डेस्कटॉप संगणक हा सर्वात सामान्य प्रकारचा सूक्ष्मसंगणक (मायक्रो कॉम्प्युटर; Microcomputer) आहे. संगणकास “डेस्कटॉप” म्हणून संबोधित केले जाते, जेव्हा तो संगणक टेबलावर ठेवला जातो. या प्रकारच्या संगणकास बाह्य स्वरूपात तीन घटक असतात. की बोर्ड (कळफलक; Key Board), मॉनिटर (Monitor) आणि सिस्टीम युनिट (System Unit) ज्यामध्ये सी.पी.यू (C.P.U.; Central Processing Unit), मेमरी (स्मृती; Memory), हार्ड डिस्क ड्राइव्ह (Hard Disk Drive) इत्यादी घटक असतात.

डेस्कटॉप संगणकाचे फायदे :

 • बहुतेक हार्डवेअर भाग हे अद्ययावत करण्यायोग्य असतात.
 • लॅपटॉपच्या (Laptop) तुलनेत डेस्कटॉप हा स्वस्त पर्याय आहे.
 • सी.पी.यू., रॅम, ऑडिओ, ग्राफिक्स कार्ड इत्यादीसारखे अनेक हार्डवेअर घटक वेगवेगळे भाग आहेत, त्यामुळे ते दुरुस्तीसाठी वेगळे करता येतात.
 • डेस्कटॉप संगणक लॅपटॉप संगणकांपेक्षा अधिक काळ टिकतात.
 • बरेच हार्डवेअर घटक वापरकर्त्याच्या इच्छेनुसार (सानुकूलित) कस्टमाइज (Customize ) करता येतात किंवा त्यांना अद्ययावतही करता येतात.
 • संगणक गेमिंगचा(खेळाचा) प्रश्न येतो तेव्हा, डेस्कटॉप हा पहिला पर्याय समोर येतो कारण त्यामध्ये समृद्ध-ग्राफिक गेम्स चालवण्याची उच्च क्षमता असते.

डेस्कटॉप संगणकाचे तोटे : 

 • इतर ठिकाणी हलवणे कठिण असते.
 • डेस्कटॉप टेबलावर भरपूर जागा व्यापतो.
 • व्हिडिओ, ऑडिओ आणि इतर अनुप्रयोगांसाठी बरेच केबल डेस्कटॉपमध्ये वापरले जातात.
 • डेस्कटॉप वापरण्यासाठी वीजप्रवाह आवश्यक आहे.
 • डेस्कटॉपला स्वतंत्र मॉनिटर,की बोर्ड आणि माउस आवश्यक आहे.

समीक्षक रत्नदीप देशमुख

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा