विर्सेन, कार्ल : (- ). अमेरिकन सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. समुद्रशास्त्रातील विविध विषयाचे ते अभ्यासक आहेत.
विर्सेन अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स येथे सध्या वास्तव्यास आहेत. त्यांनी मॅसॅचूसेट्स विद्यापीठातून बी.एस्. पदवी घेतली (१९६४) तसेच बोस्टन विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात एम.ए. ही पदवी घेतली. त्यांनी रुचीबद्दल संशोधन केले. खोल समुद्रातील सेंद्रीय पदार्थांचे सूक्ष्मजीवाणूद्वारे विघटन, पाण्याच्या अधिक दाबाखाली आणि कमी तापमानाला समुद्री जीवाणूंच्या प्रक्रिया, खोल समुद्रात प्रयोग करण्यासाठी साधनांची निर्मिती, समुद्राच्या पाण्यातील गरम वाफेचे बाहेर जाणाऱ्या स्रोतांमध्ये असणाऱ्या सल्फर जीवाणूंचा आणि गरम परिस्थितीत जगणाऱ्या जीवाणूंचा अभ्यास, समुद्री जीवाणूंचा अभ्यास आणि सतत जीवाणू वाढविण्याच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास इ. संधोधनाचे विषय होते. १९६८साली त्यांची वुडहोल ओशोनोग्राफीक इन्स्टिट्यूट येथे नियुक्ती झाली. सु. ३५वर्षे त्यांनी समुद्रशास्त्रावर संशोधन केले. २००३ साली ते वरिष्ठ संशोधन विशेषज्ञ म्हणून निवृत्त झाले. ते नेहेमी नवीन संशोधनाचे विषय निवडून काढीत.
ॲल्विन नामक पाणबुडी १९६८ साली महासागरात संशोधन करीत असतांना बुडाली, तिला परत १९६९साली समुद्रातून बाहेर काढले गेले. सुमारे अकरा महिने बुडालेल्या पाणबुडीत राहून चांगल्या अवस्थेत असलेले अन्न चाखणारे विर्सेन पहिले शास्त्रज्ञ होते. १९७० सालाच्या शेवटी आणि १९८०च्या सुरुवातीस पाण्यातील गरम वाफेचे बाहेर जाणारे स्त्रोत शोधले गेले आणि पहिल्यांदा ते स्वत: पाहण्यास पोहून गेले. सध्या ते गुणश्री प्राध्यापक म्हणून समुद्रशास्त्रात काम करतात, त्यामुळे अनेक वर्षे अनुत्तरीत राहिलेले काही प्रश्न सोडविण्यामागे त्यांना रस आहे.
कळीचे शब्द : # ॲव्हिन #सागरी #सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ #Alvin
संदर्भ :
- www.whoi.edu/oceanus/feature/carl-wirsen
- https://books.google.co.in/books?isbn=0674017374
- URL: http://www.pbs.org/saf/1207/ features/113.htm.
समीक्षक : रंजन गर्गे