अणू आणि रेणूंमूळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र प्रामुख्याने इलेक्ट्रॉनांच्या गतीमुळे निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) मूल्य सर्वसाधारण अनाधुनिक एककाहून बरेच लहान असते. त्यामुळे बोर मॅग्नेटॉन () हे एकक वापरले जाते. बोर मॅग्नेटॉनची व्याख्या खाली दिलेली आहे.
1 बोर मॅग्नेटॉन =
येथे हे अनुक्रमे इलेक्ट्रॉनचा विद्युतभार, प्लांकचा स्थिरांक आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आहे. इलेक्ट्रॉन जर कोनीय संवेगाची (Angular momentum) पुंज संख्या 1 असलेल्या स्थितीत असेल तर त्याचे चुंबकीय आघूर्ण इतके असते.
S. I. एककात बोर मॅग्नेटॉनचे मूल्य
x
बोर मॅग्नेटाॅन हे नाव डॅनिश भौतिकतज्ञ नील्स बोर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
पहा : मॅग्नेटाॅन.
कळीचे शब्द : #न्यूक्लीय मॅग्नेटाॅन #मॅग्नेटाॅन
समीक्षक : माधव राजवाडे