हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, पूरिया, ललित पूर्वा, पूर्वा कल्याण, मालीगौरा, जेत (दोन प्रकार), भटियार, भंखार, साजगिरी, ललिता गौरी इ. प्रमुख राग या थाटात मोडतात. दक्षिणात्य संगीतातील ‘गमनश्रम’ थाटाशी ह्यांचे साधर्म्य आहे. थाटाचे नाव ज्यावरून पडले, त्या मारवा रागात आधारस्वर ‘सा’ (षड्ज) कमी वेळा व वक्र चलनांतून वापरण्याच्या वैशिष्ट्यामुळे विशेष आर्तता व आकर्षण येते, असे सर्वसाधारण मान्य मत आहे.
संदर्भ :
- भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र, (भाग तिसरा), हाथरस, १९५६.
समीक्षण : सुधीर पोटे