कामगारांच्या उत्पादकता वाढीचा अनुभव असलेल्या इतर रोजगारांमध्ये वाढीव पगाराच्या प्रतिसादात कामगारांच्या उत्पादनात कमी किंवा जास्त वाढ झालेल्या रोजगारामध्ये वेतनाची वाढ यावर बाउमोल इफेक्ट आधारलेला आहे. वास्तविक वेतनवाढ हे श्रम उत्पादकता बदलांशी संबंधित असल्यामुळे हा सिद्धांत अर्थशास्त्रातील सिद्धांताच्या विरुद्ध आहे, असे मानले जाते.

प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ विल्यम जे. बाउमोल यांनी हा परिणाम मांडला आहे. रोजगारांमधील वेतनवाढ होणे म्हणजे श्रमिकांना असलेल्या कामाच्या अनुभवावरून श्रमिकांमधील स्पर्धा होणे गरजेचे आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या जास्त पगाराची भरपाई होऊ शकते, असे त्यांनी आपल्या सिद्धांतातून स्पष्ट केले आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात उत्पादकता वाढीची कमतरता आणि सार्वजनिक सेवांमध्ये होणाऱ्या परिणामांचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा बाउमोल परिणाम वापरला जातो. आरोग्य सेवा, शिक्षण, मानवी संवाद किंवा क्रियांवर खूप अवलंबून असलेल्या श्रमकेंद्रित क्षेत्रांमध्ये कालांतराने उत्पादनात कमीजास्त वाढ झाली आहे. जास्त संपत्तीसह आपल्याला सामाजिक वस्तुंचा जास्त वापर करावासा वाटतो, ज्यामध्ये उत्पादनक्षमतेची तुलनेने कमी वाढ होते.

बाउमोल परिणाम आपल्याला केवळ आजची अर्थव्यवस्थाच नव्हे, तर अर्थव्यवस्थेच्या भवितव्यासाठी संभाव्य मार्ग समजून घेण्यासाठी मदत करते. अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाते, तसतशी कामगारकेंद्रित सेवा अधिकाधिक महाग का होतात, हे बाउमोल परिणामाद्वारे स्पष्ट होते. अशा प्रकारच्या सेवा जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्यही असू शकतात. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था ही सेवा तयार करण्यासाठी समर्पित आहे आणि जास्तीत जास्त कामगार प्रदान करण्यावर ती लक्ष केंद्रित करते. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकता कमी होण्याची समस्या अस्तित्त्वात आहे; कारण सामान्य अर्थव्यवस्थेत सतत तांत्रिक प्रगती होत असल्यामुळे प्रतिउत्पादन वाढते, कामाचे तास आणि वास्तविक वेतनात म्हणजेच दरडोई उत्पन्नात वाढ होऊन श्रमिकांची मागणीसुद्धा वाढते. उत्पादकता कमी पडल्यामुळे काही समस्या उद्भवतात; परंतु केवळ वाढती जीवनशैली कमी करण्यासाठी बाउमोल परिणाम कार्य करते.

बाउमोल परिणामाच्या अंदाजानुसार अधिक खर्च केल्याने गुणवत्तेत कोणतीही वाढ होणार नाही. जेव्हा अर्थव्यवस्था भरभराटीत असते, तेव्हा कमी उत्पादकता असलेल्या क्षेत्राच्या सापेक्ष किमतीत वेगाने वाढ होताना दिसते. मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या मोठ्या किमतींचे गूढ निराकरण बाउमोल परिणामाने स्पष्ट केले.

संदर्भ :

  • Heilbrun, James; Gray, Charles M., The Economics of Art and Culture, New York, 2001.
  • Journal of Cultural Economics, 1996.

समीक्षक ꞉ परचुरे, राजस