उपलब्ध असलेल्या माहितीची अधिक सविस्तर माहिती म्हणजे मेटाडेटा. मेटा हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ नंतर किंवा पुढे असा होतो. डेटाच्या (विदेच्या) एक किंवा अधिक पैलूंबद्दल माहिती प्रदान करणारा डेटा म्हणून मेटाडेटा परिभाषित केला जाताे. याची माहिती डेटाबद्दल मूलभूत माहिती सारांशित करण्यासाठी वापरली जाते, जे विशिष्ट डेटाचे परिक्षण करते आणि त्याचे कार्य सोपे करते. उदा., अंकीय प्रतिमामध्ये मेटाडेटा समाविष्ट असू शकताे, जो चित्र किती मोठे आहे, रंग खोली, प्रतिमेचे रेझोल्यूशन (Resolution), प्रतिमा तयार केली गेली त्याचा दिनांक, शटर वेग (Shutter Speed) आणि इतर माहिती इत्यादींचा समावेश असताे.
मेटाडेटा डेटाबेसमध्ये संग्रहित आणि व्यवस्थापित केला जाऊ शकतो, यालाच मेटाडेटा नोंदणी किंवा मेटाडेटा वखार (Warehouse) असे म्हणतात. तथापि, संदर्भाशिवाय मेटाडेटा ओळखणे अशक्य आहे.
मेटाडेटाचे प्रकार : मेटाडेटाचे तीन मुख्य प्रकार आहेत : वर्णनात्मक मेटाडेटा : या मेटाडेटाचा शोध आणि ओळख यांसारख्या उद्देशांसाठी स्रोत माहिती म्हणून वापर करण्यात येतो. यात मेटाडेटाचे शीर्षक, लेखक आणि कीवर्ड यांसारख्या घटकांचा समावेश असू शकतो. रचनात्मक मेटाडेटा : या डेटामध्ये डबाबंद मेटाडेटा असतो आणि संमिश्र वस्तू एकत्र कसे ठेवतात हे दर्शवितात, उदा., पृष्ठे अध्याय तयार करण्यासाठी कशा क्रमवारी लावल्या जातात. प्रशासकीय मेटाडेटा : या मेटाडेटामध्ये संसाधन व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी माहिती प्रदान करते, जसे की ते केव्हा आणि कसे तयार केले गेले, फाइल प्रकार आणि इतर तांत्रिक माहिती आणि कोणता त्यात प्रवेश करू शकेल.
मेटाडेटा व्यवस्थापनासाठी आव्हाने : मेटाडेटाचे महत्त्व अधोरेखित करणे शक्य नाही. मेटाडेटा अहवालाची अचूकता गाठण्यास, डेटा रूपांतरणास सत्यापित (Verify) करण्यास आणि गणनाची अचूकता सुनिश्चित करण्यास मदत करतो. मेटाडेटा व्यवसायातील अंतिम वापरकर्त्यांसाठी व्यवसायाच्या अटींची परिभाषा देखील लागू करतो. मेटाडेटाच्या या सर्व उपयोगासह, आव्हाने देखील आहेत. काही आव्हाने खालीलप्रमाणे आहेत :
- एका मोठ्या संस्थेतील मेटाडेटा संपूर्ण संस्थेमध्ये पसरलेला आहे. हा मेटाडेटा स्प्रेडशीट्स, डेटाबेस आणि अनुप्रयोगांमध्ये पसरलेला आहे, तो मेटाडेटा जमा करणे मोठे आव्हान आहे.
- मेटाडेटा मजकूर किंवा मल्टीमीडिया फाईल्समध्ये उपस्थित असू शकतो. हा डेटा माहिती व्यवस्थापन समाधानासाठी वापरण्यासाठी, योग्यरित्या परिभाषित (define) करणे आवश्यक आहे.
- उद्योग-व्यापीमान्य मानदंड नाहीत. डेटा व्यवस्थापन निवारण विक्रेत्यांकडे ज्ञान अपुरे असते.
- मेटाडेटा पास करण्याची कोणतीही सोपी आणि स्वीकारलेली पद्धत नाही.
मेटाडेटा तयार करण्याची पद्धत : मेटाडेटा स्वयंचलित माहिती प्रक्रिया किंवा हस्तलिखित कार्याद्वारे तयार केला जाऊ शकतो. संगणकाद्वारे घेतलेल्या प्राथमिक मेटाडेटामध्ये एखादे ऑब्जेक्ट (संगणकीय वस्तू) तयार केले गेले, ते अद्ययावत (Update) करणे, फाइल आकार आणि फाइल विस्तार समाविष्ट करणे, या संदर्भात एक वस्तू पुस्तक, सीडी, डी.व्ही.डी, पेपर मॅप, खुर्ची, टेबल, फुल पॉट इ. सारख्या भौतिक वस्तू; अंकीय प्रतिमा जसे की डिजिटल फोटो, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज, प्रोग्राम फाइल, डेटाबेस सारणी इत्यादींचा संदर्भ घेते.
संदर्भ :
- http://marciazeng.slis.kent.edu/metadatabasics/types.htm
- https://www.tutorialspoint.com/dwh/dwh_metadata_concepts.htm
- https://learndatamodeling.com/blog/technical-metadata/
- https://en.wikipedia.org/wiki/Metadata
समीक्षक : अक्षय क्षीरसागर