अनाच्छादित भूप्रदेश, वेल्लारी, कर्नाटक राज्य

पर्यावरणातील एक प्रभावी प्रक्रिया. अनाच्छादन म्हणजे आवरण किंवा आच्छादन निघणे किंवा काढणे. भूपृष्ठ हे पृथ्वीचे आवरण आहे. हे आवरण अनेक थरांचे आहे. अपक्षय, वहन, क्षरण आणि निक्षेपण या परस्पर पूरक क्रिया घडल्यास भूपृष्ठावरील डोंगर, पर्वत, पठारे व मैदाने यांच्या स्वरूपात बदल होतो. भूपृष्ठावरील विविध भूरूपांवर उष्णता, वारा, आर्द्रता, वर्षण इत्यादी वातावरणीय क्रियांचा परिणाम होतो. उघड्या पडलेल्या भूभागावर या वातावरणीय क्रिया प्रकर्षाने कार्य करतात. त्यामुळे खडकांचे कण सुटे होतात, खडक फुटतात व त्यांचा भुगा होतो. याला अपक्षय म्हणतात. भौतिक आणि रासायनिक क्रियांमुळे होणारे खडकांचे विखंडन व अपघटन यांचाही समावेश अपक्षयात होतो. भूपृष्ठाचे क्षरण होण्यासाठी त्याआधी त्याचे अपक्षय व्हावे लागते. म्हणजेच क्षरणाची सुरुवात अपक्षयानंतर होते. अपक्षयामुळे सुटे खडकांचे तुकडे व कण त्याच जागी पडून राहतात. ते वहन क्रियेमुळे मूळ जागेपासून हलवले जातात. वहनाची क्रिया घर्षण, अंतर्गत ससंजन व उताराचा कोन यांवर अवलंबून असते. जमिनीचा उतार तीव्र असल्यास माती व खडकाचा भुगा गुरुत्वाकर्षणामुळे उतारावरून खाली वाहून जाऊ शकतो. अपक्षयामुळे उपलब्ध झालेले पदार्थ वाहून नेण्याचे कार्य पाणी, वारा, बर्फ इ. कारकांकडून होते. डोंगर, टेकड्या, दर्‍या, मैदाने इत्यादी भूरूपांची झीज होणे व त्यांचा निष्कास होणे या प्रक्रियेस क्षरण म्हणतात. भूपृष्ठाचे क्षरण होण्यासाठी त्याआधी त्याचा व्हावा लागतो. म्हणजेच क्षरणाची सुरुवात अपक्षयानंतर होते. अपक्षयामुळे सुटे खडकांचे तुकडे व कण त्याच जागी पडून राहतात. ते वहन क्रियेमुळे मूळ जागेपासून हलविले जातात. वहनाची क्रिया घर्षण, अंतर्गत ससंजन व उताराचा कोन यांवर अवलंबून असते. जमिनीचा उतार तीव्र असल्यास माती व खडकाचा भुगा गुरुत्वाकर्षणामुळे उतारावरुन खाली वाहून जाऊ शकतो. अपक्षयामुळे उपलब्ध झालेले पदार्थ वाहून नेण्याचे कार्य पाणी, वारा, बर्फ इ. कारकांकडून होते. प्रत्येक गतिमानकारक झीज घडवून आणण्यास सक्षम असतो. क्षरणामुळे पदार्थ नदी, वारा व हिमनदी यांतून वाहतात. मात्र त्यांचा वेग मंदावल्यास प्रवाहमार्गात वाहून आलेले पदार्थ साठतात. या पदार्थाच्या साठून किंवा साचून राहण्याच्या क्रियेला निक्षेपण म्हणतात.

अशा प्रकारे वातावरणात उघडा पडलेला भूभाग वातावरणीय क्रियांमुळे अपक्षयित होतो. त्या अपक्षयित पदार्थाचे भूबाह्य कारकांकडून वहन होते. वहनानंतर पुन्हा क्षरण, क्षरणानंतरही वहन होतच असते. कालांतराने त्या पदार्थाचे निक्षेपण होते. या क्रिया पृथ्वीवर निरंतरपणे चालू असतात. त्यामुळे भूपृष्ठाचा वरचा एकएक थर निघत राहतो. हेच अनाच्छादन. ही अपक्षय-वहन-क्षरण-निक्षेपण अशी साखळी आहे.

जमिनीची धूप, भूघसर व झीज हे प्राकृतिक पर्यावरणातील बदल अनाच्छादनामुळे होतात. अनाच्छादनामुळे काही भागांतील जमिनीचे मूळ गुणधर्म बदलून तिची उत्पादकता वाढते, तर काही भागांत तिची उत्पादकता कमी होते. जलाशयांतील निक्षेपण वाढल्यास जलाशय उथळ होतो. त्यामुळे त्यातील परिसंस्थेत बदल होतात. अपक्षय-क्षरण-वहनामुळे हवेत धुळीचे कण मिसळून हवा दूषित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा