वनस्पतीचे अंडाशय

सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला ‘अंडाशय’ अथवा ‘किंजपुट’ म्हणतात. फुलाच्या जायांगाच्या तळाचा भाग म्हणजे अंडाशय. अंडाशयाच्या आत भ्रूणकोश असतो. त्यामध्ये बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अंड असते. परागण झाल्यानंतर कुक्षीवृंत्तामधून परागनलिका वाढते आणि बीजांडामध्ये शिरते. भ्रूणकोशाजवळ आल्यानंतर परागनलिकेचे टोक फुटते आणि पुंयुग्म मोकळे होतात. त्यांपैकी एक पुंयुग्म आणि अंड यांचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो. फलनानंतर जायांगामध्ये बदल होतात आणि अंडाशयापासून फळ तयार होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा