाईल फील्ड व्यवस्थापनात वापरण्यासाठी हाताळण्यायोग्य उपकरणे अतिशय महत्त्वाची आहेत. उदा., माहिती डिजिटल करणे, हिशोब ठेवणे, पावत्या पाठविणे आणि प्राप्त करणे,  मालमत्ता व्यवस्थापन करणे, स्वाक्षर्‍या रेकॉर्ड करणे आणि बारकोड स्कॅनिंग करणे इत्यादी. .

हाताळण्यायोग्य संगणक विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यात स्मार्टफोन, हँडहेल्ड पीडीए, अल्ट्रा-मोबाइल पीसी आणि टॅबलेट पीसी (पाम ओएस, वेबओएस) समाविष्ट आहेत. वापरकर्ते मोबाइल उपकरणावर आयपीटीव्ही आणि इंटरनेटद्वारे टेलीव्हिजन पाहू शकतात आणि मनोरंजनाचा आनंद घेवू शकतात.

२०१० च्या दशकात, मोबाईल उपकरणे हे एकमेकांना डेटा सामायिक करू शकतात ज्यामध्ये ब्लुटूथचा वापर केला जाऊ शकतो. या उपकरणामध्ये विशिष्ट अंतर असायला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात, मोबाईल उपकरणे हे औषधे, उपचार आणि वैद्यकीय गणना यांसारख्या नोंदी आणि माहिती ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. सैन्यात सैन्य दलांना प्रशिक्षण व शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या नवीन संधी मोबाईल उपकरणांनी निर्माण केल्या आहेत. [स्मार्टफोन].

कळीचे शब्द : #हँडहेल्ड #handheld #उपकरण #device #पोर्टेबल #portable #ई-वाचक #e-kindle #स्मार्टफोन #smartphone #टॅबलेट #tablet #डेस्कटॉप #desktop #लॅपटॉप #laptop #एलसीडी #LCD #ओएलईडी #OLED #पॉवर #power #डिजिटल #digital #टच-सेन्सेटिव्ह #touch-sensitive #व्हर्च्युअल #virtual #video call #प्ले #play

संदर्भ :

समीक्षक : अक्षय  क्षीरसागर