संगणकीय भाषा. ही एक प्रक्रियात्मक प्रोग्रामिंग भाषा आहे. नीकलस विर्थ या संगणकशास्त्रज्ञाने 1968-69 मध्ये त्याची निर्मिती केली आणि 1970 मध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. ती एक लहान व कार्यक्षम संगणकीय भाषा असून त्याचा वापरचा उद्देश आज्ञावली आणि विदा यांना चांगल्या आज्ञावल्या पद्धतींना प्रोत्साहित करणे हा आहे. फ्रेंच गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ ब्लेझ पास्काल यांच्या सन्मानार्थ हे नाव या भाषेला दिले आहे.

पास्काल हे अल्गोल (ALGOL 60) भाषेच्या नमुन्यावर विकसित केले गेले. विर्थ यांनी या भाषेमध्ये आधीच बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या आहेत, परंतु हे स्वीकारण्यात आले नाही आणि पास्कल स्वतंत्रपणे विकसित केले. वस्तु-पास्काल (ऑब्जेक्ट-पास्काल) म्हणून ओळखले जाणारे एक व्युत्पन्न वस्तु-आधारित प्रोग्रामिंग 1985 मध्ये विकसित केले गेले; 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात ॲपल कॉम्प्युटर व बोर्लांड या संगणक आधारित कंपन्यांनी त्याचा वापर केला होता आणि नंतर त्याला मायक्रोसॉफ्ट विंडोजवर डेल्फी या संगणकीय भाषेत विकसित करण्यात आले. पास्काल या संगणकीय भाषेची मॉडूला-२ व ओबेरॉन ही विर्थ यांनीच तयार केलेली विस्तारित रूपे आहेत.

पास्काल ही भाषा अल्गोल डब्ल्यू (ALGOL W) या संगणकीय भाषेच्या प्रयत्नांमुळे प्रभावित होते. अशा भाषा तयार करण्याचा सुस्पष्ट उद्दीष्ट कम्पायलर आणि रन-टाइममध्ये कार्यक्षम असतील आणि विद्यार्थ्यांना संरचित प्रोग्रामिंग तसेच संरचित कार्यक्रमांच्या विकासास अनुमती देतील असा होता. भाषेच्या सुरुवातीच्या यशस्वी संगणकीय भाषांपैकी एक म्हणजे यूसीएसडी पास्काल. ही सानुकूल परिचालन प्रणालीवर चालणारी आवृत्ती असून ती विविध व्यासपीठावर पोहचली जाऊ शकली. त्यांपैकी  एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे ॲपल II. यामुळे ॲपल लिसाच्या विकासासाठी पास्काल  प्राथमिक उच्च स्तरीय भाषा म्हणून वापरली गेली आणि नंतर मॅकिंटॉशचा वापर केला गेला. मूळ मॅकिंटॉश परिचालन प्रणालीचे भाग पास्काल स्रोतसंकेताचे मोटोरोला 68000 एकीकृत भाषेत हस्तांतरित केले होते.

भाषा रचना : पास्काल प्रक्रियात्मक भाषा असून त्यात अल्गोलसारखे नियंत्रण संरचना समाविष्ट आहे. उदा., इफ (if), देन (then), इल्स (else), व्हाइल (while), फॉर (for) इत्यादी. पास्कालमध्ये विदा संरचना स्वरूपाच्या आहेत, ज्या अल्गोल 60 प्रकारांमध्ये समाविष्ट नाहीत. उदा., रेकॉर्ड, व्हेरिएंट, पॉइंटर, इन्युमरेशन सेट आणि प्रक्रिया/पॉइंटर. अशाप्रकारे पास्कालाची भाषा बांधणी सिमुला 67 (simula 67), अल्गोल 68 (ALGOL 68) आणि नीकलस विर्थ यांनी स्वत: तयार केलेली व सर चार्ल्स अँटोनी रिचर्ड यांची सुचविलेलया अल्गोल डब्ल्यू (ALGOL W) यांसारख्या भाषेतून प्रेषित आणि प्रेरित झालेली होती.

संदर्भ :

समीक्षक : अक्षय क्षीरसागर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.