विदा वखार (डेटा वेअरहाऊसिंग; DW) म्हणजे अर्थपूर्ण व्यवसायात अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून विदा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया आहे. विदा वखारीचा वापर सामान्यत: विषम स्त्रोतांकडून व्यावसायिक विदा जोडण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो. यामध्ये तंत्रज्ञान आणि घटकांचे मिश्रण केले जाते आणि विदेच्या धोरणात्मक वापरास मदत करते. हे एखाद्या व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात माहितीचे इलेक्ट्रॉनिक संचयनाचे प्रकार आहे, जे व्यवहार प्रक्रियेऐवजी विचारणा आणि विश्लेषणासाठी आरेखित करण्यात येते. थोडक्यात, माहितीचे विदेमध्ये रूपांतरण करण्याची आणि वापरकर्त्यांना आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आहे.

विदा वखारीमधील उपलब्ध माहिती वापरणे : उपलब्ध असलेल्या विदेचा वापर करण्यास मदत करणारे निर्णय-समर्थन-तंत्रज्ञान विदा वखारीमध्य असते. या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना विदा वखारीचा वापर त्वरीत आणि प्रभावीपणे करता येतो. ते विदा गोळा करू शकतात, त्याचे विश्लेषण करू शकतात आणि वखारीमध्ये असलेल्या माहितीवर आधारित निर्णय घेऊ शकतात. वखारीमध्ये गोळा केलेली माहिती पुढीलपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये वापरली जाऊ शकते. उत्पादन वाढविण्याचे धोरण– उत्पादन धोरणांची पुनर्रचना करून चांगले उत्पादन वाढवले जाऊ शकतात. ग्राहक विश्लेषण – ग्राहक विश्लेषण हे ग्राहकांच्या खरेदीचे प्राधान्य, वस्तू खरेदीची वेळ, ग्राहकाचे अर्थसंकल्पीय चक्र इत्यादींचे विश्लेषण केले जाऊ शकते. प्रक्रिया विश्लेषण – विदा वखार ग्राहकांशी संबंध व्यवस्थापन करण्यास मदत करते आणि ही माहिती व्यावसायिक प्रक्रियेचे विश्लेषण करण्यास देखील मदत करते.

विदा वखारीची साधने आणि उपयुक्तता : विदा वखारीची साधने आणि उपयुक्तता खालील आहेत

विदा निष्कर्षण – एक किंवा अधिक स्त्रोतांमधून विदा गोळा करणे.

विदा स्वच्छता – विदामधील त्रुटी शोधणे आणि दुरुस्त करणे हे समाविष्ट आहे.

विदा रचनांतरण – जुन्या किंवा अप्रचलित स्वरूपात किंवा संगणक प्रणालीमध्ये संग्रहित केलेली माहिती विदा वखारी  स्वरूपातील विदेमध्ये समाविष्ट करणे.

विदा भरण – क्रमवारी लावणे, सारांशित करणे, एकत्रिकरण करणे, अखंडता तपासणे आणि निर्देशांक व योग्य भागांमध्ये विभाजन करणे.

उल्हासित करणे – विदा स्त्रोतांकडून विदा वखारीमध्ये अद्ययावत विदा समाविष्ट करणे.

व्यवसायिक विश्लेषण आराखडा :  व्यवसायाचे विश्लेषक विदा वखारीमधून माहिती मिळवून ते इतर व्यावसायिकांपेक्षा बाजारपेठेत अधिक व्यवसाय मिळविण्याकरिता महत्त्वपूर्ण समायोजन करतात. विदा वखारीमध्ये असल्याने पुढील फायदे मिळतात – विदा वखार माहिती त्वरीत आणि कार्यक्षमतेने गोळा करू शकत असल्यामुळे, हे व्यवसाय उत्पादकता वाढवू शकतात, विदा वखारीमध्ये ग्राहक आणि वस्तूंचे एक सुसंगत दृश्य मिळते, म्हणूनच ग्राहक संबंध व्यवस्थापित करण्यास मदत होते, विदा वखार सतत आणि विश्वसनीय पद्धतीने दीर्घकालावधीत प्रवृत्ती, नमुने यांचे मार्गक्रमण करून खर्च कमी करण्यास मदत होतो.

एक प्रभावी विदा वखार आरेखित करण्यासाठी, व्यवसायांची आवश्यकता समजून घेणे आणि विश्लेषण करणे तसेच व्यवसाय विश्लेषण आराखडा तयार करणे आवश्यक आहे. विदा वखारीच्या आराखड्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे वेगळे दृष्टीकोन आहेत,  ही दृष्टीकोन खालील प्रमाणे आहेत

वरून-खाली – हे विदा वखारीसाठी आवश्यक असलेल्या संबंधित माहितीची निवड करण्यास परवानगी देते.

विदास्त्रोत दृश्य – हे दृश्य परिचालन प्रणालीद्वारे प्रग्रहण, संग्रहित आणि व्यवस्थापित केलेली माहिती सादर करते.

विदा वखार दृश्य – या दृश्यात तक्ते आणि आकारमान सारण्या समाविष्ट आहेत. हे विदा वखारीमध्ये संचयित केलेली माहिती दर्शवते.

व्यवसाय प्रश्न दृश्य – हे अंतिम वापरकर्त्याच्या दृष्टीकोनातून विदेचे दृश्य आहे.

विदा वखारीचा आराखडातीन-स्तर विदा वखार आराखडा : सामान्यतः विदा वखार तीन स्तरीय आराखडा अवलंब करतात. विदा वखार आराखड्याचे तीन स्तर खालील आहेत.

तळ स्तर – आराखड्याच्या तळाशी स्तरीय विदा वखार विदा आधारवाह (बेससर्व्हर) असते.  खालच्या स्तरामध्ये विदा पोह्चवण्यासाठी अंत-साधने (बॅक एंड टूल्स) आणि सेवा-उद्योग साधनांचा वापर होतो. हे अंत-साधने आणि सेवा-उद्योग स्वच्छ, भारण आणि उल्हासित करणे हे कामही करतात.

मध्यम स्तर – मध्यम स्तरामध्ये आपल्याकडे ओएलएपी सर्व्हर असताे, जे खालील पैकी कोणत्याही प्रकारे कार्यान्वित करता येतात.

संबंधात्मक ओएलएपीद्वारे (आरओएलएपी), जी विस्तारित संबंधात्मक डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली आहे. ROLAP मानक रिलेशनल ऑपरेशन्सला बहुआयामी विदेवर कार्य करते.

बहु आयामी ओएलएपी (एमओएलएपी) प्रतिमानाद्वारे, जे बहुआयामी विदा आणि फलनाची थेट अंमलबजावणी करतात.

वरचा स्तर – हे समोरील अंत्य ग्राहक स्तर आहे. यास्तरावर प्रश्न विचारण्याची साधने आणि नोंदणी साधने आहेत.

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर